मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  kandivali pedestrian bridge : कांदिवलीतील तयार होणाऱ्या पादचारी पूलाला आता लिफ्टची सोय! सरकता जिनाही उभारणार

kandivali pedestrian bridge : कांदिवलीतील तयार होणाऱ्या पादचारी पूलाला आता लिफ्टची सोय! सरकता जिनाही उभारणार

Jan 13, 2024 08:07 AM IST

kandivali pedestrian bridge : कांदिवली येथे पालिका नवा पादचारी पूल बांधणार आहे. या पूलाला लिफ्ट आणि सरकता जिन्याने जोडण्यात येणार असल्याने पादचाऱ्यांची सोय होणार आहे.

kandivali pedestrian bridge
kandivali pedestrian bridge

kandivali pedestrian bridge : मुंबई महानगर पालिकेतर्फे कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे तब्बल ६ कोटी रुपये खर्चून पादचारी पूल उभारणार आहे. हा पूल खास ठरणार आहे. कारण या ठिकाणी पालिका पहिल्यांदाच सरकता जिना आणि लिफ्ट देखील उभारणार असल्याने नागरिकांची सोय होणार आहे. दरम्यान, हा पूल झाल्यास लालजी पाडा, गणेश नगर, इंदिरा नगर, संजय नगर, जनता कॉलनी, अभिषेक नगर येथील रहिवाशांना फायदेशिर ठरणार आहे.

Ram Mandir Inauguration: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना राम मंदिर 'प्राण प्रतिष्ठा' सोहळ्याचे निमंत्रण

मुंबईत पादचाऱ्यांसाठी ठीक ठिकाणी पादचारी पूल उभारण्यात आले आहे. या पुलांचा वापर करून नागरीक रस्ता ओलंडत असतात. यामुळे गर्दीचे नियोजन देखील होते. मात्र, मुंबईत या पूलांना लिफ्टची सोय नाही. नागरिकांना जिन्याच्या वापर करून पायी हा पूल ओलांडावा लागत होता. मात्र, कांदिवली पश्चिमेकडील लालजी पाडा येथे पालिकेतर्फे पादचारी पूल उभारण्यात येणार आहे. हा पूल लालजी पाडा, गणेश नगर, इंदिरा नगर, संजय नगर, जनता कॉलनी, अभिषेक नगर येथील रहिवाशांच्या दृष्टीने महत्वाचा ठरणार आहे.

Maharashtra weather update: पुढील दोन दिवस थंडीचे! सोमवारनंतर होणार तापमानात वाढ; असा आहे हवामानाचा अंदाज

या ठिकाणी पूल नसल्याने पादचाऱ्यांची गैरसोय होत होती. यामुळे पालिकेने या ठिकाणी पूल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या साठी तब्बल ६ कोटी रक्कम मंजूर करण्यात आली आहे. या पुलाच्या ठिकाणी, नागरिकांची सोय व्हावी, तसेच त्यांना जास्त चालावे लागू नये या दृष्टीने सरकत्या जिन्यांबरोबरच लिफ्ट देखील उभारण्यात येणार आहे. या साठी निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे.

ट्रेंडिंग न्यूज

पालिकेने या पूर्वी मुंबईत किंग्ज सर्कल येथे सरकता जिना लावला होता. याला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे कांदिवली येथे उभारण्यात येणाऱ्या पूलाला सरकत्या जिन्यासोबत लिफ्ट देखील उभारण्यात येणार आहे.

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर