Solapur: मुलाचं लग्न तोंडावर असताना लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीचा सोलापूरच्या हॉटेलमध्ये गळफास
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Solapur: मुलाचं लग्न तोंडावर असताना लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीचा सोलापूरच्या हॉटेलमध्ये गळफास

Solapur: मुलाचं लग्न तोंडावर असताना लातूरमधील अधिकाऱ्याच्या पत्नीचा सोलापूरच्या हॉटेलमध्ये गळफास

Updated Nov 28, 2022 11:17 AM IST

Solapur suicide news : लातूरचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नी स्नेहलता प्रभू जाधव यांनी सोलापुरातील हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही.

स्नेहप्रभा जाधव
स्नेहप्रभा जाधव

सोलापूर : लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव हे त्यांच्या मुलाच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी सोलापुरात आले होते. मात्र, बस्ता खरेदी केल्यानंतर प्रभू जाधव हे कामानिमित्त पुन्हा लातूरला गेले असतांना त्यांची पत्नी स्नेहलता प्रभू जाधव यांनी हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महता केली. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे पुढील महिन्यात १८ डिसेंबर रोजी लग्न होते. त्याच्या लग्नाचा बस्ता खरेदीसाठी कर्नाटकातील चडचन या ठिकाणी गेले होते. त्यांनी बस्ता खरेदी केल्यावर ते शनिवारी रात्री उशीर झाल्याने दोघेही सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी होते. दरम्यान, प्रभू जाधव यांना रविवारी सकाळी कामानिमीत्त लातूरला गेले. स्नेहलाता या एकट्याच हॉटेलवर होत्या. त्यांनी लातूरमधील त्यांच्या नातेवाईकांना फोन केला. यावेळी त्यांनी रडत आयुष्य संपवत असल्याचे सांगितले. यानंतर त्यांनी फोन ठेवत हॉटेलमधील खोलीत साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाचे लग्न काही दिवसांवर असतांना अचानक त्यांनी टोकाचे पाऊल का उचलले या बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी कुठलीही नोत लिहून ठेवली नाही. त्यामुळे संभ्रम वाढला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर