मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 15, 2024: Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
Maharashtra News Live September 15, 2024: Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 15 Sep 202404:00 PM IST
Maharashtra News Live: Anna Hazare : “उशिरा सुचलेलं शहाणपण..”, केजरीवालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावर अण्णा हजारेंची प्रतिक्रिया
Anna Hazare on Arvind Kejriwal : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, केजरीवाल यांना राजकारणात जाण्यास मी मनाई केली होती. मी त्यांना आधीच म्हटलं होतं की राजकारणात नका जाऊ
Maharashtra News Live: Uddhav Thackeray : '..त्यामुळे मी सरन्यायाधीशांचे आभार मानतो', पंतप्रधान मोदींच्या गणेश दर्शनावरून उद्धव ठाकरेंचा टोला
uddhav thackeray : सरन्यायाधीशांचे मी आभार मानतो, कारण मोदी घरी येणार म्हणून गणपतीला त्यांनी पुढची तारीख दिली नाही'', असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला आहे.
Maharashtra News Live: भंडारा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या गर्भवती महिला व बाळाचा मृत्यू; नातेवाईकांचे स्मशानातच आंदोलन
Bhandara news : भंडारा जिल्हा रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका गर्भवती महिलेचा तसेच नवजात बालकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी आंदोलन करत रुग्णालय प्रशासनावर कारवाईची मागणी केली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Accident: मुंबईच्या ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर कारचा भीषण अपघात ६ जण गंभीर जखमी; अपघाताची मालिका सुरूच
Mumbai eastern express highway accident : मुंबईत ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरवर आज पुन्हा अपघात झाला आहे. भरधाव वेगातील एक कार महामार्गावर पलटी झाली आहे. यात ६ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Thane news : पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात सोशल मिडियावर पोस्ट लिहिल्याने एका हवालदार दर्जाच्या अधिकाऱ्याची एक वर्षासाठी हवालदार पदावरून पदावनत करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: मुंबई पोलीस आयुक्तांच्या नावे फसवणुकीचे प्रकार! अटकेची नोटीस, धमकी आल्यास पोलिसांशी संपर्क साधा! मुंबई पोलिसांचे आवाहन
Mumbai Police: राज्यात सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. अनेकांना सोशल मिडिया व्हॉट्सअॅप, ई-मेल, तसेच मेसेज व फोनकरून कायदेशीर कारवाई करून अटक करण्याची धमकी दिली जात आहे.
Maharashtra News Live: Economist Ajit Ranade : पुण्यातील गोखले संस्थेच्या कुलगुरूपदावरून अजित रानडे यांची हकालपट्टी
Economist Ajit Ranade : प्रख्यात अर्थतज्ज्ञ डॉ. अजित रानडे यांची शनिवारी पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सच्या (जीआयपीई) कुलगुरूपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: Edible Oil price hike: फोडणी महागली! खाद्य तेलाचे दर कडाडले; कच्च्या तेलावरील आयात शुल्क वाढवल्यानंतर २५ रुपयांची दरवाढ
Edible Oil price hike: केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करात २० टक्क्यांनी वाढ केली आहे. याचा फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला असून तब्बल २० ते २५ रुपयांची वाढ झाली आहे.