Live News Updates 28 March 2023 : देवेंद्र फडणवीसांनीही सोशल मीडियातील प्रोफाइल फोटो बदलला!
Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला सोशल मीडियातील प्रोफाइल फोटो बदलला असून तिथं विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो ठेवला आहे. भाजप व शिंदेंची शिवसेना लवकरच वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही वातावरण निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
Tue, 28 Mar 202319:11 IST
ठाकरे सरकार पाडण्यासाठी दोन वर्षांत १५० बैठका, तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
शिवसेनेतील आमदारांचे मत परिवर्तन करण्यासाठी राज्यात तब्बल १५० बैठका घेतल्या. सोबत देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदेंनेही त्यासाठी मोठी साथ दिली होती. त्यामुळेच ठाकरे सरकार पाडण्यात आपल्याला यश मिळालं, असा गौप्यस्फोट आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केला आहे.
Tue, 28 Mar 202314:15 IST
Nana Patole : जनतेच्या मूळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून सावरकरांचा मुद्दा; पटोले यांचा आरोप
भारतीय जनता पक्षाकडं देशातील जनतेला भेडसावत असलेल्या ज्वलंत समस्यांवर कोणतंही उत्तर नाही. मोदी सरकार सर्वच आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलेलं आहे. जनता महागाई, बेरोजगारीनं त्रस्त आहे, त्यावर भाजप उत्तर देऊ शकत नाही म्हणूनच जनतेच्या मुळ प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी भाजपकडून सावरकरांचा मुद्दा पुढं करण्यात आलेला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
Tue, 28 Mar 202313:00 IST
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांच्या प्रोफाइल फोटोवरही झळकले विनायक दामोदर सावरकर
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपला सोशल मीडियातील प्रोफाइल फोटो बदलला असून तिथं विनायक दामोदर सावरकर यांचा फोटो ठेवला आहे. भाजप व शिंदेंची शिवसेना लवकरच वीर सावरकर गौरव यात्रा काढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर ही वातावरण निर्मिती सुरू करण्यात आली आहे.
Tue, 28 Mar 202312:33 IST
Mumbra Thane : मनसे नेते अविनाश जाधवांना ९ एप्रिलपर्यंत मुंब्र्यात प्रवेशबंदी; मनसेच्या इशाऱ्यानंतर पोलिसांची कारवाई
Avinash Jadhav Banned In Mumbra Thane : मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी मुंब्रा येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेली अवैध मजार हटवण्याची मागणी केली होती. त्यानंतर आता ठाणे पोलिसांनी येत्या ९ एप्रिलपर्यंत त्यांना मुंब्र्यात प्रवेशबंदी लागू केली आहे.
Tue, 28 Mar 202311:16 IST
पॅनकार्ड आधारला लिंक करण्यासाठी पुन्हा मुदतवाढ
आधार कार्डला पॅन कार्ड लिंक करण्याची डेडलाइन वाढवण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे. आता पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करण्याची अंतिम तारीख ३० जून २०२३ करण्यात आली आहे. यापूर्वी याची अंतिम तारीख ३१ मार्च २०२३ होती. टॅक्सपेयर्स ३० जूनपर्यंत दंड भरून आपले पॅन कार्ड, आधार कार्डशी लिंक करू शकतील.
Tue, 28 Mar 20238:58 IST
Sharad Pawar : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या निवडणुकीबाबत शरद पवार यांची भूमिका जाहीर
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी निष्पक्षपाती राहण्याची भूमिका जाहीर केली आहे. तसंच, दोन्ही पॅनेलच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Tue, 28 Mar 20238:02 IST
Pune : जैव इंधनाची गुणवत्ता आणि घनता यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (महानिर्मिती) तर्फे 'मिशन समर्थ' अंतर्गत आयोजित जैव इंधन कार्यशाळेचे उद्घाटन महानिर्मितीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ.पी.अनबलगन यांच्या हस्ते करण्यात आले. बायोमासचा उपयोग करतांना बाष्पकाच्या रचनेनुसार ज्वलन क्षमतेत वाढ करण्यावर आणि जैव इंधनाची गुणवत्ता व घनता यावर लक्ष्य केंद्रित करणे गरजेचे आहे, असे डॉ.अनबलगन यावेळी म्हणाले. हॉटेल नोवोटेल येथे आयोजित या कार्यशाळेला महाऊर्जाचे महासंचालक रवींद्र जगताप, मिशन समर्थचे संचालक सुदीप नाग, महानिर्मितीचे संचालक संजय मारुडकर, दिवाकर गोखले, अभय हरणे, कार्यकारी संचालक राजेश पाटील, डॉ.नितीन वाघ, नितीन चांदूरकर, राजेशकुमार ओसवाल, अंकुश नाळे, पंकज नागदेवते, प्रफुल्लचंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.
