मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 3, 2024: Ladki Bahin Yojana Scam : ३० आधार क्रमांक वापरून ‘लाडकी बहीण’ योजनेत झोल, पठ्ठ्याने लढवलेली शक्कल पाहून सर्वच चक्रावले!
Maharashtra News Live September 3, 2024: Ladki Bahin Yojana Scam : ३० आधार क्रमांक वापरून ‘लाडकी बहीण’ योजनेत झोल, पठ्ठ्याने लढवलेली शक्कल पाहून सर्वच चक्रावले!
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Tue, 03 Sep 202402:09 PM IST
Maharashtra News Live: Ladki Bahin Yojana Scam : ३० आधार क्रमांक वापरून ‘लाडकी बहीण’ योजनेत झोल, पठ्ठ्याने लढवलेली शक्कल पाहून सर्वच चक्रावले!
Ladki Bahin Yojana Scam : एका व्यक्तीने पत्नीच्या नावे लाडकी बहीण योजनेचे तब्बल ३० अर्ज भरल्याचा प्रकार समोर आला आहे. सातारा येथील एका पठ्ठ्याने चक्क ३० अर्ज दाखल करत सरकारचे हजारो रूपये लाटले आहेत.
Maharashtra News Live: ‘फोटोंना काय जोडे मारता, हिंमत असेल तर..’; अजित पवारांच्या आव्हानाला सुषमा अंधारेंचे तिखट प्रत्युत्तर
Sushma andhare on ajit pawar : राज्याचे एक उपमुख्यमंत्री म्हणतात, की हिंमत असेल तर समोरासमोर येऊन जोडे मारा. खरं तर शहाण्याला शब्दाचा मार असतो, असा टोला अंधारे यांनी अजित पवारांना लगावला आहे.
Maharashtra News Live: IIT Bombay Placements : मुंबई आयआयटीतून उत्तीर्ण २२ विद्यार्थ्यांना मिळाली वर्षाला १ कोटी पगाराची नोकरी
IIT Bombay Placements : देशातील आघाडीच्या शैक्षणिक संस्था असलेल्या मुंबई आयआयटीतून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना मोठ्या पगाराच्या नौकऱ्या मिळाल्या आहेत.
Maharashtra News Live: Hadapsar murder: मोबईल हॉटस्पॉट न दिल्याच्या कारणाने दारूच्या नशेत चौघांनी मॅनेजरचा केला खून; हडपसर येथील धक्कादायक घटना
Hadapsar Murder : पुण्यात शतपावलीसाठी रात्री निघालेल्या एका मॅनेजरचा चौघांनी कोयत्याने वार करून खून केला. मोबाइल हॉटस्पॉट न दिल्याने त्यांची हत्या करण्यात आली.
Maharashtra News Live: मृत्यूशी झुंज अपयशी पण.. हृदय अजूनही धडधडतंय! पत्रकार प्रसाद गोसावी यांनी मृत्यूनंतर अवयव दान करत ५ जणांना दिले जीवनदान
Prasad Gosavi : पुण्यातील एका न्यूज पोर्टलचे वरिष्ठ वार्ताहर प्रसाद गोसावी यांना ब्रेनडेड घोषित केल्यावर त्यांचे अवयव दान करण्यात आले. मृत्यूनंतर काही तासातच त्याचे हृदय पुण्याच्या सदर्न कमांड हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. या ठिकाणी एका लष्करी जवानांवर हृदयरोपण शस्त्रक्रिया करण्यात आली.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : मराठवाडा व विदर्भात पावसाचा जोर कायम! IMD चा 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Weather Update : पावसाने, विदर्भ आणि मराठवाड्यात कहर गाठला आहे. आज देखील राज्याच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.