मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 27 March 2023 : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Live News

Live News Updates 27 March 2023 : अमृता फडणवीस धमकी प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

Amrita Fadnavis Threat Case : अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता या प्रकरणात आरोपी अनिक्षा जयसिंघानीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

Mon, 27 Mar 202316:44 IST

औरंगाबाद परिमंडलातील १९ गावे वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त

औरंगाबाद : वीजबिल वसुलीसाठी औरंगाबाद परिमंडलात महावितरणकडून प्रभावी प्रयत्न करण्यात येत आहेत. घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक वर्गवारीतील वीजग्राहकांचाही महावितरणला चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणामी २६ मार्चपर्यंत जिल्ह्यातील १९ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत तर ३ गावे थकबाकीमुक्तीच्या मार्गावर आहेत.

कन्नड तालुक्यातील पिशोर उपविभागांतर्गत धामणी, आंबेगाव, शिपघाट, दुधमाळ, मेहुण, सावरगाव, सातकुंड तांडा, चिमणापूर, रेऊळगाव, पळशी खुर्द, देवपुळ, अमदाबाद, डोंगरगाव, टाकळी, मोहरा व मोहाडी ही १६ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत. तर पैठण उपविभागांतर्गत केसापुरी, पैठण खेडा व जैदपूर ही ३ गावे थकबाकीमुक्त झाली आहेत.

Mon, 27 Mar 202316:05 IST

वाळूज ‍परिसरास सुरळीत वीजपुरवठ्यासाठी होणार पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ 

वाळूज परिसरातील ग्राहकांच्या विजेच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी महापारेषणच्या एमआयडीसी एल सेक्टरमधील १३२ केव्‍ही उपकेंद्रातील पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमतावाढ करण्यात येणार आहे. वाळूज परिसरातील ग्राहकांच्या विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र महापारेषणच्या १३२ केव्ही उपकेंद्रातील सध्याच्या ५० एमव्हीए क्षमतेच्या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता कमी पडत आहे. त्यामुळे या पॉवर ट्रान्सफॉर्मरची क्षमता वाढवून ती ८० एमव्हीए करण्याचे नियोजन यापूर्वीच करण्यात आलेले आहे मात्र उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता हे काम तातडीने केले जाणार आहे.

Mon, 27 Mar 202315:05 IST

‘उमेद’ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक: मुख्यमंत्री शिंदे

‘उमेद’ मध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करण्याच्या विषयावर शासन सकारात्मक असून लवकरच याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच जाहीर केले. 'उमेद’ महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटनेच्या वतीने सह्याद्री राज्य अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. 

Mon, 27 Mar 202314:58 IST

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात सुसाइड नोट पोलिसांच्या हाती

दर्शन सोळंकी आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या विशेष चौकशी पथकाला दर्शन सोलंकीची सुसाइड नोट सापडली आहे. यामध्ये दर्शनने एका विद्यार्थ्याच्या त्रासाने व दिलेल्या धमकीने आत्महत्या केल्याचे म्हटले आहे. 

Mon, 27 Mar 202314:54 IST

Pune Politics : चंद्रकांत पाटलांच्या शासकीय बैठकीत भाजप कार्यकर्ते?, रवींद्र धंगेकरांचा सभात्याग

Ravindra Dhangekar : पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बोलावलेल्या शासकीय बैठकीत भाजप नेते गणेश बीडकर यांनी हजेरी लावल्यामुळं कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. शासकीय बैठकीत भाजप कार्यकर्त्यांचं काय काम आहे?, असा सवाल करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.

Mon, 27 Mar 202314:53 IST

Solapur City : सोलापुरात राहुल गांधींच्या प्रतिमेचा दुग्धाभिषेक, मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Solapur Congress : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आज सोलापूर शहरात युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत केंद्रातील मोदी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी मोदी सरकार देशातील लोकशाही नष्ट करत असल्याचा आरोप काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

Mon, 27 Mar 202313:59 IST

टीम इंडियाचा क्रिकेटपटू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता

भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू केदार जाधव याचे वडील पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. केदार जाधव याचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे

Mon, 27 Mar 202313:04 IST

अमृता फडणवीस धमकी प्रकरणी आरोपी अनिक्षा जयसिंघानीला जामीन मंजूर

विविध गुन्हे दाखल असलेला कुख्यात फरार बुकी व उल्हासनगरचा माजी नगरसेवक अनिल जयसिंघानीवरील कारवाई टाळण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना १ कोटीच्या लाचेची ऑफर दिल्याचे प्रकरण समोर आले होते. या प्रकरणी अनिक्षा जयसिंघानी या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आता याप्रकरणात आरोपी अनिक्षा जयसिंघानीला न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. 

