लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना भेंडीची भाजी चपातीतून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना भेंडीची भाजी चपातीतून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना भेंडीची भाजी चपातीतून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Published Oct 06, 2024 09:51 AM IST

Latur Food Poisoning News : लातूर येथील एका शासकीय तंत्र निकेतन मधील मुलींना जेवणातून विषबाधा झाली आहे. जवळपास ६० मुली आजारी पडल्या असून त्यांच्यावर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना भेंडीची भाजी चपातीतून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू
लातूरमध्ये शासकीय वस्तीगृहातील ६० मुलींना भेंडीची भाजी चपातीतून विषबाधा; रुग्णालयात उपचार सुरू

Latur Food Poisoning News : लातूर येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनमधील मुलींना जेवणातून विषबाधा झाली आहे. कल रात्री भेंडीची भाजी, चपाती व वरण खाल्ल्यानंतर मुलींना त्रास होऊ लागला. तब्बल ६० मुलींना हा त्रास होऊ लागल्याने वस्तीगृह प्रशासनाची धावपळ उडाली. वसतीगृह प्रशासन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील काही कर्मचाऱ्यांनी आरोग्य विभागातील कर्मचारी यांनी आजारी मुलींना तातडीने लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू आहे. काहींच प्रकृती ही गंभीर आहे. तब्बल ३२४ मुलींपैकी ६० मुलींना विषबाधा झाली.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतनच्या वसतीगृहातील मुलींनी शनिवारी रात्री जेवण केले. जेवणात भेंडीची भाजी, चपाती, वरण, भात होता. ३२४ मुलींनी जेवण केल्यावर थोड्या वेळाने अचानक त्यांना त्रास होऊ लागला. काहींना उलट्या तर काहींना मळमळ, चक्कर येऊ लागले. एका मागोमाग मुलींना त्रास होऊ लागल्याने याची माहिती वसतिगृह प्रशासनाला आणि पोलिसांना देण्यात आली. तातडीने आजारी मुलांना विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. या ठिकाणी डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर मुलींना बरे वाटू लागले. सध्या सर्व मुलींची प्रकृती ही स्थिर आहे.

पुरणमल लाहोटी शासकीय तंत्रनिकेतन हे लातूर शहरातील औसा रोडवर आहे. या महाविद्यालयाच्या वस्तीगृहात ३२४ मुली असून त्यांनी शनिवारी रात्री ७ वाजता जेवण केले. त्यानंतर ८.३० वाजता त्यांना त्रास होऊ लागला. या घटनेची माहिती मिळताच प्राचार्य वसतिगृहात आले. त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाशी संपर्क साधत रुग्णवाहिका मागवली. यानंतर मुलींना दवाखान्यात दाखल करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे सर्व डॉक्टर रुग्णालयात आले व त्यांनी सर्व मुलींवर उपचार सुरू केले.

सर्व मुलींची प्रकृती चांगली

रुग्णालयात भरती करण्यात आलेल्या सर्व मुलींची प्रकृती चांगली आहे. सध्या ६० मुलींवर उपचार सुरू असून सर्व मुलींच्या आरोग्यावर देखरेख ठेवली जात आहे, अशी माहिती डॉ. उदय मोहिते यांनी दिली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर