मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 4, 2024: Msrtc Employees Strike : बाप्पा पावला! एसटी कर्मचाऱ्यांकडून संप अखेर मागे, मूळ वेतनात घसघशीत वाढ!
Maharashtra News Live September 4, 2024: MSRTC Employees Strike : बाप्पा पावला! एसटी कर्मचाऱ्यांकडून संप अखेर मागे, मूळ वेतनात घसघशीत वाढ!
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 04 Sep 202404:52 PM IST
Maharashtra News Live: MSRTC Employees Strike : बाप्पा पावला! एसटी कर्मचाऱ्यांकडून संप अखेर मागे, मूळ वेतनात घसघशीत वाढ!
St employees strike : एसटी कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.
Shaktipeeth Expressway - शेतकऱ्यांचा विरोध पाहता कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी आणि नांदेड जिल्ह्यातील माहूरची (जि. नांदेड) रेणुकादेवी ही तीन शक्तिपीठांना जोडणारा नागपूर - गोवा ‘शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या हालचालींना वेग आला आहे.
Maharashtra News Live: Narayan rane : “उद्धव ठाकरेंनी तेव्हा मला फोन केलेला अन् म्हणाले.." नारायण राणे यांचा मोठा गौप्यस्फोट
Narayan rane on Uddhav Thackeray :उद्धव मला फोनवर म्हणाले की, आदित्यला सांभाळून घ्या, तुम्हालाही दोन मुले आहेत. यावेळी मी त्यांना तुम्ही तुमच्या मुलाला सायंकाळी सातनंतर घराबाहेर सोडू नका, असा सल्ला दिलेल्याचा गौप्यस्फोट राणे यांनी केला आहे.
Sandip Dhurve And Gautami Patil Video: विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप आमदार संदीप धुर्वे आणि गौतमी पाटील यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.
Maharashtra News Live: गणेशोत्सवाच्या काळात शालेय परीक्षा घेण्यास विरोध; जनता दलाचं शिक्षणमंत्र्यांकडे मांडला मुद्दा
Ganeshotsav 2024 : गणेशोत्सवाच्या काळात काही शाळांनी परीक्षा ठेवल्यामुळं पालकांची मोठी अडचण झाली आहे. जनता दल सेक्युलरनं हा मुद्दा शिक्षणमंत्र्याकडं उपस्थित केला असून शाळांना योग्य त्या सूचना देण्याची मागणी केली आहे.
Maharashtra News Live: Pune Crime: इन्स्टावर मुलीच्या नावाने महिनाभर चॅटिंग, तरुणाला भेटायला बोलावले अन् रस्त्यातच कोयत्याने केले सपासप वार
Pune crime news : दुचाकीवरुन आलेल्या तरुणावर हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले. त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्लेखोर दुचाकी घटनास्थळी सोडून पसार झाले आहेत.
Maharashtra News Live: Pune swarget crime : पुण्यात चाललयं काय ? खरेदीत व्यस्त असणाऱ्या अभियंता तरुणीची भररस्त्यात छेड काढून मारहाण; तरुणी जखमी
Pune swarget crime : पुण्यात गुन्हेगारीच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहे. एका अट्टल गुन्हेगाराने स्वारगेट येथे एका आयटी अभियंता तरुणीची भर रस्त्यात छेड काढून तिला मारहाण केली.
Maharashtra News Live: Jaydeep Apte : शिल्पकार जयदीप आपटे पोलिंसांच्या हाती लागेना! पोलिसांनी जारी केली लुक आउट नोटिस
Jaydeep Apte look Out Notice : मालवण येथे नौदल दिनानिमित्त उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. हा पुतळा तयार करणारा शिल्पकार जयदीप आपटे अद्याप फरार असून पोलिसांनी त्याच्या विरोधात लुक आउट नोटिस जारी केली आहे.
Maharashtra News Live: Pune Gultekadi murder : पुण्यात हत्यासत्र सुरूच! तीन दिवसांत तीन खून; जुन्या वादातून गुलटेकडी येथे तरुणाची हत्या
Pune Gultekadi murder : पुण्यात हत्यासत्र सुरूच आहे. मंगळवारी रात्री गुलटेकडी येथे जुन्या वादातून एका तरुणाचा खून करण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसातील ही तिसरी हत्या आहे.
Maharashtra News Live: Ambarnath News : बिस्किटाच्या मशीनमध्ये अडकून ३ वर्षांच्या मुलाचा मृत्यू; अंबरनाथ येथील घटना
Ambarnath News : अंबरनाथ येथे एक मनाला चटका लावणारी घटना घडली आहे. आई सोबत एका बिस्किट कंपनीत गेलेल्या मुलाचा तेथील मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
Maharashtra News Live: ST bus strike : एसटी संपामुळे कोकणवासीयांचे हाल!गणेशोत्सव काळात बसफेऱ्या रद्द झाल्याने आरक्षण केलेल्यांच्या अडचणीत वाढ
ST bus strike : गणेशोत्सव अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला आहे. या साठी कोकणात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, एसटी संपामुळे बसफेऱ्या रद्द झाल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची अडचण झाली आहे.
Pune saswad Crime news : पुण्यात सासवड येथे एक भयंकर घटना घडली आहे. गाडी कारखान्यात फोम मिक्सर मशीनमध्ये अडकून एका कामगाराचा मृत्यू झाला आहे. तर दूसरा जखमी झाला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पावसाची विश्रांती! विदर्भ वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. विदर्भ वगळला सर्व जिल्ह्यात आज हवामान सामान्य राहणार आहे. काही तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.