Mon, 27 Mar 20237:40 IST

Latur Accident: लग्न आटपून परतणाऱ्या नवरदेवाच्या वाहनाला भीषण अपघात, चार ठार

लातूरमध्ये लग्न आटपून परतणाऱ्या वाहनाला भीषण अपघात घडलाय. या अपघातात कुटुंबियातील चार जण जागीच ठार झाले आहेत. तर, पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. सुदैवाने, नवरी आणि नवरदेव थोडक्यात बचावले आहेत.

Mon, 27 Mar 20235:01 IST

Tejaswi yadav : तेजस्वी यादव यांना कन्या रत्न; लालू यादव झाले आजोबा, समाज मध्यमावर केले फोटो शेअर

बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना कन्या रत्न प्राप्त झाले आहे. या बाबत त्यांनी ट्विटरवर फोटो शेअर केला आहे. तेजस्वी यादव यांनी मुलीला हातात घेतल्याचा फोटो शेअर केला आहे. देवाने आनंदित होऊन मला कन्यारत्न उपहार स्वरूपात दिल्याचे त्यांनी ट्विट केले आहे.

तेजस्वी यादव
तेजस्वी यादव

Mon, 27 Mar 20234:17 IST

CLXNS : सीएलएक्सएनएसमध्ये नोकरीच्या संधी

सीएलएक्सएनएस या डिजिटल-फर्स्ट डेब्ट रिझॉल्युशन प्लॅटफॉर्मने ७०० हून अधिक कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. हे कंपनीचे धोरणात्मक पाऊल आहे, जे कंपनीच्या झपाट्याने प्रगती करण्याच्या आणि देशभरात प्रबळ उपस्थिती असण्याच्या ध्येयाशी संलग्न आहे. सीएलएक्सएनएस प्रॉडक्ट, इंजीनिअरिंग व डिझाइन ते मार्केटिंग आणि डेटा अॅनालिटिक्सपर्यंत विविध वर्टिकल्समध्ये ही नियुक्ती करण्यात येणार आहे.

Mon, 27 Mar 20234:17 IST

Geojit : जिओजित फायनान्शिअल - इसाफ यांच्यात करार

जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेस या अग्रगण्य गुंतवणूक सेवा कंपनीने इसाफ स्मॉल फायनान्स बँकेबरोबर विशेष सामंजस्यातून, बँकेच्या ग्राहकांना थ्री-इन-वन खात्याची विशेष सुविधा प्रस्तुत करण्यासाठी सहयोग केला आहे. या प्रकारच्या थ्री-इन-वन खात्याच्या अंतर्गत, इसाफ एसएफबीचे बचत खाते सुरू करण्यासह, ते खातेधारक जिओजितकडे डीमॅट खाते आणि ट्रेडिंग खाते विनामूल्य उघडू शकतील.

Mon, 27 Mar 20234:16 IST

Honda : एचएमएसआयतर्फे २०२३ इंटरनॅशनल रेसिंग चॅम्पियनशीपसाठी नवी टीम जाहीर

आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी गुणवत्तापूर्ण भारतीय रायडर घडवण्याचे आव्हान घेत होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (एचएमएसआय) आज २०२३ हंगामासाठी आंतरराष्ट्रीय रेसिंग टीम जाहीर केली. आंतरराष्ट्रीय रेसट्रॅकवर आपले कौशल्य सिद्ध करण्यासाठी भारतातील ४ नवे रायडर्स २०२३ एफआयएम एशिया रोड रेसिंग चॅम्पियनशीप (एआरआरसी) आणि थायलंड टॅलेंट कपमध्ये (टीटीसी) सर्वोत्तम रायडर्सना आव्हान देतील.

