Latur Rape : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या, लातूरमधील घृणास्पद प्रकार-latur crime 70 year old woman rape and murder by 31 year old man ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Latur Rape : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या, लातूरमधील घृणास्पद प्रकार

Latur Rape : ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून हत्या, लातूरमधील घृणास्पद प्रकार

Aug 26, 2024 08:14 PM IST

Laturcrime : लातूरमधीलऔसा तालुक्यातील एका गावातघृणास्पदघटना घडली आहे. येथे ३१ वर्षीय आरोपीने ७० वर्षीय वृद्धेवर बलात्कार करून तिची हत्या केली.

७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार
७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार

बदलापूरमधील दोन लहान मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यात खळबळ माजली असतानाच एका मागून एक अत्याचार आणि बलात्काराच्या घटना समोर येत आहेत. लहान मुलींसोबतच आत राज्यातील वृद्ध महिलाही असुरक्षित असल्याचे दिसत आहे. बदलापूर मधील चार वर्षीय चिमुकलीवर अत्याचाराची घटना ताजी असतानाच लातूरमध्ये ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

लातूरमधील औसा तालुक्यातील एका गावात ही घृणास्पद घटना घडली आहे. या घटनेनंतर संताप व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी भादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे.  मन्सूर सादिक होगाडे असं आरोपीचं नाव आहे.  

मन्सूर शेतमजूर असून त्यांच्या विचित्र स्वभावामुळे पत्नी त्याला सोडून गेली आहे. त्याची आईही बाहेर गावी गेली आहे. या दरम्यान त्यानं गावातील एका ७० वर्षीय वृद्ध महिलचं अपहरण करून तिच्यावर चार दिवस बलात्कार केला. त्यानंतर तिची हत्या केली. या नराधमानं महिलेच्या मृतदेहावरही बलात्कार केल्याचे सांगितलं जात आहे. 

आरोपीची आई चार दिवसानंतर घरी परतल्यावर तिला घरातून दुर्गंधी येत असल्याचं दिसलं. घरात कुजलेला मृतदेह असल्याचं लक्षात येताच तिने याची माहिती गावऱ्यांना दिली. याची माहिती मिळताच भादा, औसा आणि लातूर पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं. 

पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदन अहवालानंतरच घटनेतील सत्य उघड होणार आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. 

मुंबईतील कांदिवली येथे ३ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार -

मुंबईच्या कांदिवली येथून धक्कादायक घटना उघडकीस आली. शेजारी राहणाऱ्या तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी ३१ वर्षीय आरोपीला अटक केली आहे. याप्रकरणी आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीने याआधी असे कृत्य केले का, याचा पोलीस तपास करत आहेत.

आरोपी हा बेरोजगार असून त्याने पीडिता खेळण्याच्या बहाण्याने उचलून नेले. परंतु, आरोपी हा मुलीसोबत गैरवर्तणूक करत असल्याचे असल्याचे एका महिलेने पाहिले आणि मुलीला त्याच्या मांडीवरून हिसकावून घेतले. या मुलीच्या प्रायव्हेट पार्टवर जखमा आढळल्याने महिलेने मुलीचे आई- वडील आणि इतर शेजऱ्यांना याबाबत माहिती दिली.

 

 

विभाग