मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Latur Election Result : लातुरात एकच फॅक्टर, काळगे डॉक्टर… कॉंग्रेसने गड पुन्हा कसा काबीज केला?, वाचा

Latur Election Result : लातुरात एकच फॅक्टर, काळगे डॉक्टर… कॉंग्रेसने गड पुन्हा कसा काबीज केला?, वाचा

Jun 05, 2024 06:48 PM IST

Latur Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची झाली. लातूर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांनी बाजी मारली. तर निलंकेरांचे जवळे मानले जाणारे सुधाकर श्रंगारे यांचा पराभव झाला. त्यांना सलग दुसऱ्यांदा खासदार बनता आले नाही.

Latur Election Result : लातुरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर… कॉंग्रेसने लातूरचा गड पुन्हा काबीज केला
Latur Election Result : लातुरात एकच फॅक्टर काळगे डॉक्टर… कॉंग्रेसने लातूरचा गड पुन्हा काबीज केला

Latur Lok Sabha Election 2024 Result : लोकसभा निवडणुक २०२४ चे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएला २९३ तर इंडिया आघाडीला २३३ जागा मिळाल्या. दरम्यान येथे आपण लातूर लोकसभा मतदार संघाबाबात माहिती घेणार आहोत.

ट्रेंडिंग न्यूज

अनुसूचित जातीसाठी हा मतदारसंघ राखीव आहे. यावेळी काँग्रेसने लिंगायत समाजातून येणाऱ्या डॉक्टर शिवाजी काळगे यांना उमेदवारी दिली. तर भाजपने खासदार सुधाकर शृंगारे यांना दुसऱ्यांना संधी दिली.

पण लातूर लोकसभेची निवडूण गाजली ती जिल्ह्याच्या राजकारणातील दोन भैय्यांमुळे. लातूर शहर विधानसभा मतदार संघाचे आमदार अमित देशमुख आणि  निलंग्याचे आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली होती. दोन्ही भैय्यांनी जिल्ह्यात सभांचा धडाका लावला होता. यामुळेच लातूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक यावेळी अतिशय चुरशीची झाली. लातूर लोकसभा मतदार संघातून कॉंग्रेसच्या डॉ. शिवाजी काळगे यांनी बाजी मारली. तर निलंकेरांचे जवळे मानले जाणारे सुधाकर श्रंगारे यांचा पराभव झाला. त्यांना सलग दुसऱ्यांदा खासदार बनता आले नाही.

मत मोजणीच्या २८ फेऱ्या आणि टपाली मतमोजणीची एक फेरी झाली. यामध्ये डॉ. काळगे यांना सर्वाधिक ६ लाख ९ हजार २१ मते मिळाली. तसेच भारतीय जनता पार्टीचे सुधाकर तुकाराम श्रंगारे यांना ५ लाख ४७ हजार १४० मते मिळाली. अशा स्थितीत डॉ. काळगे हे ६१ हजार ८८१ मताधिक्याने विजयी झाले.

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर येथे दोनवेळा २०१४ आणि २०१९ मध्ये भाजपचा खासदार निवडून आला पण यावेळी मात्र, विलासरावांचे दोन्ही पुत्र अमित देशमुख आणि धीरज देशमुख हे कमालीचे सक्रीय होऊन लढले आणि त्यांनी पुन्हा लातूर लोकसभा मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडून आणला.

लातुरात कोणते मुद्दे गाजले

येथून कॉंग्रेसचा सलग दोनवेळा पराभव झाला होता. कॉंग्रेसने यावेळी नवा चेहरा मैदानात उतरवला. तसेच, संपूर्ण देशमुख परिवार निवडणुकीत सक्रिय होता. मित्रपक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांनाही सोबत घेतल्याने कॉंग्रेसची ताकद वाढली. तसेच, इथल्या भाजपमधील अंतर्गत वादाचा कॉंग्रेसला फायदा झाला. मराठा आरक्षण, पाण्याचा प्रश्न, शेतमालाला न मिळणारा हमीभाव, रेल्वे बोगी कारखाना या मुद्यांवर ही निवडणूक लढली गेली.

जिल्ह्यात ६२.५९ टक्के मतदान

लातूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील ४१ व्या क्रमांकाचा मतदारसंघ आहे. या ठिकाणचे मतदार हे राजकीयदृष्ट्या जागरूक असल्याचे दिसले कारण गेल्या वर्षी प्रमाणे यावर्षी देखील लातूरकरांनी भरघोस मतदान केले. गेल्या वेळेस म्हणजे, २०१९ मध्ये लातूर जिल्ह्यात ६२.४४% मतदान झाले होते तर यावेळी २०२४ मध्ये जिल्ह्यात ६२.५९ टक्के लोकांनी मतदानाचा हक्क बजावला.

लातूर लोकसभेची जागा अनुसूचित जातीसाठी राखीव

महाराष्ट्रात लातूर लोकसभेसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान झाले. मराठवाड्यातील लातूर लोकसभा जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. या लोकसभा मतदारसंघात लातूर आणि नांदेड जिल्ह्यांचा समावेश होतो. लातूर लोकसभा मतदारसंघात ६ विधानसभा जागा आहेत. (निलंगा, अहमदपूर, लोहा, उदगीर, लातूर ग्रामीण आणि लातूर शहर).

२०१४ आणि २०१९ मध्ये मोदी लाटेचा परिणाम

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय झाला होता. भाजपचे सुधाकर तुकाराम श्रृंगारे यांनी काँग्रेसच्या मच्छिंद्र कामंता यांचा २,८९,१११ मतांनी पराभव केला. तुकाराम श्रृंगारे यांना ६६१,४९५, तर कामंत यांना ३,७२,३८४ मते मिळाली. तर वंचित बहुजन आघाडीचे राम गारकर १,१२,२५५ मते मिळवून तिसऱ्या क्रमांकावर राहिले. यापूर्वी २०१४ मध्ये येथे भाजपचे डॉ. सुनील गायकवाड विजयी झाले होते.

शिवराज पाटील ७ वेळा खासदार

लातूर लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. येथे १९६२ ते १९९९ (१९७७ वगळता) काँग्रेस पक्ष विजयी झाला. माजी लोकसभा अध्यक्ष शिवराज पाटील सलग ७ वेळा काँग्रेसच्या तिकिटावर लातूर लोकसभेतून खासदार झाले. २०२४ पूर्वी येथे झालेल्या १५ लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने ११ वेळा विजय मिळवला होता. एकदा किसान आणि मजूर पक्ष आणि ३ वेळा भारतीय जनता पक्षाने येथून विजय मिळवला आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४