न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे 'न्याय आपल्या दारी', हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीशांचे वक्तव्य-lay foundation stone of high court complex at bandra east by chief justice dy chandrachud ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे 'न्याय आपल्या दारी', हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीशांचे वक्तव्य

न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे 'न्याय आपल्या दारी', हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीशांचे वक्तव्य

Sep 24, 2024 12:31 AM IST

High Court Complex : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वांद्रे येथील ही नवीन इमारत पुढील १०० वर्षासाठी पक्षकार,वकील मंडळी,न्यायाधिशांकरिता योगदान देणारी असेल.

हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीश, मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री.
हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीश, मुख्यमंत्री शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री.

नवीन संगणकीय बदल, डिजिटायझेशन, पेपरलेस कोर्ट, न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे “न्याय आपल्या दारी”. या सर्व बाबींचा विचार करता उच्च न्यायालयाची नवीन इमारत मोठी आणि अद्ययावत बांधणे, हे सगळ्यांसाठी सोयीचे होणार आहे. असे मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती डॉ.धनंजय चंद्रचूड यांनी व्यक्त केले.

वांद्रे पूर्व येथे प्रस्तावित नवीन उच्च न्यायालयाच्या संकुलाचे (High Court Complex) भूमिपूजन सरन्यायाधीश डॉ.चंद्रचूड (Chief Justice DY Chandrachud)  यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयाच्या कामाचे स्वरूप आणि आवाका हा प्रचंड वाढल्याने न्यायालयाची जागा आणि सुविधा यांची आवश्यकता वाढली आहे. नवीन आव्हाने, नवीन उद्दिष्टे आणि न्यायपालिकेचा भविष्यात्मक दृष्टिकोन, त्यातील बदल याचा विचार करता नवीन इमारत ही काळाची गरज आहे.

वांद्रे येथील ही नवीन इमारत पुढील १०० वर्षासाठी पक्षकार, वकील मंडळी, न्यायाधिशांकरिता योगदान देणारी असेल. मुंबई उच्च न्यायालयाचे काम १४ ऑगस्ट १८६२ रोजी अपोलो बंदर येथून सुरू झाले. त्यानंतर १७ वर्षांनी सध्या अस्तित्वात असलेल्या इमारतीमध्ये स्थलांतरित झाले. तेव्हापासून ही इमारत न्यायालयाच्या कारभाराचा भार सांभाळत आहे, असे कौतुकोद्गार काढत सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले.

 तब्बल दीडशे वर्षाच्या इतिहासात मुंबई उच्च न्यायालयाने अनेक स्थित्यंतरे आणि बदल पाहिले आहेत. या न्यायालयाचा इतिहास आणि लौकिक फारच दैदीप्यमान व प्रेरणादायी आहे. या न्यायालयाने आपल्या देशाला अनेक राष्ट्रीय नेते दिले आहेत. यामध्ये प्रामुख्याने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल भारतरत्न पी.व्ही. काणे यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. तसेच न्यायालयाने अनेक वकिलांची आणि न्यायाधीशांची कारकीर्द पाहिली आहे, असेही ते म्हणाले.

 एकनाथ शिंदे म्हणाले की, मुंबई उच्च न्यायालयासारख्या सर्वात जुन्या आणि लौकिकप्राप्त संस्थेसाठी नव्या युगाची सुरुवात झाली आहे. उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीची प्रतीक्षा आता संपली आहे. मुंबई उच्च न्यायालयात काम केलेले डॉ. चंद्रचूड हे आज देशाच्या सर्वोच्च न्यायव्यवस्थेत सरन्यायाधीश म्हणून काम करीत आहेत, ही महाराष्ट्रासाठी गौरवास्पद बाब आहे. आज त्यांच्याच हस्ते मुंबई उच्च न्यायालयाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन होत आहे, ही अभिमानास्पद आहे.

Whats_app_banner
विभाग