मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Samruddhi Expressway: अखेर मुहूर्त ठरला..! समृद्धी महामार्गाचे ‘या’ दिवशी मोदींच्या हस्ते लोकार्पण

Samruddhi Expressway: अखेर मुहूर्त ठरला..! समृद्धी महामार्गाचे ‘या’ दिवशी मोदींच्या हस्ते लोकार्पण

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Nov 30, 2022 08:21 PM IST

Mumbai-Nagpur Samruddhi Expressway : मुंबई-नागपूर या दोन शहरांना जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण करण्यात येणार आहे.

समृद्धी महामार्गाचे  ‘या’ दिवशी मोदींच्या हस्ते लोकार्पण
समृद्धी महामार्गाचे  ‘या’ दिवशी मोदींच्या हस्ते लोकार्पण

Samruddhi Expressway Release :  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट असणारा व मंजुरीपासून चर्चेत असणाऱ्या व मुंबई - नागपूर (Mumbai - Nagpur) या राज्याच्या राजधानी व उपराजधान्यांना जोडणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या  (Samruddhi Expressway) लोकार्पणाचा मुहूर्त ठरला आहे.  महामार्गाच्या  पहिल्या टप्प्यातील लोकार्पण सोहळा नागपुरात येत्या ११ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडणार आहे. याच दिवशी नागपूरच्या विस्तारीत मेट्रो प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार  आहे. राज्य सरकारकडून या सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी   ११ डिसेंबर रोजी नागपुरात येत आहेत. ११ डिसेंबरनंतर समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर - शिर्डी पर्यंतचा मार्ग खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती एमएसआरडीसीकडून देण्यात आली आहे. 

समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे ११ डिसेंबरला उद्घाटन होणार आहे. तर २०२३ पर्यंत तिन्ही टप्प्याचे म्हणजे ७०१ किलोमीटरचा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल. समृद्धी महामार्गाचा पहिला म्हणजे शिर्डी ते नागपूर दरम्यानचा ५२० किमीचा रस्ता खुला केला जाणार आहे. हा प्रकल्प सुमारे ५५  हजार कोटींचा असून, डोंगरदऱ्यांमधून महामार्गाची उभारणी करण्यात आली आहे. त्यामूळे नागपूर ते मुंबई पोहोचण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होणार आहे. 


नागपूर-मुंबई दरम्यानची वाहतूक सुलभ व्हावी, या उद्देशाने ३१ जुलै २०१५ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ७०१ किलोमीटरच्या समृद्धी महामार्गाची घोषणा विधानसभेत केली होती. प्रत्यक्षात राज्याच्या १० जिल्ह्यांतून हा महामार्ग जात असला तरी, एकूण २४ जिल्ह्यांना याचा फायदा होणार आहे. 

IPL_Entry_Point