मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 21, 2024: थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...
Maharashtra News Live September 21, 2024: थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 21 Sep 202404:15 PM IST
Maharashtra News Live: थरकाप उडवणारी घटना! महिलेची हत्या करून मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये ठेवले आणि मग...
Bengaluru Women Murder News: बंगळुरूमध्ये एका महिलेची हत्या करून तिच्या मृतदेहाचे २० तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवल्याचे प्रकार समोर आला आहे.
Maharashtra News Live: Mumbai University: मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक उद्याच घ्या, मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
Mumbai University Senate Elections: मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका नियोजित वेळापत्रकानुसार २२ सप्टेंबर २०२४ ला घेण्याचे मुबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत.
Maharashtra News Live: Dharavi Masjid Demolition: सरकारकडून धारावीत अनुचित प्रकार घडविण्याचा प्रयत्न, आदित्य ठाकरेंचा आरोप
Aaditya Thackeray On Dharavi Masjid Demolition: मशिदीचा 'बेकायदा' भाग पाडण्यापासून स्थानिकांनी महापालिकेला रोखल्याने धारावीत तणाव निर्माण झाला आहे. यावरून ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.
Maharashtra News Live: प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीनं मुलींसमोरच पत्नीने केली हत्या; घरात चोरीचा रचला बनाव, पुण्यातील घटना
Pune karve nagar murder : पुण्यात कर्वेनगर येथे एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीची पत्नीने प्रियकरच्या मदतीने हत्या केली.
Maharashtra News Live: आघाडी आणि युतीच्या वाटाघाटी सुरू असताना प्रकाश आंबेडकरांचा धमाका; ११ उमेदवारांच्या नावांची घोषणा
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी सत्ताधारी महायुती व महाविकास आघाडीतील पक्षांचं जागावाटप अद्याप पूर्ण झालेलं नसताना प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीनं ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
Maharashtra News Live: धारावी पुनर्विकासातून महाराष्ट्र सरकारला मिळणार ५ ते १० हजार कोटी; कसे वाचा!
धारावी पुनर्विकासाच्या प्रक्रियेत अपात्र ठरलेल्या रहिवाशांची दोन उपवर्गात विभागणी करून त्यांना परवडणाऱ्या दरात घरे देण्याची तसंच, भाड्यानं देण्याची योजना आहे. त्यातून राज्य सरकारला ५ ते १० हजार कोटी मिळू शकतात, असा अंदाज आहे.
Maharashtra News Live: मी त्याला संपवणार! बहिणीला सांगून भावाचा केला खून; मित्रांना अटक, हडपसर येथील घटनेने खळबळ
Pune Hadapsar murder : पुण्यात हडपसर येथे एका मुलीच्या भावाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपींना अटक करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, ग्रामस्थांच्या आग्रहानंतर घेतले उपचार
Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवली येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली. ग्रामस्थांनी त्यांना उपचार घेण्यास आग्रह केल्यानंतर त्यांनी उपचार घेतले.
Maharashtra News Live: मुंबईकरांनो रविवार बाहेर पडणार असाल तर ही बातमी वाचा! तिन्ही रेल्वेमार्गावर १० तासांचा मेगाब्लॉक; अनेक लोकल रद्द
Mumbai local mega Block : मुंबईत आज रात्री १२ पासून उद्या १० पर्यंत तिन्ही मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे यामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्या या उशिराने धावणार आहेत.