Live News Updates 26 March 2023 : OTT Play Awards कार्यक्रमात उर्फी जावेदचा जलवा..
OTT play change Makers Awards : ओटीटी प्ले अवार्ड कार्यक्रमात अनेक सेलेब्जनी हजेरी लावली होती. यामध्ये आपल्या अतरंगी फॅशनने लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदने नेहमीप्रमाणे आपले पोशाखाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Sun, 26 Mar 202315:56 IST
ओटीटी प्ले अवार्ड कार्यक्रमात उर्फी जावेदचा जलवा..
ओटीटी प्ले अवार्ड कार्यक्रमात अनेक सेलेब्जनी हजेरी लावली होती. यामध्ये आपल्या अतरंगी फॅशनने लक्ष वेधून घेणाऱ्या उर्फी जावेदने नेहमीप्रमाणे आपले पोशाखाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
Sun, 26 Mar 202311:23 IST
शेतकऱ्यांचा माल खेरदी करण्यासाठी सरकारने केंद्र सुरू करावे – केसीआर
शेतकऱ्यांना गुंतवणुकीसाठी एकरी १० हजार रुपये २४ तास मोफत वीज द्यावी. एखाद्या शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्याला ५ लाख रुपयांचा विमा देण्यात यावा. तेलंगणाप्रमाणे, सरकारने येथेही केंद्रे उघडून शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, असे आवाहन तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर राव यांनी नांदेडमध्ये केले.
Sun, 26 Mar 20235:32 IST
ISRO ची अंतराळात मोठी झेप.. देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM3 लाँच, ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने एक मोठे यश मिळवले आहे. रविवारी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून देशातील सर्वात मोठे रॉकेट LVM3 लाँच केले. विशेष म्हणजे या रॉकेटबरोबरच ३६ उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण केले.
Sun, 26 Mar 20231:41 IST
Pune : लष्कर प्रमुखांच्या उपस्थितीत पुणे विद्यापीठात चीनविषयक परिषद
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा संरक्षण व सामरिकशास्त्र विभाग व दिल्ली येथील सेंटर फॉर चायना अनालिसिस अँड स्ट्रॅटेजी यांच्या संयुक्त विद्यमाने चीनचा उदय आणि त्याचे जागतिक परिणाम या विषयावर दुसऱ्या सामरिक संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद २७ व २८ मार्च रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील संत ज्ञानेश्वर सभागृहात आयोजित करण्यात आलेली आहे. या परिषदेचे उद्घाटन लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्या हस्ते सोमवारी होणार आहे.
Sun, 26 Mar 20231:14 IST
Pune : कथकली नृत्याच्या माध्यमातून उलगडली क्लिओपात्राची प्रेम कहाणी !
‘भारतीय विद्या भवन’ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन’च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत 'क्लिओपात्रा ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यात क्लिओपात्राच्या प्रेमकहाणी वरील सादरीकरण या कार्यक्रमात कथकलीच्या माध्यमातून करण्यात आले. संकल्पना प्रबल गुप्ता (बंगळुरू)यांची होती, संगीत सदनम सिवदास यांचे होते.या सादरीकरणासाठी सदनम शिवदासन,सदनम ज्योतिष बाबू यांनी आवाज दिला होता. संस्कृत भाषेतील हे सादरीकरण इंग्रजीतदेखील भाषांतरित करून सांगण्यात आले.
Sun, 26 Mar 20231:12 IST
मोदी सरकार कामगार संघटनां विरोधात - सी. एच. व्यंकटचलम्
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार बँकिंग क्षेत्रातील संघटनांच्या विरोधात आहे. बँकांचे खासगीकरण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. मात्र, बँकिंग एम्प्लॉईज संघटनेने त्यास कडाडून विरोध केला आहे. सरकारची ही मनीषा कदापिही पूर्ण होऊ शकणार नाही. त्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी एकत्रितपणे तीव्र लढा उभारला पाहिजे, असे मत ऑल इंडिया बॅंकिंग एम्प्लॉइज असोसिएशन (एआयबीईए) जनरल सेक्रेटरी सी. एच. व्यंकटचलम् यांनी व्यक्त केले. आकुर्डी येथील श्रमशक्ती भवन येथे महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनच्या वतीने दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी व्यंकटचलम् यांनी देशातील बॅंकिंग क्षेत्रातील प्रश्न, समस्या, सरकारी धोरणास तीव्र विरोध करत याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
Sun, 26 Mar 20231:11 IST
Pune : नाटक हा प्रेक्षकांना प्रौढ, समृद्ध करण्याचा प्रवास : माधव वझे
जीवनाबद्दलच्या आपल्या जाणीवा सखोल करणं हे रंगभूमीचं प्रयोजन असून प्रेक्षकांनी त्या दिशेने जायला हवे, त्यांनी फक्त ऐंद्रीय अनुभवापर्यंत थांबता कामा नये', असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांनी केले. ज्ञानप्रबोधिनी माजी विद्यार्थ्यांच्या कला व संस्कृती विशेष उद्दीष्ट गटातर्फे ' नाट्यकला आस्वाद ' विषयावर ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, समीक्षक माधव वझे यांचा ' नाट्यकला आस्वाद ' या विषयावर संवाद आयोजित करण्यात आला होता. यावेळी त्यांनी रंगभूमीचे प्रयोजन, प्रवास, प्रेक्षकांची जबाबदारी अशा अनेक मुद्यांवर मते व्यक्त केली. शिरीष जोशी यांनी माधव वझे यांचा सत्कार केला.
