नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!

नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!

Nov 07, 2024 02:37 PM IST

Navi Mumbai Water Supply News : नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा बंद आहे.

नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती ; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद!
नवी मुंबईतील मुख्य जलवाहिनीला गळती ; खारघर, कामोठेसह अनेक भागातील पाणीपुरवठा बंद! (HT)

Navi Mumbai Pipeline Leakage News: नवी मुंबईकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने अनेक भागातील पाणीपुरवठा बंद झाला आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

नवी मुंबईतील नेरुळ येथील मुख्य जलवाहिनीला गळती लागली. सध्या दुरुस्तीचे काम सुरु आहे. यामुळेच नवी मुंबईतील अनेक भागात आज पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. तर, उद्या सकाळीदेखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. पाणीपुरवठा सुरळीत होऊपर्यंत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील आणि कामोठे आणि खारघर नोडमधील नागरीकांनी पाण्याचा जपून व काटकसरीने वापर करावे तसेच महानगरपालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Whats_app_banner
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर