मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 20, 2024: मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील It नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द
Maharashtra News Live September 20, 2024: मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Fri, 20 Sep 202402:51 PM IST
Maharashtra News Live: मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला मोठा झटका; फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द
Mumbai high court : आयटी नियमातील बदलांमुळे भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन झाले असल्याचे म्हणत मुंबई हायकोर्टाने फॅक्ट चेकसंदर्भातील IT नियमांमधील २०२३ च्या दुरुस्त्या रद्द केल्या आहेत.
Maharashtra News Live: धक्कादायक.. रस्त्याला भगदाड पडल्यानं बघता-बघता पुणे महानगरपालिकेचा अख्खा ट्रकच खड्ड्यात गाडला! पाहा VIDEO
Pune news : ट्रक मागे घेत असताना ४० ते ५० फूट खाली खड्ड्यात पडल्याने व पाहता पाहता संपूर्ण गाडला गेल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. ही घटना नेमकी कशामुळे घडली? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
Maharashtra News Live: नांदेडमध्ये भाजपाला मोठा धक्का, अशोक चव्हाणांचे मेव्हुणे भास्करराव खतगावकरांची काँग्रेसमध्ये घरवापसी
bhaskarrao khatgaonkar : माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, मीनल खतगावकर, माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा, माजी आमदार अविनाश घाटे यांच्यासह अनेक नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्यांनी आज (शुक्रवार) टिळक भवन दादर येथे काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
Maharashtra News Live: Jalna Accident : जालन्यात बस-ट्रकचा भीषण अपघातात ५ ठार १४ जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भीती; दोन्ही वाहनांचा चक्काचूर
Jalna Accident : जालन्यात ट्रक आणि बसचा भीषण अपघात झाला आहे. ही घटना वडीगोद्री मार्गवारील शहापूर येथे आज सकाळी घडली. गेवराईकडून अंबडकडे जाणारी बस व मोसंबी भरुन येणाऱ्या ट्रकची समोरा समोर धडक झाल्याने हा अपघात झाला.
Maharashtra News Live: विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदी आज वर्ध्यात; भूमिपूजन आणि उद्घाटनांचा धडाका
Narendra Modi in Wardha : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून वर्धा इथं त्यांच्या उपस्थितीत पंतप्रधान विश्वकर्मा कार्यक्रमाचा पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे.
Maharashtra News Live: नागपूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठी दुर्घटना; आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिला भाजल्या
Nagpur umrkhed news : नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे मोठी दुर्घटना घडली. गुरुवारी गणेश विसर्जन मिरवणुकीत आकाश बॉम्ब गर्दीत फुटल्याने ११ महिल्या जखमी झाल्या आहेत.
Viral news : तुम्ही ऑनलाइन गेमच्या अनेक जाहिराती पहिल्या असतील. यात तुम्हाला ऑनलाइन गेम खेळून पैसे कमवण्याचे आमिष दाखवलं जातं. हे गेम खेळण्यास सुरुवात केल्यावर याचं व्यसन जडतं. व यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होतात. अशीच एक घटना सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
Maharashtra News Live: Maharashtra weather Update : मराठवाडा, विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता! मुंबई, पुण्यात असे असेल वातावरण
Maharashtra weather Update : राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात चढ उतार होत आहे. राज्यात पावसाने विश्रांती घेतली होती. मात्र, पाऊस पुन्हा राज्यात पुनरागमन करणार आहे. पुढील काही दिवस, वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.