Tue, 28 Mar 20237:29 IST
Share Market : शेअर बाजारात अनिश्चिततेचं वातावरण, सेन्सेक्समध्ये किंचित घसरण
अमेरिकेतील बँकिंग संकटानंतर भारतीय शेअर बाजारात सुरू झालेल्या घसरणीचा वेग कमी असला तरी ही घसरण पुरती थांबलेली नाही. आज सकाळपासून सेन्सेक्स आणि निफ्टीच्या वाटचालीत अनिश्चितता दिसत आहे. बँक निफ्टी मात्र काही प्रमाणात तग धरून आहे.
Tue, 28 Mar 20237:13 IST
VD Savarkar : उद्धव ठाकरेंनी सत्तेत असताना सावरकरांचा अपमान कसा सहन केला?, सावरकरांच्या नातूचा सवाल
Ranjit Savarkar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांनी सावरकरांचा मोठ्या प्रमाणात अपमान केला होता. सत्तेत असताना ठाकरेंनी त्यावर भूमिका का घेतली नाही?, त्यावेळी त्यांना काँग्रेसची भूमिका पटली होती का?, अशा प्रश्नांची सरबत्ती करत सावरकरांचे नातू रणजीत सावरकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
Tue, 28 Mar 20236:45 IST
Chagan Bhujabal : छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आलीय.
Tue, 28 Mar 20232:24 IST
MM Keeravani COVID Positive: नाटू नाटू गाण्याचे संगीतकार एमएम किरवाणी यांना कोरोनाची लागण
प्रसिद्ध संगीतकार एमएम किरवाणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. एमएम किरवाणी यांना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. एका मुलाखतीमध्ये एमएम किरवाणी यांनी मुलाखतीमध्ये त्यांच्या हेल्थची अपडेट चाहत्यांना दिली. ही मुलखत किरवाणी यांनी ऑनलाईन दिली.
Tue, 28 Mar 20231:34 IST
Pune news : नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशनमार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याचे आयोजन
देशातील उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी भारत सरकारच्या नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन मार्फत पहिल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील रोजगार मेळाव्याचे ११ एप्रिलपासून आयोजन करण्यात आलेले आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून सुमारे १० हजार आंतरराष्ट्रीय नोकरीच्या संधी उपलब्ध होणे अपेक्षित असून तांत्रिक, व्यावसायिक उत्कृष्ट कौशल्य आदी कुशलज्ञान असलेल्या आयटीआय, अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषि, पशुविज्ञान, फार्मसी, पदवी, पदविकाधारक, व्यावसायिक पात्रता याशिवाय माहिती तंत्रज्ञान व इंडस्ट्रियल लॉजिस्टिक कॅपिटल गुड्स, सेवा आदी क्षेत्रातील कामाचा अनुभव असणारे व विदेशात आपल्या कौशल्याच्या आधारे करिअर करू इच्छिणारे उमेदवार सहभागी होऊ शकणार आहेत.
Tue, 28 Mar 20231:33 IST
Pune Metro : पुणे मेट्रोच्या प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून आढावा; प्रकल्पांना गती देण्याचे दिले निर्देश
पुणे शहरात सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा घेऊन सुरू असलेले प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावेत असे निर्देश दिले. शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, महामेट्रोचे महाव्यवस्थापक ब्रिजेश दीक्षित, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, महामेट्रोचे संचालक अतुल गाडगीळ, विनोद अग्रवाल, महामेट्रो कार्यकारी संचालक डॉ. हेमंत सोनावणे, प्रमोद आचार्य आदी उपस्थित होते.
Tue, 28 Mar 20231:32 IST
Pune news : वाहतूक कोंडी टाळण्यासाठीच्या उपाययोजनांना गती द्या- पालकमंत्री
पुणे शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांचा आढावा घेऊन वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने करावयाच्या उपाययोजनांना प्राधान्य द्यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बैठकीत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, रवींद्र धंगेकर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे, पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर, शहर अभियंता प्रशांत वाघमारे आदी उपस्थित होते.
Tue, 28 Mar 20231:31 IST
PMC : पुणे महानगरपालिकेने पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे : पालकमंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : हवामान विभागाने पुढील वर्षी पावसाचे प्रमाण कमी असण्याचे संकेत दिले असल्याने पुणे महानगरपालिकेने आतापासून पिण्याच्या पाण्याचे योग्य नियोजन करावे. तसेच समान पाणी पुरवठा योजनेच्या कामांना गती द्यावी, असे असे निर्देश पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. शासकीय विश्रामगृहात जायका, २४ तास पाणी पुरवठा योजना आणि पुणे शहरातील पाणी समस्येबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस आमदार माधुरी मिसाळ, भिमराव तापकीर, पुणे मनपा आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, रविंद्र बिनवडे, विकास ढाकणे, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर आदी उपस्थित होते.
