मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 12, 2024: नवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना
नवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना(HT_PRINT)
Maharashtra News Live September 12, 2024: नवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना
Updated Sep 12, 2024 09:34 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Thu, 12 Sep 202404:04 PM IST
Maharashtra News Live: नवीन मोबाईल घेऊन देण्यास पती हतबल अन् इकडं पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल; पिंपरीतील धक्कादायक घटना
Pimpri chinchwad News : पतीने नवीन मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट न पुरवल्यामुळे शिवानीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ती पतीकडे नवीन मोबाईल घेऊन देण्याचा हट्ट करत होती.
Maharashtra News Live: Pune Accident : पुण्यातून रात्री गणेश दर्शन करून परतणाऱ्या पती-पत्नीला भरधाव डंपरने उडवलं; जागीच ठार
Pune Accident : पुण्यात मोटारसायकलीवरून निघालेल्या पती-पत्नीला डंपरने जोरदार धडक दिली. यात दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला. डंपरचालक फरार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Dharamrao Baba Atram : मुलीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष केले. तर तुम्हाला आता त्यांना नदीत फेकावे वाटले, मात्र तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांना त्यांच्या काकांनी त्यांना अनेक पदे देऊनही त्यांनी त्यांच्या पाठीत सूरा खुपसला, त्यांना कोठे फेकायचे ते पण सांगा, असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला आहे.
Maharashtra News Live: हिंदुत्वासाठी शिंदे गटात गेलेल्या आमदार यामिनी जाधव यांच्याकडून भायखळ्यात मुस्लिम महिलांना बुरखा वाटप!
mla Yamini Jadhav : मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी पक्षाच्या बॅनरखाली मुस्लिम महिलांना बुरखा वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता. यावरून विरोधकांनी जोरदार निशाणा साधला आहे.
Sanjay Raut On DY Chandrachud: पंतप्रधान नरेंद्र मोदी गणपतीपूजेसाठी सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड घरी गेल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सरन्यायाधीशांच्या निःपक्षपातीपणाबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
Maharashtra News Live: आजपासून मरीन ड्राइव ते वांद्रे अवघ्या १२ मिनिटात, मुंबईकरांचा प्रवास वेगवान होणार
Marine Drive to CSMIA T2: मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कोस्टल रोड सी-लिंकला वरळी येथे महाकाय गर्डरने जोडला गेल्याने प्रवाशांना अवघ्या १२ मिनिटांत मरीन ड्राईव्हहून वांद्रे गाठता येणार आहे.