मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 17, 2024: Pune Ganpati Visarjan 2024 : दगडूशेठसह पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा कोणत्या बाप्पाचं कधी विसर्जन?
Maharashtra News Live September 17, 2024: Pune Ganpati Visarjan 2024 : दगडूशेठसह पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा कोणत्या बाप्पाचं कधी विसर्जन?
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Tue, 17 Sep 202405:29 PM IST
Maharashtra News Live: Pune Ganpati Visarjan 2024 : दगडूशेठसह पुण्यातील मानाच्या पाचही गणपतींचे विसर्जन, पाहा कोणत्या बाप्पाचं कधी विसर्जन?
pune Ganpati visarjan 2024 : पुण्यातील मानाच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अलका टॉकीज चौकात पुणेकरांनी प्रचंड गर्दी केली होती. डेक्कन येथील नदी पात्रालगत पर्यावरण पूरक पद्धतीने मानाच्या पाचही गणपतीचं विसर्जन संपन्न झालं.
lalbaugcha raja : लालबागच्या राजाच्या चरणाशी आपल्या मनातील इच्छा लिहून ठेवली तर ती पूर्ण होते, असा भक्तांची श्रद्धा आहे. त्यानुसारच ही राजकीय इच्छा राजाच्या पायाशी आली आहे.
Maharashtra News Live: गणेश विसर्जन मिरवणुकीच्या ट्रॅक्टरखाली येऊन तीन चिमुकलींचा मृत्यू; धुळे जिल्ह्यातील गावात उत्सवावर दु:खाचे सावट
Dhule accident : एका थांबलेल्या ट्रॅक्टरभोवती तीन चिमुकल्या मुली खेळत होत्या. तिघीही ट्रॅक्टरच्या मागील चाकाजवळ बसल्या होत्या. इतक्यात चालकाने ट्रक्टरवर चढून ट्रॅक्टर सुरू केला. यामध्ये तीन मुलींचा चिरडून मृत्यू झाला.
Chandrakant Patil car accident : पुण्यात एका मद्यधुंद चालकाने चंद्रकांत पाटील यांच्या ताफ्यातील एका गाडीला धडक दिली. या अपघातात पाटील हे थोडक्यात बचावले आहेत.
Maharashtra News Live: Sharad Pawar : एमपीएससीच्या रखडलेल्या परीक्षांच्या तारखा घोषित करा; शरद पवारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र
Sharad Pawar letter To CM Eknath Shinde : राज्य लोकसेवा आयोगा मार्फत अनेक परीक्षा जाहिर करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या नसल्याने या परीक्षा रखडल्या आहेत. या परीक्षा लवकर घ्याव्या अशी मागणी शरद पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे केली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Water Issue : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवार, शुक्रवार 'या' भागात पाणी पुरवठा राहणार बंद
Mumbai Water Supply : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी मुंबईचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुंबई महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने केले आहे.
Pune Ganesh Visarjan : पुण्यात वैभवी गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. १० दिवस मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडला. त्यानंतर आज गणरायला निरोप दिला जाणार आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.