Tue, 28 Mar 20231:30 IST
Delhi : दिल्लीत कॉँग्रेसचा मशाल मोर्चा
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर आज दिल्लीच्या लाल किल्यापासून टाऊन हॉलपर्यंत मशाल मोर्चाच आयोजन करण्याची तयारी सुरू आहे. या मोर्चाच नेतृत्व प्रियंका गांधी करू शकतात.
Tue, 28 Mar 20231:29 IST
BjP : भाजपच्या संसदिय बोर्डाची आज बैठक
भाजपच्या संसदिय बोर्डाची आज सकाळी ९. ३० वाजता बैठक. संसद भवन लायब्ररी बिल्डींगमध्ये बैठकीच आयोजन. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह इतर भाजपचे खासदार बैठकीला उपस्थित रहातील.
Tue, 28 Mar 20231:28 IST
Umesh Pal : उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार
उमेश पाल अपहरण केसमध्ये स्पेशल कोर्ट आज निकाल देणार आहे. माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्यासह इतर आरोपी आहेत. आतिकला काल गुजरातच्या साबरमती जेलमधून प्रयागराजला आणलं गेलय. सकाळी ११ वाजता त्यांना कोर्टात हजर करतील.
Tue, 28 Mar 20231:28 IST
Pune : भारत आणि आफ्रिकन देशात आज संयुक्त लष्करी परिषदे
पुणे - भारत आणि आफ्रिकन देशातील संयुक्त लष्करी सरावादरम्यान आयोजित परिषदेला केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथसिंह उपस्थित राहणार आहेत. दुपारी 3 वाजता पुण्यातील सिंबायोसिस शिक्षण संस्थेत आयोजित फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ व्याख्यानमालेत राजनाथसिंह यांचे व्याख्यान संध्याकाळी ४ वाजता होणार.
Tue, 28 Mar 20231:26 IST
Aganwadi : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या याचिकेवर आज सुनावणी
अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांकरता मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी. वारंवार आंदोलनं करूनही सरकार मागण्या मान्य करत नसल्यानं हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली आहे
Tue, 28 Mar 20231:23 IST
Ashish Shelar : आशिष शेलार यांची पत्रकार परिषद
मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांची सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद... मुंबई भाजपा कार्यालय, वसंत स्मृती, दादर येथे पत्रकार परिषदेच आयोजन
Tue, 28 Mar 20231:22 IST
mumbai: त्रिवेदी, कोश्यारींना न्यायालयाचा दिलासा! फौजदारी याचिका फेटाळली
‘माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व भाजप खासदार सुधांशु त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराज व अन्य महापुरुषांबाबत केलेल्या वक्तव्यांवरून प्रथमदर्शनी कोणताही गुन्हा झाल्याचे दिसत नाही. त्या वक्तव्यांमागे प्रथमदर्शनी समाज प्रबोधनाचा उद्देश दिसतो,’ असा निष्कर्ष मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच नोंदवला. या दोघांविरोधात फौजदारी गुन्हा व अॅट्रॉसिटी कायद्याखालील गुन्हा नोंदवण्याचा आदेश देण्याची विनंती करणारी फौजदारी रिट याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.
Tue, 28 Mar 20231:21 IST
G20 : मुंबईत आजपासून 'जी-२०' बैठक! देशविदेशातील प्रतिनिधी राहणार उपस्थित
मुंबईत डिसेंबरनंतर पुन्हा एकदा जी-२० परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार, बुधवार व गुरुवार असे तीनदिवसीय व्यापार व गुंतवणूक बैठकींचे आयोजन करण्यात आले असून या बैठकींना देशविदेशातील प्रतिनिधी उपस्थित असणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने महापालिकेकडून वांद्रे, सांताक्रूझ, वांद्रे बॅण्ड स्टॅण्ड, मिठी नदी आदी ठिकाणांचे सुशोभीकरण व अतिरिक्त रस्ते कामे केली जात आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मुंबई पुन्हा चकचकीत होणार आहे.
Tue, 28 Mar 20231:16 IST
Hasan Mushrif : मुश्रीफांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी
Hasan Mushrif : हसन मुश्रीफांसह त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या अटकपूर्व जामीनावर मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी होणार आहे. याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद पुर्ण झाला असून ईडीतर्फे एएसजी अनिल सिंह आपला युक्तिवाद कोर्टात सादर करतील. ईडीनं सर्वांच्या जामीन अर्जाला विरोध केला आहे.