मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन जण जागीच ठार, VIDEO

लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली, दोन जण जागीच ठार, VIDEO

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 09, 2024 03:46 PM IST

Car Accident : लातूर सोलापूर मार्गावर भरधाव कार रस्त्याकडेला असलेल्या हॉटेलात घुसली. यात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये हॉटेलमध्ये काम करणाऱ्या १४ वर्षीय मुलाचा समावेश आहे.

लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली
लातूरमध्ये भरधाव कार हॉटेलमध्ये घुसली

लातूर - सोलापूर महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कार थेट रस्त्याकडेला असणाऱ्या हॉटेलात घुसली. भरधाव कार हॉटेलात शिरल्याचा व्हिडिओ तेथे लागलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तसेच कारमधील चार जण जखमी झाले आहेत.

सोलापूर-लातूर महामार्गावरुन जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट औसा येथील सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसली. या अपघातात कारमधील दोघांचा उपचारासाठी नेत असताना रस्त्यातच मृत्यू झाला. तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर लातूरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये तीन जण कारमधील प्रवासी आहेत तर एक जण हॉटेलमधील कामगार आहे. चौघांचीही प्रकृती चिंताजनक आहे.

अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या अपघाताचा थरार हॉटेलसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लातूरकडे जाणारी कार भरधाव वेगाने हॉटेलमध्ये शिरली. या घटनेमुळे हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आलेल्या लोकांमध्ये दहशत निर्माण झाली होती.

लातूर-सोलापूर महामार्गावर सीएनजी पेट्रोल पंपाजवळ एका हॉटेलवर भरधाव कारने अचानक धडक दिली. हैदराबादहून लातूरकडे भरधाव वेगाने येणाऱ्या क्रेटा कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि भरधाव वेगात असलेली कार थेट हॉटेलवर जाऊन धडकली.

या अपघातात १४ वर्षीय हॉटेल कामगार ओंकार कांबळे याचे दोन्ही पायाला दुखापत झाली आहे. तर कारमधील दोघांचा मृत्यू झाला. कारमधील दोन गंभीर जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, ही दुर्दैवी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

IPL_Entry_Point