मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 24, 2024: मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठी भेट; पहिल्या भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण, वाचा सविस्तर
Maharashtra News Live September 24, 2024: मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठी भेट; पहिल्या भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण, वाचा सविस्तर
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Tue, 24 Sep 202404:44 PM IST
Maharashtra News Live: मुंबईकरांना लवकरच मिळणार मोठी भेट; पहिल्या भूमिगत मेट्रोच्या उद्घाटनाची तयारी पूर्ण, वाचा सविस्तर
Mumbai underground metro : कुलाबा-सीप्झ-आरे दरम्यान ३३.५ किमी लांबीचा भूमिगत मेट्रो कॉरिडॉर आहे. त्यापैकी आरे कॉलनी-वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स या साडेबारा किलोमीटरच्या रस्त्याचे उद्घाटन ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: Thane news : चारित्र्याच्या संशयातून पतीकडून मानसिक व शारीरिक त्रास, विवाहितेने उचललं टोकाचं पाऊल
Thane news : तु मला आवडत नाहीस, तुझे बाहेर कोणासोबत तरी अनैतिक संबंध सुरू आहेत, अशा वारंवारच्या टोमण्यांमुळे विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपवले आहे. ही घटना शहापूर तालुक्यात घडली.
Maharashtra News Live: पवारसाहेबच आमचे दैवत, आम्ही चुकलो तर...; करमाळ्यात जनसन्मान यात्रेवेळी अजित पवार काय बोलून गेले
Ajit Pawar on Sharad Pawar : आजवर शरद पवारांच्या सोबतच काम केलं. आता योग्य रस्त्यानं जात असून त्यात जर आमचं काही चुकलं तर आमचा कान धरा. शरद पवार हे आमचे दैवत असल्याचं विधान अजित पवारांनी केलं आहे.
Maharashtra News Live: हे चित्रपटाच्या लॉन्चिंगसाठी केले का? अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी ठाकरे गटाचा सवाल, कोर्टात जाण्याचा इशारा
Akshay shinde encounter : जेव्हा अक्षय शिंदेकडून गोळी झाडली जाते तेव्हा ती पायावर झाडली जाते मात्र जेव्हा पोलीस गोळी झाडतात तेव्हा ती थेट डोक्यात लागते हे समजण्याच्या पलीकडचं आहे, असा सवाल करत सुषमा अंधारे यांनी याप्रकरणी कोर्टात जाण्याचा इशारा दिला आहे.
Maharashtra News Live: पुण्यात कॅडबरीमध्ये आढळली अळी! कंपनीकडे तक्रार केल्यावर मिळाले 'हे' उत्तर
worm found in cadbury : पुण्यात कॅडबरीत अळी आढळली आहे. पुण्यातील महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अक्षय जैन यांनी या बाबतचा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Maharashtra News Live: आशिष शेलार यांच्यापुढं तगडं आव्हान; वांद्रे पश्चिम विधानसभेतून माजी खासदार प्रिया दत्त रिंगणात उतरण्याची शक्यता
Priya dutt to fight assembly election : मुंबईतील वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. आशिष शेलार यांच्याशी त्यांची लढत होऊ शकते.
LLB Student Allegedly Harassing Minor Girl: धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एएलबीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra News Live: हात बांधले होते, तोंडावर बुरखा होता; तरीही अक्षय शिंदेनं पोलिसांवर हल्ला कसा केला? प्रश्नांची मालिका संपेना!
Sanjay Raut on Akshay Shinde Encounter : हात बांधलेले असताना व तोंडावर बुरखा असताना कोणी पोलिसांवर हल्ला कसा करेल, असा प्रश्न संजय राऊत यांनी केला आहे.
Maharashtra News Live: पुण्यातील व्यापाऱ्याची कर्नाटकात हत्या! पत्नी समोरच मारेकऱ्यांनी संपवलं; हत्येमागे अंन्डरवर्ल्ड कनेक्शन ?
pune businessman murdered in karnataka : पुण्यातील एका व्यापाऱ्याची कर्नाटकात त्याच्या पत्नीसमोर हत्या करण्यात आली. खून झालेल्या व्यापारी कर्नाटकातील कारवार जिल्ह्यातील हंकोन येथे राहत होता. रविवारी झालेल्या या घटनेत त्यांची पत्नीही गंभीर जखमी झाली आहे.
Maharashtra News Live: Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेला ठार मारणारे कोण आहेत एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे ? वाचा
who is encounter specialist sanjay shinde: बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्यआरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याला एन्काऊंटर स्पेशालिस्ट संजय शिंदे यांनी ठार मारले. संजय शिंदे हे यापूर्वी ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी कक्षात कार्यरत होते.
Maharashtra weather update : राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रात काही जिल्ह्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: न्यायदानाची बदललेली संकल्पना म्हणजे 'न्याय आपल्या दारी', हायकोर्ट संकुलाच्या भूमिपूजन प्रसंगी सरन्यायाधीशांचे वक्तव्य
High Court Complex : सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, वांद्रे येथील ही नवीन इमारत पुढील १०० वर्षासाठी पक्षकार, वकील मंडळी, न्यायाधिशांकरिता योगदान देणारी असेल.