Mon, 27 Mar 20234:16 IST

TCI : रस्ते सुरक्षेविषयी जागरुकतेसाठी टीसीआयची सेफ सफर मोहीम

भारताची सर्वात मोठी इंटिग्रेटेड सप्लाय चेन आणि लॉजिस्टिक्स उपाययोजना पुरविणारी कंपनी टीसीआय ग्रुपच्या खास सजविलेल्या ट्रक्सवरचे नुक्कड नाटकांचे प्रयोग सातत्याने सुरू आहेत. या पथनाट्याने चालकांच्या मनात सुरक्षा, आरोग्य आणि पर्यावरणीय मुद्द्यांविषयी जागरुकता निर्माण केली आहे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (टीसीआय ग्रुप) द्वारे निर्मित टीसीआय सेफ सफर म्हणजे चालकांच्या शिक्षणासाठी चालकांनी उचललेले एक पाऊल आहे. देशात रस्तेसुरक्षेचा संदेश देण्यासाठी चालविण्यात येणाऱ्या इतर मोहिमांपेक्षा हे पथनाट्य वेगळे आहे, कारण इथे खुद्द चालकच या पथनाट्याचे नायक आहेत.

Mon, 27 Mar 20234:07 IST

Opening bell : आठवड्याची सुरुवात गोड, निर्देशांक १०० अंशांची वाढ घेत खुला

आज सोमवारी २७ मार्चला सेक्सेक्स सुरुवातीला १०० अंशांच्या वाढीसह खुला झाला. तर निफ्टीतही तुरळक वाढ पहायला मिळाली. गुरुवारी राम नवमी असल्याने चार आठवड्यांचे सत्र असणार आहे. सिलिकॉन व्हॅली बँक (SVB) आणि क्रेडिट सुईस संकटानंतर बँकिंग क्षेत्राच्या लवचिकतेबद्दल आशावाद, दीर्घकाळासाठी जास्त व्याज मिळण्याच्या शक्यतेमुळे भारतीय शेअर बाजारातील संभाव्य सकारात्मक सुरुवात जागतिक समवयस्कांच्या संमिश्र हालचालींदरम्यान झाली आहे. सध्या सेन्सेक्स १७२ अंशांच्या वाढीसह ५७७०७.३९ अंशावर ट्रेड करत आहेत. तर निफ्टी ५३.०५ अंशांच्या वाढीसह १७,००१.४० अंश पातळीवर ट्रेड करत आहे.

Mon, 27 Mar 20233:41 IST

firing : कॅलिफोर्नियातील शीख मंदिरासमोर गोळीबार; दोन व्यक्तींची प्रकृती गंभीर

गेल्या काही दिवसांपासून खलिस्तान समर्थक वारीस पंजाब दे संघटनेटा म्होरक्या अमृतपाल सिंग फरार असून त्याचा शोध पंजाब पोलीस घेत आहेत. या अनुषंगाने खलिस्तान समर्थक संघटना आणि चळवळीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला असताना कॅलिफोर्नियाच्या सॅक्रामँटोमधील एका शीख मंदिरासमोर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे

Mon, 27 Mar 20233:39 IST

Pune : समाविष्ट गावातील नागरिकांचा आज महापालिकेवर धडक मोर्चा 

महापालिकेत समाविष्ट झालेल्या मांजरी बु. येथील नागरी समस्यांच्या विरोधात २  ते ३  हजार ग्रामस्थांचा महामोर्चा आणि बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता हा मोर्चा पालिकेवर धडकणार आहे.  

Mon, 27 Mar 20232:23 IST

Pune : पुणे प्रांताच्या धर्मगुरुपदी बिशप जाॅन राॅड्रीग्ज यांची नियुक्ती

पुणे प्रांताच्या धर्मगुरुपदी बिशप जाॅन राॅड्रीग्ज यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रोम येथील व्हॅटिकन सिटी येथून पोप फ्रान्सिस यांनी बिशप डाॅ. थाॅमस डाबरे यांच्या राजीनाम्याचा स्वीकार करून मुंबई येथे बिशप म्हणून कार्यरत असलेल्या जाॅन राॅड्रीग्ज यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बिशप डाबरे म्हणाले, चर्चच्या नियमांनुसार बिशप यांनी ७५ व्या वर्षी सेवानिवृत्ती घ्यायची असते. वयाच्या ७४ व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर मी राजीनामापत्र पाठवून दिले होते. त्याला तीन वर्षे झाली. नव्या बिशपची नियुक्ती होईपर्यंत मला काळजीवाहू म्हणून काम करण्यास सांगण्यात आले होते. आता नव्या बिशप यांची नियुक्ती झाली असल्याने माझा राजीनामा मंजूर झाला आहे.

Mon, 27 Mar 20231:42 IST

Mumbai News : उपमख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर

उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. औद्योगीक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी 10.45  मिनीटांनी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

Mon, 27 Mar 20231:19 IST

Pune : महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई येथे संपन्न झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या संदर्भात विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे ह्या आज दुपारी २.३० वाजता हॉटेल निसर्ग येथे  पत्रकार परिषद घेणार आहेत. 

