मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 25, 2024: मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजेस उद्या बंद राहणार, सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेचा निर्णय
Maharashtra News Live September 25, 2024: मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजेस उद्या बंद राहणार, सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेचा निर्णय
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 25 Sep 202404:35 PM IST
Maharashtra News Live: मुंबईतील सर्व शाळा, कॉलेजेस उद्या बंद राहणार, सुरक्षेचा उपाय म्हणून महापालिकेचा निर्णय
भारतीय हवामान विभागानं दिलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या (गुरुवार, २६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, ठाण्यासह परिसरात आज बुधवार सायंकाळपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस सुरू आहे. परिणामी मुंबई शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra News Live: Pune Rain : पुण्यात धुवाँधार! पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप, अनेक सोसायटींमध्ये शिरलं पाणी
Weather Update : मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक भागाला आज जोरदार पावसाने झोडपून काढले. पुण्यात ३ तासात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे.
Maharashtra News Live: गर्भलिंग निदान करून गर्भवती महिलेचा गर्भपात; मात्र विवाहित महिला जीवनिशी गेली, इंदापुरातील धक्कादायक घटना
indapur News : गर्भलिंग निदानात मुलीचा गर्भ असल्याचे समोर आल्यानंतर विवाहितेचा गर्भपात करण्यात आला. हा गर्भपात घरीच केल्याचा आरोप मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde: अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला बदलापूरकरांचा विरोध, ‘या’ कारणामुळे अग्नी न देता मृतदेह पुरण्याचा निर्णय!
Akshay shinde cremation : आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूरमध्ये राहत असल्याने त्याच्यावर नगरपालिकेच्या स्मशानभमीत अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे. मात्र याला नागरिकांकडून कडाडून विरोध केला जात आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेनं गोळीबार केला, यावर विश्वास ठेवणं कठीण; मुंबई उच्च न्यायालयानं पोलिसांना फटकारलं
Bombay High Court on Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांचे म्हणणे मान्य करणे अवघड असून, याला एन्काऊंटर म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे.
Maharashtra News Live: बदलापूर प्रकरणातील ताजी माहिती धक्कादायक! शाळेच्या ट्रस्टींचा चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग? कोर्टात याचिका दाखल
Akshay Shinde encounter: बदलापूर शाळेच्या ट्रस्टींचा मानवी तस्करी आणि चाईल्ड पॉर्नोग्राफीत सहभाग होता, अशी मुंबई उच्च न्यायालयात याचिक दाखल करण्यात आली.
Maharashtra News Live: Weather Updates: रायगड जिल्ह्यात आज रेड अलर्ट; मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाचा इशारा
Maharashtra Weather Updates: आज रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde encounter : अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, एन्काउंटर प्रकरणी SIT चौकशीची मागणी
Badlapur accused encounter: बदलापूर शहरातील एका शाळेत दोन मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेला पोलिसांनी चकमकीत ठार केले. त्यानंतर त्याच्या वडिलांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.