Pune rain news : राज्यात अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असतांनाच पुण्यात शुक्रवारी पहाटे वरुण राजने हजरे लावली. पुण्यात, हडपसर, बाणेर, पाषाण, सुस, पेठामधील काही भाग, कोथरूड, आणि पिंपरी-चिंचवड परिसरात हा पाऊस झाला. तब्बल अर्धा तास हलक्या पावसाचा सरी कोसळल्याने वातावरणात गारवा निर्माण झळ होता. दरम्यान पुण्यात पुढील काही दिवस ढगाळ हवामान राहणार असून गारपीटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
पुण्यासह राज्यामध्ये विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, येथे पावसाने हजेरी लावली. एकीकडे थंडी आणि ऊन दोन्ही वातावरण पुणेकर अनुभवत असतांना शुक्रवारी सकाळी हलका पाऊस झाला. उद्या शनिवारी देखील पाऊस होण्याची शक्यत वर्तवण्यात आली आहे. कोरेगाव पार्क येथे १.५ मिमी तर एनडीएला परिसरात ०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात आज जळगाव, नाशिक, धुळे, नगर, छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर शनिवारी विदर्भामधील गडचिरोली, गोंदिया, बुलडाणा, भंडारा, अकोला, अमरावती, वाशीम, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर मराठवड्यात जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी आणि खान्देशातील धुळे, जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी किमान तापमानात घट झाली होती. यामुळे थंडी वाढली होती. तर त्यानंतर दोन दिवसांत पुन्हा तापमानात मोठी वाढ नोंदवण्यात आली. यामुळे उकाडा जाणवत होता. गुरुवारी मोठ्या प्रमाणात उष्णता मान शहरात होते. दरम्यान, या उकड्याने नागरिक हैराण झाले असतांनाच शुक्रवारी पहाटे ६ च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरी शहरात कोसळल्या. पुढील काही दिवस पुण्यात वातावरण ढगाळ राहणार आहे.
संबंधित बातम्या