मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 29, 2024: Akshay Shinde Funeral : अक्षय शिंदेवर अखेर अंत्यसंस्कार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरातील स्मशानभूमीत दफनविधी
Maharashtra News Live September 29, 2024: Akshay Shinde Funeral : अक्षय शिंदेवर अखेर अंत्यसंस्कार; कडेकोट पोलीस बंदोबस्तात उल्हासनगरातील स्मशानभूमीत दफनविधी
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Akshay Shinde Funeral : कडेकोट पोलीस बंदोबस्तात सायंकाळी ६ वाजण्याच्या दरम्यान अक्षय शिंदेला दफन करण्यात आले. स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे शांतीनगर स्मशानभूमी परिसरात तणाव निर्माण झाला होता.
assembly election 2024 : भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रकुमार गावित यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत शहादा-तळोदा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढण्याचा इरादा जाहीर केला आहे.
Maharashtra News Live: दसऱ्याला आणखी एका मेळाव्याची भर..! मनोज जरांगे आता दसरा मेळावा घेणार? भव्य शक्तिप्रदर्शनाची तयारी
Jarange Patil dasara melava : मनोज जरांगे पाटील दसऱ्याला भव्य मेळावा घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोज जरांगे पाटील जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असून याची तयारीही सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News Live: देवेंद्र फडणवीसांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी एकनाथ शिंदे.., सुषमा अंधारे यांचा मोठा गौप्यस्फोट
Sushma Andhare On Devendra Fadnavis : एकनाथ शिंदे यांना ज्या देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसवले, तेच एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांना राज्याच्या राजकारणातून हद्दपार करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. असा खळबळजनक दावा सुषमा अंधारे यांनी केला आहे.
Maharashtra News Live: Pune Metro: पुण्यातील भूमिगत मेट्रोला पीएम मोदींनी दाखवला हिरवा झेंडा! आज पासून सेवा सुरू, असे असणार दर
Pune Metro: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या मार्गाचे लोकार्पण झाले आहे. आज संध्याकाळी ४ वाजता हा मार्ग प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला जागा मिळेना; बदलापूर, ठाणे, कळवानंतर आता अंबरनाथमध्ये विरोध!
Akshay Shinde : बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर होऊन पाच दिवस उलटून देखील अद्याप त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार झालेले नाही. बदलापूर, ठाणे व कळवानंतर आता अंबरनाथमधील हिंदूस्मशानभूमीत देखील त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारा विरोधाचे बॅनर लावण्यात आले आहेत.
Maharashtra News Live: मुंबईकरांनो लक्ष द्या! आज तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक, काही गाड्या रद्द, तर काही उशिरा; असे आहे वेळापत्रक
Mumbai megablock : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. त्यामुळे काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे तर काही गाड्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहेत.
Maharashtra News Live: Pune Metro : पुणेकरांना मिळणार आज भुयारी मेट्रो! पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते दुरदृश्य प्रणालीने होणार उद्घाटन
Pune Metro : पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण होऊन जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानक या अंतिम भुयारी मार्गाचे पंतप्रधान आज नरेंद्र मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.