मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 27, 2024: अक्षय शिंदेच्या वडिलांची पोलीस संरक्षणाची मागणी; अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र
Maharashtra News Live September 27, 2024: अक्षय शिंदेच्या वडिलांची पोलीस संरक्षणाची मागणी; अमित शाह, देवेंद्र फडणवीसांना लिहिलं पत्र
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Maharashtra News Live: निवडणूक आयोगाचे महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र, अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मागितलं स्पष्टीकरण
Election Commission of India: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत स्पष्टीकरण मागितले आहे.
Maharashtra News Live: शालेय पोषण आहारातील चॉकलेटमध्ये आढळल्या अळ्या, धुळे जिल्हा परिषद शाळेतील धक्कादायक प्रकार
Worm Found in Poshan Aahar: धुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना पोषण आहारासह दिल्या जाणाऱ्या चॉकलेटमध्ये अळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
Badlapur Rape Case: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या अंत्यविधीसाठी परवानगी मिळावी, अशी याचिका त्याच्या कुटुंबीयांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली.
Maharashtra News Live: पुण्यातील प्राध्यापकाच्या मुलीवर अत्याचार करणारे आरोपी बड्या बापाची मुलं, धंगेकरांच्या आरोपामुळे खळबळ
Pune Crime News: पुण्यातील एका मोठ्या आणि प्रसिद्ध महाविद्यालयातील एका अल्पवयीन मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अंदर रवींद्र धंगेकर यांनी पुणे पोलिसांना पत्र लिहीत गंभीर आरोप केले आहे.
Maharashtra News Live: मंत्रालयात फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोडीचा प्रयत्न, कोण होती ती महिला?
राज्याचा गाडा हाकला जाणाऱ्या मंत्रालयातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची तोडफोड करण्याचा प्रयत्न झाल्याचं समोर आलं आहे.
Maharashtra News Live: पुण्यात पावसाने मोडला १८९६ चा विक्रम! सप्टेंबर महिन्यात ८६ वर्षांच्या विक्रमही मोडला, एकाच दिवसात १३३ मीमी पावसाची नोंद
Pune record break rainfall : पुण्यात बुधवारी तब्बल १३३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या ८ दशकातील सर्वाधिक पावसाची नोंद एकाच दिवसांत झाली आहे. तर १८९६ नंतर बुधवारी एका दिवसांत १३३ मीमी पावसाची नोंद झाली आहे.
Maharashtra News Live: आनंद दिघेंना बाळासाहेब ठाकरे यांच्यापेक्षाही मोठं दाखवण्याचा खटाटोप; ठाकरेंच्या खंद्या शिलेदाराचा आरोप
Sanjay Raut on dharmaveer movie : आनंद दिघे यांच्यावरील 'धर्मवीर ३' या चित्रपटाची पटकथा मी लिहिणार असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर खासदार संजय राऊत यांनी घणाघाती टीका केली आहे.
Maharashtra News Live: बांगलादेशी पॉर्न स्टारला उल्हासनगरमधून अटक! रिया बर्डे बनून खोट्या कागदपत्राच्या आधारावर करत होती वास्तव्य!
Porn Star Riya Barde Arrested: पॉर्न स्टार रिया बर्डे हिला महाराष्ट्र पोलिसांनी उल्हासनगर येथून अटक केली आहे. चौकशीत ती बांगलादेशी असल्याचे निष्पन्न झाले. पॉर्न जगतात रियाला आरोही बर्डे किंवा बन्ना शेख या नावाने ओळखले जाते.
Maharashtra News Live: मेट्रोवरून पुण्यात राजकारण तापलं! महाविकास आघाडीच्या वतीने आज भुयारी मेट्रो मार्गाचं उद्घाटन; सरकारचा करणार निषेध
Pune metro inauguration politics : पुण्यात मेट्रोच्या उद्घाटणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहे. पीएम मोदी यांचा दौरा रद्द झाल्याने मेट्रोचे उद्घाटन रखडले आहे. त्यामुळे आज महाविकास आघाडीतर्फे मेट्रोचे उद्घाटन केले जाणार आहे.
Akola gang rape Crime : अकोला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अकोल्यात वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून १५ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.
Kolhapur ST Bus stop murder : कोल्हापुरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. धावत्या बसमध्ये जावयाचा सासू सासऱ्यांनी मिळून गळा आवळून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Maharashtra News Live: Pune Metro: पुणे मेट्रोच्या उद्घाटनाला नवा मुहूर्त! पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी व्हीडीओ कॉन्फरन्सद्वारे करणार उद्घाटन
Pune Metro Update : पुणे मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. मात्र, पावसामुळे त्याचा दौरा रद्द झाला होता. आता रविवारी मोदी हे पुणे मेट्रोचे उद्घाटन करणार आहे.
Maharashtra News Live: पुण्यात जुगार अड्यावर पोलिसांचा छापा; अटक होण्याच्या भीतीने एकाने मारली इमारतीवरुन उडी, जागीच मृत्यू
Pune Crime : पुण्यात पोलिसांनी बुधवारी रात्री १० च्या सुमारास नाना पेठेतील एका इमारतीत सुरू असलेल्या जुगार अड्यावर टाकलेल्या छाप्यातून पोलीसांपासून वाचण्यासाठी एकाने थेट इमारतीवरुन उडी मारली. यात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर कमी होणार! आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर कमी होणार आहे. शनिवार पासून पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता आहे. असे असले तरी आज शुक्रवारी राज्यात काही भागात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे.
maratha reservation : मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे यांनी ९ दिवसानंतर आपले उपोषण मागे घेतले. सरकार या उपोषणाची दखल घेत नसल्याने लातूरमधील पती-पत्नीने टोकाचे पाऊल उचलत विष प्राशन केलं आहे.