मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  धक्कादायक! लातूरच्या शासकीय रुग्णालयातील जेवणात आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णांच्या जीवाशी खेळ

धक्कादायक! लातूरच्या शासकीय रुग्णालयातील जेवणात आढळल्या जिवंत अळ्या, रुग्णांच्या जीवाशी खेळ

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Dec 30, 2023 07:02 PM IST

Latur government Hospital News : लातूर जिल्हा रुग्णालयात रुग्णाला दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी संबंधितांवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिला आहे.

Latur government Hospital
Latur government Hospital

सरकारी रुग्णालयातील आंतररुग्ण विभागात दाखल रुग्णांना देण्यात येणाऱ्या जेवणात जिवंत अळ्या आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात हा प्रकार घडला आहे. जेवणात अळ्या दिल्याने रुग्ण व नातेवाईकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराबद्दल संबंधित रुग्णालय अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मनसे पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

रुग्णांच्या जीवाशी खेळ करण्याचा प्रकार लातूर येथील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात समोर आला आहे. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाच्या जेवणात अळ्या सापडल्या आहेत. विशेष म्हणजे जेवणात अळ्या सापडल्याची तक्रार करणाऱ्या रुग्णास रुग्णालयातील कर्मचाऱ्याने दमदाटी करून त्याला हाकलून दिले. तसेच त्याच्या जेवणाचे ताटही फेकून दिले.

उकरडा मेहरे या रुग्णाच्या जेवणात अळ्या आढळल्या. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वॉर्ड क्र.३१ मध्ये ते उपचार घेत होते.अळ्या आढळल्यानंतर मेहरे यांनी याची माहिती संबंधित कर्मचाऱ्यांना दिली. मात्र कर्मचाऱ्याने त्यांनाच उलट धमकावून तिथून हकलवून दिले.

हा प्रकार समोर येताच मनसे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली. या गंभीर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचा-यावर निलंबनाची कार्यवाही करावी अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र आंदोलन या विषयावर छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

रुग्णालयाने आपल्या स्पष्टीकरणात म्हटले आहे की, रुग्णालयाच्या आजूबाजूला असलेल्या झाडातून किंवा डब्याच्या किनाऱ्यावरुन अळ्या पडल्या असल्याची शक्यता आहे.

WhatsApp channel

विभाग