मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kasara Suicide Case : घरच्यांनी लाथाडलं, आयुष्याने छळलं; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी अंत

Kasara Suicide Case : घरच्यांनी लाथाडलं, आयुष्याने छळलं; लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या जोडप्याचा दुर्दैवी अंत

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Sep 15, 2023 08:52 AM IST

Kasara Suicide Case : सोमनाथने सुजाताशी लग्न करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली होती. परंतु कसाऱ्यात त्यांच्या प्रेमकहानीचा भयानक अंत झाला आहे.

Suicide Case In Kasara
Suicide Case In Kasara (HT_PRINT)

Suicide Case In Kasara : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या जोडप्यांमध्ये वाद झाल्याने टोकाचं पाऊल उचलल्याच्या अनेक घटना यापूर्वी समोर आलेल्या आहे. अशीच एक खळबळजनक घटना कसाऱ्यातून समोर येत आहे. कसाऱ्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने बंद खोलीत गळफास घेवून आत्महत्या केली आहे. कसारा येथील वीर तानाजीनगर या परिसरात ही घटना घडली आहे. जोडप्याच्या आत्महत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतु आता पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमनाथ सोनवणे (२३) आणि सुजाता देशमुख (२१) अशी दोघांची नावं आहेत. त्यांच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळालेलं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील रहिवासी असलेल्या सोमनाथ आणि सुजाता यांच्यात गेल्या दीड वर्षांपासून प्रेमसंबंध होते. कुटुंबियांचा याला विरोध असल्याने दोघे कसारा येथे राहणाऱ्यासाठी आले. भाड्याने खोली घेत दोघांनी कसाऱ्यात राहण्याचा निर्णय घेतला. भाड्याने खोली घेण्यासाठी सोमनाथला मोठा संघर्ष करावा लागला. बॅगा आणि अन्य सामान मित्राच्या घरी ठेवून जोडपं सोबत राहत होतं. सोमनाथ गवंडी काम करत उदरनिर्वाह करण्यासाठी पैसे गोळा करत होता. परंतु गेल्या दोन दिवसांपासून खोली बंद असल्याने शेजाऱ्यांना संशय आला आणि त्यांनी दरवाजा ठोठावला. परंतु आतून आवाज न आल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती घरमालकाला दिली.

कसारा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत खोलीचा दरवाजा तोडला. त्यावेळी सोमनाथ आणि सुजाता यांनी गळफास घेवून आत्महत्या केल्याचं निदर्शनास आलं. या घटनेची माहिती सुजाता आणि सोमनाथ यांच्या कुटुंबियांना देण्यात आली. दोघांचे मृतदेह अकोले येथे नेण्यात आले. कुटुंबियांच्या उपस्थितीत दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. आत्महत्येपूर्वी सोमनाथ किंवा सुजाताने कोणतीही चिठ्ठी लिहिली नव्हती. त्यामुळं दोघांच्या आत्महत्येचं कारण कळू शकलेलं नाही. या घटनेची कसारा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

WhatsApp channel