मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 22, 2024: Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
Maharashtra News Live September 22, 2024: Mumbai: अंधेरीचा राजाच्या विसर्जनादरम्यान भाविकांची बोट उलटली; थरारक घटनेचा व्हिडिओ समोर
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Maharashtra News Live: Mumbai Boy Rape: आता मुलेही सुरक्षित नाहीत! पालकांना जीवे मारण्याची धमकी देत ८ महिने अत्याचार
Mumbai Minor Boy Rape: मुंबईत १३ वर्षाच्या मुलावर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी एका जणाला अटक केली आहे. ही घटना मुंबईतील मुलुंड परिसरातील सार्वजनिक शौचालयात घडली.
Maharashtra News Live: वडगावशेरी येथे पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने तरुणाचा मृत्यू
Pune Vadgaon Sheri : वडगावशेरी येथे आज सकाळी १० च्या सुमारास पैगंबर जयंती निम्मित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत हाय टेन्शन वायरचा धक्का लागल्याने एका तरुणाचा भाजून मृत्यू झाला.
Nitin Gadkari on Pune Mumbai express way : नितीन गडकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे मुंबई पुणे आणि पुणे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असून हे खड्डे पुढील तीन महिन्यात बुजवा असे नितीन गडकरी यांनी सरकारला म्हंटलं आहे.
Lalbaugcha Raja's Gold and Silver Auction : लालबागचा राजाला भाविकांनी अर्पण केलेल्या सोन्या चांदीचा लिलाव करण्यात आला असून यातून मोठी रक्कम देवस्थानाला मिळाली आहे. ही रक्कम लोकहिताच्या उपक्रमांसाठी वापरली जाणार आहे.
MPCB serves notice to Mercedes-Benz : एमपीसीबीचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी चाकण येथील मर्सिडीज बेंझ प्रकल्पाला भेट दिल्यानंतर महिनाभरानंतर शुक्रवारी पर्यावरणाच्या नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे.
Beed Ambajogai Swift and Container Accident: बीडमध्ये आज पहाटेच्या सुमारास भीषण अपघात घडला आहे. ही घटना अंबाजोगाई लातूर रोडवर नांदगाव पाटीजवळ घडली. स्विफ्ट कार आणि कंटेनरचा भीषण अपघात चौघे ठार झाले आहेत.
Maharashtra News Live: pune potholes : पुण्यातील खड्ड्यांवर थेट राष्ट्रपतींनी केली नाराजी व्यक्त! पुणे पोलिसांना पत्र लिहीत म्हटलं....
pune potholes : पुण्यातील खड्ड्यांची दखल थेट राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी घेतली आहे. त्यांनी थेट पुणे पोलिसांना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे पुण्यात पंत प्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी रस्ते दुरुस्ती करावी असे पत्र पोलिसांनी पालिकेला दिले आहे.
Maharashtra News Live: Parbhani Latur Rain : परभणी, लातूरला पावसाने झोडपले! काही तास झालेल्या पावसामुळे रस्ते जलमय
Parbhani Latur Rain : परभणी, लातूरला सलग दोन दिवस पावसाने झोडपले. शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे काही तासांत रस्ते जलमय झाले आहे. पुढील काही दिवस मराठवाड्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.