मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 5, 2024: Badlapur: बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Maharashtra News Live September 5, 2024: Badlapur: बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Thu, 05 Sep 202403:29 PM IST
Maharashtra News Live: Badlapur: बदलापूर पुन्हा हादरलं! ऐन गर्दीच्या वेळी रेल्वे स्टेशनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
Badlapur firing : एका व्यक्तीने रेल्वे स्थानकातच गर्दीच्या वेळेस दोन जणांवर गोळीबार केला. दोन ते तीन राऊंड फायर झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
Maharashtra News Live: Lalbaugcha Raja 2024 First Look: ही शान कुणाची...! लालबागच्या राजाची पहिली झलक आली समोर, पाहा VIDEO
Lalbaugcha Raja 2024 First Look: सर्व गणेश भक्त ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात होते तो क्षण आला आला आहे. मुंबईतील लालबागच्या राजाचं प्रथम दर्शन समोर आलं आहे.
Maharashtra News Live: Ladki Bahin Yojna: लाडक्या बहिणींना २००० रुपये देऊ; राहुल गांधी, शरद पवार यांच्यासमोरच खर्गेंची मोठी घोषणा
Ladki bahin yojana : आमचं सरकार सत्तेत आल्यास आम्ही लाडक्या बहीण योजनेत वाढ करून दोन हजार रुपये महिन्याला करू. अशी मोठी घोषणा मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगलीत भाषण करताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात केली.
Maharashtra News Live: Nagpur Accident : नागपूर- उमरेड मार्गावर ट्रक व बसचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू
Nagpur Accident : नागपूर-उमेरड मार्गावर भिवापूरजवळ भरधाव खासगी बस उभ्या असलेल्या ट्र्कला धडक देऊन शेतात पलटली. या अपघातात ४ प्रवाशांचा मृत्य़ू झाला असून १० ते १२ प्रवासी जखमी झाले आहेत.
Maharashtra News Live: Malad building collapse : मुंबई इमारतीचं काम सुरू असताना स्लॅब कोसळला, ४ कामगारांचा मृत्यू
Malad building collapse : मुंबईतील मालाड पूर्व येथील दिंडोशीमधील एका बांधकाम सुरु असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळून मोठी दुर्घटना घडली असून यात ४ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोन कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News Live: ॲम्बुलन्स नसल्याने चिमुकल्या मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांनी पायपीट; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
gadchiroli news: गडचिरोली येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. रुग्णवाहिका नसल्याने आई-वडिलांना मुलांचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायपीट करत गाव गाठावे लागले आहे.
Maharashtra News Live: Jaydeep Apte Arrest : जयदीप आपटेची 'अशी' मिळाली पोलिसांना टीप; घरात शिरताच रात्री सापळा रचून पोलिसांनी केली अटक
Jaydeep apte arrested : मालवणमधील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवणारा शिल्पकार जयदीप आपटे याला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याणमधील त्याच्या घरातूनच पोलिसांना जयदीप आपटेला अटक करण्यात आली आहे.
Ladki bahin yojana scam : सातारा येथे एका व्यक्तीने पत्नीच्या नावावर लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३० अर्ज भरून जास्तीत जास्त रक्कम लाटण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आरोपी पती व पत्नीला अटक केली आहे.
Maharashtra News Live: गणेशोत्सवासाठी चाकरमानी निघाले गावाला; मुंबई- गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी, वाहनांच्या ५ ते ७ किमी रांगा
Mumbai goa highway traffic update : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कोकणवासी घरी निघाले आहेत. यामुळे आज सकाळपासून मुंबई गोवा मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
Ballarpur crime : बदलापूर येथे दोन मुलींवर अत्याचाराची घटना ताजी असतांना आता बल्लारपूर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीच्या मित्राने मुलीला हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केंला. यानंतर मुलीने आत्महत्या केली.
Maharashtra News Live: Pune Traffic change : गणेशोत्सवानिमित्त पुण्यातील वाहतुकीत मोठा बदल; मध्यभागात अवजड वाहनांना बंदी
Pune Traffic change : पुण्यात शनिवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. या निमित्त मध्य भागात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतुकीत मोठा बदल करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra weather Update : विदर्भात पावसाचा जोर कायम! आज 'या' जिल्ह्यात जोरदार बरसणार; IMD चा यलो अलर्ट
Maharashtra weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला असला विदर्भात, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने आज विदर्भातील जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.