Mon, 27 Mar 20233:44 IST

SP Collage : पुण्यात सप महाविद्यालयात प्रशासनाच्या करभराविरोधात आज आंदोलन 

पुण्यातील नामांकित स.प. महाविद्यालयाला गेल्या काही दिवसांपूर्वी निवेदन देवून देखील महाविद्यालयाच्या परिसरातील विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच आहेत म्हणून अश्या भ्रष्ट महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात स.प. महाविद्यालय बंद आंदोलन केले जाणार आहे. हे आंदोलन आज सकाळी ११.३० वाजता केले जाणार आहे.  

Mon, 27 Mar 20230:59 IST

Pune News : नदी पत्रातील झाडे तोडल्यामुळे पुण्यात आज राष्ट्रवादीचे आंदोलन 

 नदीपात्रात राबविण्यात येणार असलेल्या नदी सुधार योजनेंतर्गत सहा हजार झाडे तोडण्यात येणार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. आज  सकाळी १०.३०  वाजता. विज दरवाढीविरोधात आम आदमी पक्षाकडून पुण्यातील महावितरण कार्यालयासमोर आंदोलन, दुपारी १२  वाजता. आंदोलन करण्यात येणार आहे. 

Mon, 27 Mar 20230:57 IST

Devendra Fadanvis : उपमख्यमंत्री फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर

  उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नवी मुंबई दौऱ्यावर आहेत. औद्योगीक प्रशिक्षण संस्था पनवेल येथे राज्यपाल रमेश बैस यांच्यासोबत कार्यक्रमाला उपस्थिती. सकाळी १०.४५ मिनीटांनी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री पुन्हा हेलिकॉप्टरने मुंबईकडे रवाना होतील.

पुणे

Mon, 27 Mar 20230:56 IST

Ajit Pawar : अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर

विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत. दुपारी ३ वाजता राष्ट्रवादी काँग्रेस भवन येथे कार्यकर्ता मेळाव्यात संबोधित करणार आहेत.

 

Mon, 27 Mar 20230:54 IST

Rahul Gandhi : पुणे आणि भंडाऱ्यात राहुल गांधीच्या समर्थनात आंदोलन

 राहुल गांधींची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ काँग्रेसकडून पुण्यातील स्वारगेट चौकात सकाळी ११  ते दुपारी २  वाजेपर्यंत सत्याग्रह आंदोलन करण्यात येणार आहे. तर भंडारा येथे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याच्या निषेधार्थ आणि मोदी - अदाणी महाघोटाळा पर्दाफाश रॅलीचं आयोजन करण्यात आलीये. भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक इथून दुपारी २  वाजता निघणारी ही रॅली जिल्हाधिकारी चौकातील त्रिमूर्ती चौकापर्यंत काढण्यात येणार आहे.

Mon, 27 Mar 20230:53 IST

Satara news : शिवेंद्रराजे भोसले यांची आज पत्रकार परिषद

उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे आरोप गेल्या काही दिवसांमध्ये केलेले आहेत. आमदार शिवेंद्रराजे भोसले हे मुंबईहून साताऱ्यात येणार आहेत. आज ते उदयनराजे भोसले यांच्या आरोपांवर उत्तर देणार आहेत, काळी 11 वाजता पत्रकार परिषद होणार आहे.

Mon, 27 Mar 20230:52 IST

Hasan Mushrif : हसन मुश्रीफ यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात युक्तिवाद होणार

हसन मुश्रीफ, त्यांची तिन्ही मुलं आणि सीएच्या जामीन अर्जावर सत्र न्यायालयात युक्तिवाद होईल. ईडीनं दाखल केलेल्या प्रकरणात अटक टाळण्यासाठी मुश्रीफ प्रयत्नशील आहेत. हसन मुश्रीफांना हायकोर्टानं दिलेलं अटकेपासूनचं संरक्षण या आठवड्यात संपतेय. त्यामुळे या याचिकेवर लवकरच निकाल अपेक्षित आहे.

Mon, 27 Mar 20230:47 IST

Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याचा विरोध सुरूच; आज संसदेत गदारोळाची शक्यता

Parliament session : राहुल गांधी यांच्या खासदारकी रद्द करण्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहात आज सुद्धा गोंधळ होण्याची शक्यता आहे. या बाबीचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसचे खासदार आज संसदेत काळे कपडे किंवा काळ्या फिती लावून जाणार आहेत.