मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Live News Updates 22 March 2023 : आज गुढीपाडवा; राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह, मनसेचा मेळावा

Live News

Live News Updates 22 March 2023 : आज गुढीपाडवा; राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह, मनसेचा मेळावा

Gudi Padwa: आज मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमांची रेलचेल आज दिवसभर असणार आहे. आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा देखील असणार आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

Wed, 22 Mar 20232:04 IST

Gudi Padwa 2023: तुळजाभवानी मंदिराच्या कळसावर उभारली गुढी; गुढीपाडव्यानिमित्त देवीची अलंकार पूजा

साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी आजचा एक मुहूर्त असल्यानं आणि मराठी नवीन वर्षाचा पहिलाच दिवस असल्यानं तुळजाभवानी देवीची अलंकार पूजा करण्यात आली.

तुळजाभवानी मंदिर
तुळजाभवानी मंदिर

Wed, 22 Mar 20230:56 IST

Pune : जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हास्तरीय समितीची मंजुरी

शासनाचे महत्त्वाकांक्षी असे ‘जलयुक्त शिवार अभियान २.०’ जिल्ह्यातील १८७ गावात राबविण्यास जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समितीने मंजुरी दिली आहे. या अभियानांतर्गत मृद व जलसंधारणाच्या कामात शासकीय यंत्रणेने लोकसहभागाला प्राधान्य देण्याबरोबरच अशासकीय तसेच खासगी संस्थांचाही योग्य सहभाग घ्यावा, असे जिल्हाधिकारी म्हणाले. जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत गाव निवडीसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे, उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे यांच्या समवेत जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समितीतील सदस्य उपस्थित होते. सर्व उप विभागीय अधिकारी तसेच गटविकास अधिकारी दूरदृष्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

Wed, 22 Mar 20230:55 IST

Pune : दुचाकींसाठी नोंदणी क्रमांकाची नवीन मालिका

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे लवकरच दुचाकी वाहनांसाठी नवीन मालिका सुरु करण्यात येत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक विहित तीनपट शुल्क भरून हवे असतील अशा चारचाकी वाहन मालकांनी २३ मार्च रोजी सकाळी १०.३० ते दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्याची यादी २४ मार्च रोजी सकाळी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी लिलावाचे डीडी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील व प्राप्त अर्जासाठीचा लिलाव दुपारी ४ वाजता सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, नवीन वाहन नोंदणी विभाग यांच्या कक्षात करण्यात येईल.

Wed, 22 Mar 20230:54 IST

Pune : चासकमान कालव्याच्या कामासाठी लवकरच सुधारित प्रशासकीय मान्यता : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे जिल्ह्यातील शिरुर व खेड तालुक्याला वरदान ठरलेल्या चासकमान कालव्याच्या उर्वरित कामासाठीचा जवळपास  १ हजार ३५६ कोटीं रुपयांचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला येत्या दोन महिन्यात सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. याबाबत विधानसभा सदस्य अशोक पवार, दिलीप मोहिते-पाटील, राजेश टोपे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.

Wed, 22 Mar 20230:52 IST

Gudi padawa : कर्वेनगर येथे गुढी पाडवा निमित्त शोभा यात्रा 

पुण्यातील कर्वे नगर येथे सकल हिंदू समजातर्फे शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता या यात्रेला सुरुवात होणार आहे. असा असेल शोभा यात्रेचा मार्ग :  आंबेडकर चौक - कॅनोल रोड - भगिनी निवेदिता बॅंक - कर्वेनगर उड्डाणपूल - विकास मित्र मंडळ - मिनल काॅर्नर - स्पेन्सर्स चौक - समारोप: विठ्ठल मंदिर

Wed, 22 Mar 20230:49 IST

Pune Nastik melava : आठवा नास्तिक मेळावा २०२३ पुणे येथे संपन्न

शहीद भगतसिंग विचार मंच, पुणे तर्फे आयोजित आठवा नास्तिक मेळावा १९ मार्च २०२३ रोजी पुणे येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ञ आणि विज्ञान लेखक डॉ. शंतनू अभ्यंकर आणि प्रसिद्ध RJ संग्राम यांची प्रमुख भाषणे झाली. यावेळी दोन पुस्तकाचे प्रकाशन सुद्धा करण्यात आले.

Pune Nastik melava
Pune Nastik melava

Wed, 22 Mar 20230:48 IST

Gudi Padwa: कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी ९.३० वाजता शोभा यात्रा

कोल्हापूर : गुढीपाडव्याच्या निमित्ताने कोल्हापुरातील मिरजकर तिकटी येथून सकाळी ९.३० वाजता शोभा यात्रा सुरू होणार आहे. या शोभायात्रेत सुरूवातीला बाईकर्स त्यानंतर बैलगाड्या, मर्दानी खेळ, झिम्मा फुगडी, लेझीम पथक, ढोल पथक राजपथप्रमाणे साडेतीन शक्तीपीठाचा देखावा आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असणार आहे.

Wed, 22 Mar 20230:46 IST

Gudi Padwa: ठाण्यातील कोपिनेश्र्वर मंदिरात विविधी कार्यक्रम

ठाण्यातील कोपिनेश्र्वर मंदिर न्यासा सकाळी ७ वाजता कोपिनेश्र्वर मंदिर, तलावपाळी येथून शोभा यात्रा निघणार आहे.

Wed, 22 Mar 20230:45 IST

Gudi Padwa: गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी शोभा यात्रा

मुंबई - गिरगावच्या फडके गणेश मंदिरापासून सकाळी ८ वाजल्यापासून शोभा यात्रेला सुरूवात होणार आहे. साडेतीन शक्तीपीठावर आधारित चित्ररथ हे या शोभा यात्रेतलं मुख्य आकर्षण असणार आहे.

Wed, 22 Mar 20230:44 IST

Gudi Padwa: पुण्यात गुढी पाडवा निमित्त बावधन येथे शोभायात्रा

Gudi Padwa: पुण्यात बावधन परिसरात शोभा यात्रा असणार आहे, सकाळी ७.३० वाजता. पोवाडा, लेझीम, ढोल पथक अशी पारंपरिक पद्धतीची यात्रा असेल.

Wed, 22 Mar 20230:41 IST

Mns Gudi Padwa Melava : मनसेचा गुढीपाडवा मेळावा; राज ठाकरे यांची तोफ धडाडणार

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्कवर होणार आहे. मनसेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात राज ठाकरे यांनी पाडवा मेळाव्यात सगळ बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. यामुळे पाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय बोलतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Wed, 22 Mar 20230:39 IST

Gudi Padwa:आज गुढीपाडवा; राज्यात मराठी नववर्षाचा उत्साह 

Gudi Padwa: आज मराठी नववर्ष गुढीपाडव्याच्या निमित्ताने राज्यभरात विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शोभायात्रा यात्रा आणि कार्यक्रमांची रेलचेल आज दिवसभर असणार आहे. आज मनसेचा गुढी पाडवा मेळावा देखील असणार आहे. यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.