Sun, 26 Mar 20231:09 IST
Pune : ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचे पुण्यात आयोजन
भारतीय तलवारबाजी महासंघातर्फे आणि महाराष्ट्र तलवारबाजी महासंघ व डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ ते २८ मार्च या कालावधीत ३३ व्या राष्ट्रीय वरिष्ठ तलवारबाजी स्पर्धेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. महाळुंगे–बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या बॅडमिंटन हॉलमध्ये सदर स्पर्धा सुरु आहेत.
Sun, 26 Mar 20231:08 IST
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्या विरोधात पुण्यातील फडके हौद चौकात मुक आंदोलन
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्या प्रकरणी पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने आज सकाळी १०.३० वाजता आवाज तोंडाला पट्टया बांधून मुक आंदोलन करण्यात येणार आहे.
Sun, 26 Mar 20231:06 IST
Pune : नऱ्हे येथील एका मोठ्या स्कीममध्ये बिल्डरने केलेल्या गैरव्यवहार विरोधात आंदोलन
नऱ्हे येथील एका मोठ्या स्कीममध्ये बिल्डरने केलेल्या गैरव्यवहार प्रकरणी सदनिका धारक व राष्ट्रवादीचे सरचिटणीस भूपेंद्र मोरे बिल्डरच्या कार्यालयास टाळे ठोकणार आहेत.
Sun, 26 Mar 20231:05 IST
Womans ipl : पहिल्या महिला आयपीएलच्या जेतेपदाची लढाई
पहिल्या महिला आयपीएलचा आज अंतिम फेरीतील सामना रंगणार आहे. अंतिम फेरीत मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामाची म्हणजेच IPL २००८ च्या इतिहासाची पुनरावृत्ती महिला IPL च्या पहिल्या सत्रातही होताना दिसत आहे.
Sun, 26 Mar 20231:04 IST
ISRO : इस्त्रो ब्रिटनचे तब्बल ३६ उपग्रह आज अवकाशात सोडणार
इस्त्रो आज एलव्हीएम 3 च्या माध्यमातून ब्रिटनच्या संचार कंपनीचे वनवेबचे ३६ उपग्रह अंतराळात सोडले जाणार आहेत.
Sun, 26 Mar 20231:01 IST
Pune Fire : पुण्यात कुदळवाडी चिखली येथे गोदामाला भीषण आग
पुण्यात कुदळवाडी चिखली येथे मध्यरात्री सव्वा एक वाजताच्या सुमारास भंगाराच्या गोदामाला भीषण आग लागली, आग शमविण्याची काम अद्यापही सुरू आहे.
Sun, 26 Mar 20230:59 IST
Chandrashekhar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा
भारत राष्ट्र समितीचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांची नांदेडमध्ये जाहीर सभा होणार आहे. त्यांच्या उपस्थितीत काही महत्त्वाचे नेते पक्ष प्रवेश करणार आहेत.
Sun, 26 Mar 20230:58 IST
Uddhav Thackeray : शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा
शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये जाहीर सभा होणार आहे. शिंदे गटात प्रवेश केलेले मंत्री दादा भुसे यांच्या मालेगाव मतदारसंघात ही सभा पार पडत आहे.
Sun, 26 Mar 20231:01 IST
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याच्या विरोधात आज आंदोलने
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्याने कॉंग्रेस तर्फे आज देशभरात आंदोलने केली जाणार आहे. यावेळी केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधी कारभाराचा निषेध केला जाणार आहे.