मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live September 1, 2024: Ganesh Utsav 2024 : मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी; मुंबईतील प्रमुख मंडळांची भूमिका काय?
Maharashtra News Live September 1, 2024: Ganesh Utsav 2024 : मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी; मुंबईतील प्रमुख मंडळांची भूमिका काय?
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 01 Sep 202405:02 PM IST
Maharashtra News Live: Ganesh Utsav 2024 : मुंबई हायकोर्टाकडून प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींवर बंदी; मुंबईतील प्रमुख मंडळांची भूमिका काय?
Ganesha idols : गणेश चतुर्थी जवळ येऊन ठेपली असताना प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपतीच्या मूर्तींच्या वापरावरील बंदीचा परिणाम मुंबईतल्या काही सार्वजनिक गणेश मंडळांना झाला आहे का?
Maharashtra News Live: Chandrakant Khaire : “शिवाजी महाराजांच्या पुतळा पडल्यानंतर राज्यात दंगली…”, चंद्रकांत खैरेंचं वादग्रस्त वक्तव्य
Chandrakant khaire : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतरही दंगली का होत नाही? महाराष्ट्रात दंगली झाल्या पाहिजेत. असं वादग्रस्त वक्तव्य शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केलं आहे.
Maharashtra News Live: Sharad Pawar : ‘सावरकरांची शिवाजी महाराजांसोबत चर्चा होऊ शकते का? अंगाशी आलं की..’ शरद पवारांचा पंतप्रधान मोदींना टोला
Sharad pawar on Modi : शिवाजी महाराज व सावकरांची एकत्र तुलना होऊ शकते का? सावरकर स्वातंत्र्याची अनेक वर्ष तुरुंगात होते, पण तरी यांची तुलना महाराजांशी होऊ शकते का? असा सवाल शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना विचारला आहे
Maharashtra News Live: गणेश भक्तांनो ‘या’ १३ पुलांपासून जरा सांभाळून..! गणेश मिरवणुकीसाठी मुंबई पालिकेकडून धोकादायक पुलांची यादी जाहीर
Ganesh festival 2024 : मुंबई शहर आणि उपनगरातील जुन्या व धोकादायक १३ पुलांवरून मिरवणूक नेताना काळजी घेण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील १३ पूल धोकादायक असून, काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत.
Maharashtra News Live: Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांनी सूरत लुटली नव्हती, तर...; देवेंद्र फडणवीसांनी इतिहास सांगत काँग्रेसला घेरलं!
Shivaji maharaj statue : देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराजांनी सुरत लुटली नव्हती, तर महाराजांनी केवळ स्वराज्याचा खजिना हा योग्य त्या लोकांकडून घेतला होता किंवा त्यांच्यावर त्या ठिकाणी आक्रमण केलं होतं.
Maharashtra News Live: अंगात भूत असल्याची बतावणी करत भोंदू बाबाकडून आई, मुलगी, मामी आणि आजीवर बलात्कार, अखेर कोर्टाने शिक्षा सुनावली
Nagpur crime news : भोंदूबाबाने एका तरुणीच्या अंगात भूताचा वास असल्याचे सांगून २१ दिवस धार्मिक पूजा करावी लागेल, असे कुटूंबीयांना सांगितले. त्यानंतर पीडित तरुणीसह, तिची आई, आजी व मामीवर बलात्कार केला.
Maharashtra News Live: मग्रूरीने माफी मागणाऱ्या राष्ट्रद्रोह्यांना राज्याबाहेर हकलवून लावा; उद्धव ठाकरे यांची सरकारवर घणाघाती टीका
Maha Vikas Aghadi Protest : मालवण येथील शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महावीकास आघाडीतर्फे सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात आले होते. यावेळी, उद्धव ठाकरे यांनी सरकारवर जहरी टीका केली.
Maharashtra News Live: Pune Crime: पुण्यात नदी पात्रात आढळलेल्या 'त्या' मृतदेहाचं गूढ उकलं; संपत्तीच्या वादातून भावानं व वहिनीनं केला खून
Pune kharadi Crime News : पुण्यातील नदी पात्रात डोकं नसलेला मृतदेह आढळला होता. या मृतदेहाचं गूढ उलगडलं आहे. संपत्तीच्या वादातून महिलेचा खून करण्यात आला. भाऊ आणि वाहिनीने त्याचा खून केला आहे.
Maharashtra News Live: Nanded Rain : मुसळधार पावसानं नांदेड जिल्ह्याला झोडपलं! आज रेड अलर्ट, जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना केलं महत्वाचं आंदोलन
Nanded Rain : नांदेड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. आता पर्यंत जिल्ह्यातील २६ मंडळामध्ये अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिला आहे.
Maharashtra News Live: काश्मीर खोऱ्यात यंदाही होणार थाटात गणेशोत्सव साजरा! तीन ठिकाणी होणार स्थापना; पुनीत बालन यांचा पुढाकार
Ganeshotsav In Kashimir Velley : काश्मीरमध्ये यंदाही गणेशोत्सव साजरा केला जाणार आहे. या साठी पुनीत बालन यांनी पुढाकार घेतला आहे. या वर्षी तीन ठिकाणी हा सोहळा साजरा होणार आहे.
Maharashtra News Live: मालवणच्या घटनेनंतर पुणे महापालिका सतर्क! शहरातील ५० हून अधिक पुतळ्यांचे करणार स्ट्रक्चरल ऑडिट
Pune PMC structural audit of 50 statues : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महापालिकेचे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरातील ५० हून अधिक पुतळ्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra News Live: MVA protest live : महाविकास आघाडीचा आज सरकारविरोधात एल्गार, राजकोट घटनेचा निषेधार्थ मोर्चा
Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse MVA Protest Today live : सिंधुदूर्ग जिल्ह्यातल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. आज मुंबईत महाविकास आघाडीने मोर्चाची हाक दिली आहे. सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे.
Cockroach in Cold Coffee : मालाड येथील एका मोठा हॉटेलमध्ये कोल्ड कॉफीमध्ये झुरळ सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून मालाड पोलिसांनी हॉटेल व्यवस्थापकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात आज विदर्भात पावसाचा कहर; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, सप्टेंबरमध्ये पाऊस सक्रिय
Maharashtra Weather Update : राज्यात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात आज जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. विदर्भात अनेक जिल्ह्यांना आज रेड आणि यलो अलर्ट दिलेला आहे.