मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 19, 2024: Assembly Election : विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं..! ८० टक्के जागावाटप फायनल; भाजप १६० जागा लढवण्याची शक्यता
Maharashtra News Live September 19, 2024: Assembly Election : विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं..! ८० टक्के जागावाटप फायनल; भाजप १६० जागा लढवण्याची शक्यता
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Thu, 19 Sep 202405:20 PM IST
Maharashtra News Live: Assembly Election : विधानसभेसाठी महायुतीचं ठरलं..! ८० टक्के जागावाटप फायनल; भाजप १६० जागा लढवण्याची शक्यता
Maharashtra assembly election : २०१९ प्रमाणेच भाजपकडून जवळपास १६० जागा लढविण्याचा आग्रह धरण्यात येत असून त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे.
bhoste ghat : भोस्ते घाटात पडलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेकडो किमी लांब असलेल्या तरुणाच्या स्वप्नात जात होता. मृत व्यक्ती स्वप्नामध्ये जाऊन तरुणाकडे मदतीसाठी याचना करत होती. दररोज स्वप्न पडत असल्याने तरुणाने खेड पोलीस ठाणे गाठले व सर्व प्रकार पोलिसांना सांगितला.
Maharashtra News Live: Indurikar Maharaj : 'धर्माचं भांडवल करु नका, गरिबांच्या पोरांचा बळी देऊ नका’, इंदुरीकर महाराजांकडून पुढाऱ्यांची कानउघडणी
Indurikar maharaj : तुमचा धर्म माईकवर आहे आमचा आमच्या हृदयात आहे. तुम्ही तुमच्या स्वार्थासाठी आमच्या धर्माचं भांडवल करु नका. धर्माच्या नावाखाली आमच्या गरीबांच्या पोरांचा बळी देऊ नका, असं म्हणत इंदुरीकर महाराजांनी राजकारण्यांची कानउघडणी केली आहे.
Maharashtra News Live: पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूपदावरून हकालपट्टीनंतर डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव, मिळाला तात्पुरता दिलासा
Ajit Ranade termination Vice Chancellor : डॉ. अजित रानडे यांना कुलगुरूंच्या पदावरून हटवण्याचा निर्णय झाला आहे. त्याविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती महेश सोनाक आणि न्यायमूर्ती कमल खाता यांच्या खंडपीठासमोर या याचिके सुनावणी झाली.
Maharashtra News Live: Dhule Suicide : मुंबईला जातो असं सांगून कुटुंबानं संपवलं जीवन; धुळ्यातील धक्कादायक घटना
Dhule Suicide : नाशिकमध्ये एकाच कुटुंबातील पती पत्नी आणि मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना आता धुळ्यात एकाच कुटुंबातील चौघांनी विष प्राशन करून आत्महत्या केली.
Maharashtra News Live: आव्वाज वाढवं डिजे तुला....! पुण्यात गणेश विसर्जनदिवशी डिजेमुळे ध्वनी मर्यादेची पातळी मोडली; लेसर लाईटचाही मोठा वापर
Noise pollution in Pune ganesh Visarjan mirvnuk : पुण्यात या वर्षी देखील मोठ्या प्रमाणात डिजेच्या आवाजाने ध्वनि प्रदूषणाची मर्यादा ओलांडली आहे. या बाबत सीईओपी संस्थेने अहवाल दिला आहे.
Saamana Editorial slams Narendra Modi : सत्ताधारी नेत्यांकडून राहुल गांधी यांच्यावर होत असलेल्या हिंसक टीकेवरून 'सामना'नं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.
Maharashtra News Live: कामाच्या अतिताणामुळेच पुण्यातील ई. वाय. कंपनीतील तरुणीचा मृत्यू? आईने बॉसला धरलं जबाबदार; पत्र व्हायरल
pune ey employee dies : पुण्यात एका बड्या कंपनीतील २६ वर्षीय तरुणीचा हृदय विकाराने मृत्यू झाला. या प्रकरणी महिलेच्या आईने कंपनीवर गंभीर आरोप केले असून कामाचा अतिताण असल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पाऊस पुन्हा होणार अॅक्टिव! पुढील काही तासांत 'या' जिल्ह्यांना झोडपणार
Maharashtra Weather Update : राज्यात विश्रांती घेतलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. पुढील दोन दिवसांत राज्यात काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra News Live: पत्नीचे तसले फोटो पाहून बिहारचा शिक्षक पुण्यात आला अन् पत्नीच्या प्रियकराचा झोपेतच चिरला गळा
pune Crime : पत्नीचे तिच्या बॉयफ्रेंडसोबत फोटो व्हायरल झाल्याने पतीचा राग अनावर झाला व त्याने पत्नीच्या प्रियकराची गळा चिरून हत्या केली. ही खळबळजनक घटना पुण्यातील हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बावधनमध्ये घडली आहे.