Laxman Hake : मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Laxman Hake : मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी

Laxman Hake : मोठी बातमी! १० दिवसानंतर लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित; छगन भुजबळ यांची चर्चा यशस्वी

Updated Jun 22, 2024 05:50 PM IST

Laxman Hake News : सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर हाके म्हणाले की, सरकारआमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही आमचे उपोषण तात्पुरते मागे घेत आहोत.

लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित
लक्ष्मण हाकेंचे उपोषण स्थगित

Laxman hakes hunger strike suspended : सरकारच्या शिष्टमंडळाच्यापत्रानंतर ओबीसी आरक्षणासाठी गेल्या १० दिवसांपासून उपोषणास बसलेलेओबीसीनेते लक्ष्मण हाके यांनी आपले उपोषण तुर्तास मागे घेतले आहे. मात्र,त्यांनी जाहीर केले आहे की,आंदोलन सुरूच राहणार आहे. लक्ष्मण हाके यांची समजूत काढण्यात सरकार यशस्वी झाले असून छगन भुजबळ यांची खेळी यशस्वी ठरली आहे. छगन भुजबळ यांच्यासह सरकारच्या शिष्टमंडळाने उपोषणस्थळी जाऊन हाके यांच्याशी चर्चा केली. समाजाच्या उर्वरित मागण्यांबाबत सर्वपक्षीय बैठकीत निर्णय होणार आहे. लक्ष्मण हाके सरकारच्या शिष्टमंडळाशी केलेल्या चर्चेनंतर आपले१०दिवसांचे उपोषण एका तासात मागे घेतले आहे.

आज (शनिवार) दुपारी सव्वा दोन वाजता शासनाचे शिष्टमंडळ जालन्यातील उपोषणस्थळी वडीगोद्री येथे दाखल झाले. शिष्टमंडळ आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्यात सकारात्मक चर्चा झाली व त्यानंतर हाके यांनी उपोषण तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली. शिष्टमंडळाच्या हाताने पाणी पिऊन हाके यांनी आपले उपोषण सोडले. दोन-तीन मागण्या सोडल्या तर सर्वच मागण्या पूर्ण झाल्या आहेत, सगेसोयरेचा आदेश अजून आलेला नाही. तो सर्वपक्षीय बैठकीनंतर निघेल, असे शासनाचे आश्वासन ग्राह्य धरून उपोषण स्थगित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इतर मागण्यांवर शासनाची श्वेत पत्रिका मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे हाके यांनी जाहीर केले.

..तर पुन्हा मैदानात - हाके

सरकारी शिष्टमंडळाशी चर्चा केल्यानंतर हाके म्हणाले की, सरकारआमच्या मागण्यांबाबत सकारात्मक आहे. त्यामुळे आम्ही आमचे उपोषण तात्पुरते मागे घेत आहोत. आंदोलन फक्त स्थगित केले आहे. मात्र मागण्या मान्य न झाल्यास पुन्हा मैदानात उतरु,असा इशाराही लक्ष्मण हाके यांनी सरकारला दिला आहे.

मंत्री छगन भुजबळ यांच्याशी माझी फोनवर चर्चा झाली. त्यांनी सांगितले की, दोन मुद्दे जवळपास मान्य केले आहेत. मात्र सगेसोयऱ्यांचा अध्यादेश काढण्याआधी सर्वपक्षीय बैठक घेतली जाईल, त्यानंतरच त्याबाबत निर्णय होईल.

त्याचबरोबर बोगस कुणबी नोंदी देणारे आणि घेणाऱ्यांवर कारवाई होईल,असे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र शासनचं कुणबी दाखले वाटत आहे. त्यामुळे याबाबत माझ्या मनात संभ्रम आहे. छगन भुजबळ आणि शिष्टमंडळावर विश्वास होता,म्हणूनच आम्ही त्यांना चर्चेसाठी पाठवले. ते ओबीसी हिताचा जो निर्णय घेतील त्यावर आम्ही चर्चा करु,असेही लक्ष्मण हाके यांनी स्पष्ट केले.

महाशक्तीपेक्षा लोकशक्ती मोठी - भुजबळ

सरकारचं शिष्टमंडळ आज ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या भेटीसाठी जालन्यातील आंदोलनस्थळ वडीगोद्रीला पोहोचले. यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी शेरोशायरी करत नाव न घेता जरांगे-पाटील यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. कुणी स्वतःला महाशक्ती समजत असेल तर त्यांनी लक्षात ठेवावं की लोकशक्ती सर्वात मोठी आहे. असा इशाराही छगन भुजबळ यांनी दिलाय.

 

सरकारच्या शिष्टमंडळानं वडीगोद्रीत लक्ष्मण हाकेंशी चर्चा केली. ओबीसी शिष्टमंडळ आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली होती. त्याची माहिती लक्ष्मण हाके आणि ओबीसी आंदोलकांना देण्यात आली. या शिष्टमंडळात छगन भुजबळ, महाजन, सावे, सामंत, मुंडे, भुमरे आदि नेते आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर