हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 08 Sep 202405:10 PM IST
Maharashtra News Live: Mumbai Accident : लोअर परळमध्ये कारची दुचाकीला धडक; एक ठार, दोन जण गंभीर जखमी
Mumbai Car and Bike Accident: मुंबईतील परळ येथे भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर, दोन जण जखमी झाले आहेत.
Maharashtra News Live: उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रातही परप्रांतियांना शेतजमीन खरेदी करण्यास मनाई करण्याची मागणी
Maharashtra: उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रातही परप्रांतियांना शेतजमीन खरेदी करण्यास मनाई करण्याची मागणी जनता दल (से) पक्ष व कोकण जनविकास समितीकडून करण्यात आली.
Maharashtra News Live: जळगावात भयंकर घडलं! लहान बहिणीसमोरच अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नंतर डोक्यात दगड घालून केली हत्या
Jalgaon Crime News : जळगावात शेतात लहान बहिणीसोबत गेलेल्या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली.
Maharashtra News Live: Kolhapur news : खळबळजनक! कोल्हापुरात लेसरमुळे तरुणाच्या डोळ्यातून रक्तस्त्राव तर पोलिस हवालदाराचा डोळा सूजला
Kolhapur news : कोल्हापूर येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उचगावमध्ये गणेश मंडळाच्या एका मिरवणुकीत लेसर वापरण्यात आल्याने या लेझरचया प्रखर किरणांमुळे तरुणाच्या डोळ्यांना इजा झाली आहे. तर एका पोलीसाचा डोळा देखील सुजला आहे.
Maharashtra News Live: मुलुंड येथे मोठ्या सोसायटीत घुसली तब्बल ९ फुटांची मार्श मगर! वनविभाग आणि RAWW नं राबावलं रेस्क्यू ऑपरेशन
crocodile rescued from a Mulund society : मुलुंड पश्चिम येथील निर्मल लाइफस्टाइल जवळील एका सोसायटीत आढळलेल्या मगरीला वनविभागाने आणि रेस्क्यू पथकाने पकडले असून तिला सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.
Maharashtra News Live: आज दीड दिवसांच्या गणरायाला निरोप!विसर्जनासाठी समुद्रात उतरतांना घातक माशांपासून रहा सावध; प्रशासनाचा इशारा
Ganesh Visarjan Government Warning: आज दीड दिवसांच्या गणरायला निरोप दिला जाणार आहे. या साठी अनेक जण समुद्रात उतरणार असल्याने त्यांना घातक माशांपासून सुरक्षित राहण्याचा व खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.