मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 6, 2024: Supriya Sule : " देवेंद्र तेरी खैर नही" विधानाबाबत सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, भाजपला हात जोडून विनंती...
Maharashtra News Live September 6, 2024: Supriya sule : " देवेंद्र तेरी खैर नही" विधानाबाबत सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण, म्हणाल्या, भाजपला हात जोडून विनंती...
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Supriya sule On Devendra fadnavis : फडणवीसांबाबतच्या केलेल्या विधानाविषयी स्पष्टीकरण देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, मी असं बोलल्याचा तुमच्याकडे काय पुरावा आहे का. मी हे सगळं कुठे बोलले याचा पुरावा द्या.
Maharashtra News Live: Maharashtra Rain Update -बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा. पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता
maharashtra weather update - बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही जिल्ह्यांत मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
gulabrao patil On Ajit pawar : पाणी पुरवठा विभागाच्या फाईल वारंवार पाठवूनही परत पाठवण्यात आल्याचं सांगत गुलाबराव पाटील यांनी अर्थखाते हे सर्वात नालायक खाते आहे, असे म्हणत संताप व्यक्त केला आहे.
Maharashtra News Live: 'शरद पवार जातीयवादाचं विद्यापीठ तर सुप्रिया सुळे किडकी बहीण, लिंबाच्या झाडापासून... ' भाजपा नेत्याची जहरी टीका
Gopichand padalkar on supriya sule : शरद पवार हे जातीयवादाचं विद्यापीठ आहे. सुप्रिया सुळे लहानपणीच हे सर्व शिकल्या आहेत. बाप तसा लेक आहे. लिंबाच्या झाडापासून गोड फळांची अपेक्षा करू नका, अशी जहरी टीका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
Maharashtra News Live: पोर्शे अपघात प्रकरणात आमदार सुनील टिंगरे यांचा संबंध? पोलीस आयुक्तांनी दिली खळबळजनक माहिती
पोर्शे कार अपघातात आरोपीला मदत केल्याच्या आरोपात पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चौकशी केली. या अपघात प्रकरणात आमदार टिंगरे यांचा थेट संबंध असल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याचे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले आहे.
Maharashtra News Live: अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणाचा तपास CBI कडे, हायकोर्टाने मुंबई पोलिसांना तपासातील त्रुटींवरून झापलं
Abhishek ghosalkar murder case : अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्विनी घोसाळकर यांनी केलेल्या याचिकेची दखल घेऊन हायकोर्टाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग केला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Politics : मुलीला नदीत फेकेन, जी बापाची झाली नाही, ती तुमची कशी होईल; अजित पवारांच्या मंत्र्याचा संताप
Dharmarao baba atram : जी मुलगी बापाची नाही झाली ती तुमच्या पक्षाची कशी होणार? माझ्याकडे दुधारी तलवार आहे, माझ्या वाटेला गेलात तर म्यानातून तलवार बाहेर काढणार. अशी प्रतिक्रिया धर्मरावबाबा आत्राम यांनी देत मुलगी शरद पवार गटात जात असल्याचे संकेत दिेले आहेत.
Jitendra Awhad: शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षातील नेते जितेंद्र आव्हाड यांंच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या महायुती सरकारची लाडकी बहीण योजनेबाबत जनतेची दिशाभूल केल्याचा आरोप आहे.
Maharashtra News Live: आरएसएस प्रमुख मोहन भागवत पुन्हा बोलले…. ‘देव झालो असं स्वतः म्हणू नका.’
मी देव झालो असं स्वतः म्हणून नका… असं वक्तव्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी दुसऱ्यांदा केलं आहे. ते पुण्यात एका कार्यक्रमात बोलत होते.
Maharashtra News Live: Mumbai Fire: मुंबईतील टाइम्स टॉवरला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी
Mumbai Times Tower Fire: मुंबईतील टाइम्स टॉवरला भीषण आग लागल्याची घटना उघडकीस आली. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Maharashtra News Live: Ganeshotsav 2024 : मुंबईत गणेशोत्सवात मेट्रो आणि बेस्ट बस रात्री उशिरापर्यंत धावणार
Metro and BEST Service: गणेशोत्सवात गणेश भक्तांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड आणि बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टने आपल्या वाहतुकीच्या वेळेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maharashtra News Live: Western Railway: पश्चिम रेल्वेवर उद्या मध्यरात्रीपासून १० तासांचा मेगाब्लॉक, लोकल सेवेवर परिणाम होणार!
Western Railway Announces Major 10-Hour Traffic Block: गोरेगाव आणि कांदिवली दरम्यान सहाव्या मार्गाच्या बांधकामासाठी पश्चिम रेल्वेवर उद्या मध्यरात्रीपासून १० तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Maharashtra News Live: Weather Updates: आज मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता; रायगड जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी
Maharashtra Weather Updates Today: मुंबई आणि ठाण्यात आज मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर, रायगड जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
jaydeep apte : मालवण न्यायालयाने जयदीप आपटेला पाच दिवसांची म्हणजे १० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. जयदीप आपटेच्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आपटेच्या वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली.