मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 2, 2024: मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, सहा जिल्ह्यातील व्यापाराला मिळणार चालना
Maharashtra News Live September 2, 2024: मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, सहा जिल्ह्यातील व्यापाराला मिळणार चालना
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 02 Sep 202405:09 PM IST
Maharashtra News Live: मुंबई-इंदूर नवीन रेल्वे मार्ग प्रकल्पाला मंजुरी; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय, सहा जिल्ह्यातील व्यापाराला मिळणार चालना
Mumbai-Indore New Railway Project : महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांमधील या प्रकल्पाअंतर्गत सहा जिल्ह्यांचा समावेश असेल आणि भारतीय रेल्वेच्या सध्याच्या जाळ्यामध्ये सुमारे ३०९ किलोमीटरची भर पडेल.
Maharashtra News Live: लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी अपडेट; सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, ३१ ऑगस्टनंतर आता महिलांना...
Mukhyamantri mazi ladki bahin yojana : राज्यातील अधिकाधिक महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता यावा यासाठी सरकारकडून आणखी मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे. याबाबत सरकारी निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: मंगळवेढ्यात तीन मित्रांकडून विवाहितेवर बलात्कार; महिलेनं संपवलं आयुष्य, मोबाईलमधून समोर आला खरा प्रकार
Solapur crime news : आत्महत्या करण्यापूर्वी महिलेने आपली चप्पल व मोबाईल तलावाच्या काठावर ठेवला होता. या मोबाईलमधील कॉल हिस्ट्री तपासल्यानतर समोर प्रकार समोर आला.
Maharashtra News Live: भाजप आमदार गोळीबार प्रकरणाचा वाद पुन्हा उफळला; बिल्डर बंदूका, कोयते आणि गावगुंडांना घेऊन आला, अंबरनाथमध्ये राडा
land dispute shooting case : अंबरनाथमधील वादग्रस्त जागेचा कब्जा घेण्यासाठी एक बिल्डर गावगुंडांसह, बंदुका आणि अन्य हत्यारं घेऊन गेला होता. याची माहिती मिळताच महेश गायकवाड यांनी पोलिसांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली.
Maharashtra News Live: ST Bus Strike: ऐन गणेशोत्सव काळात लालपरीची चाके थांबणार! एसटी कर्मचारी उद्यापासून पुन्हा संपावर, आता काय आहेत मागण्या?
ST employees strike : आर्थिक बाबी, खासगीकरण अशा विविध मागण्या विधानसभेची आचारसंहिता लागण्याआधी मान्य करा, असा इशारा देत एसटी कर्मचारी संघटनेने उद्यापासून (मंगळवार) बेमुदत संप पुकारला आहे.
Maharashtra News Live: Vanraj Andekar Murder : वनराज आंदेकरच्या हत्येत मोठा ट्विस्ट! बहिणी व मेहुण्यान केला गेम; आरोपींना अटक
Vanraj Andekar Murder : राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर रविवारी १३ जणांनी बंदुका आणि कोयत्याने हल्ला करत खून केला. या प्रकरणी फरार आरोपींना अटक करण्यात आली आहे. वनराज यांच्या हत्ये मागे बहीण व जावई असल्याचा संशय आहे.
Lalbaug Bus Accident : लालबाग परिसरात एक भीषण दुर्घटना घडली आहे. बेस्ट चालकाशी हुज्जत घालत एका दारुड्याने बसचे स्टेरिंग हिसकावल्याने अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून चार ते पाच गाड्यांना ठोकरले.
Maharashtra News Live: Heavy rain in state : मराठवाडा, विदर्भाला पावसानं झोडपलं! नद्यांना पुर, शेती गेली पाण्याखाली; आजही जोरदार पावसाचा इशारा
Heavy rain in state : विदर्भ, मराठवड्याला पावसाचे चांगलेच झोडपले आहे. पावसामुळे अनेक जिल्ह्यात पुरस्थिती निर्माण झाली आहे. नांदेड, हिंगोली, परभणी, अमरावती, चंद्रपूर आदि जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला! अमरावतीला रेड तर जळगाव, संभाजीनगरला ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढला आहे. आज देखील राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.