मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 7, 2024: चेंबूरच्या अग्निकांडात माणुसकीही खाक..! मदत करणाऱ्यांनीच गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून रोकड अन् १० तोळे सोनं लुटलं
Maharashtra News Live October 7, 2024: चेंबूरच्या अग्निकांडात माणुसकीही खाक..! मदत करणाऱ्यांनीच गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून रोकड अन् १० तोळे सोनं लुटलं
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 07 Oct 202402:41 PM IST
Maharashtra News Live: चेंबूरच्या अग्निकांडात माणुसकीही खाक..! मदत करणाऱ्यांनीच गुप्ता कुटुंबीयांच्या कपाटातून रोकड अन् १० तोळे सोनं लुटलं
Chembur Fire : गुप्ता कुटुंबाच्या घरातून लाखोंची रोकड आणि १०० ग्रॅम सोने चोरीला गेले आहे. याबाबत या कुटुंबाने आज चेंबूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
Akola News : एका रिक्षाला धक्का लागल्याने हा संपूर्ण वाद निर्माण झाला. हरीपेठ भागात सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या वादातून दोन गटात तुफान राडा झाला
Maharashtra News Live: राज्य सरकारचा मोठा निर्णय..! धनगरांना आदिवासीतून आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर
Dhangar Reservation : महायुती सरकारने धनगर आरक्षणासंदर्भात मोठा निर्णय घेत धनगरांना एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळण्यात असलेला सर्वात मोठा अडथळा दूर केला आहे.
Maharashtra News Live: नागपूर हादरले! रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्मवर ७ वर दोन प्रवाशांची मनोरुग्णाने केली हत्या
Nagpur Railway Station Murder Incident : नागपुर रेल्वेस्थानकावर खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका मनोरुग्णाने रेल्वे ट्रॅकवरील राफ्टर घेऊन दोन प्रवाशांची हत्या केली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Metro Line 3 : मुंबईकरांसाठी गुड न्यूज! आजपासून भूमिगतमेट्रो-३ने करता येणार प्रवास; असे आहे तिकिट दर
Mumbai Metro Line 3 : मेट्रो-३ ही मार्गिका आज पासून नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. आज ११ पासून ही भूमिगत मेट्रो मार्गिका नागरिकांसाठी सुरू करण्यात येणार असून या मार्गिकेवर किती दर आहेत जाणून घेऊयात.
Maharashtra News Live: धम्मचक्र प्रवर्तन दिनासाठी मुंबई ते पुणे आणि नागपूर विशेष गाड्या; 'या' स्थानकावरून सुटणार गाड्या; वाचा तपशील
dhamma chakra pravartan din : मध्य रेल्वे धम्मचक्र प्रवर्तन दिवस- २०२४ निमित्ताने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई, पुणे आणि नागपूर आणि नागपूर -भुसावळ - नाशिक रोड दरम्यान विशेष गाड्या चालवणार आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील ४८ तासात मुसळधार बरसणार; IMD ने दिला महत्वाचा इशारा
Maharashtra Weather update : राज्यात आज जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाट हा पाऊस होणार आहे.
Maharashtra News Live: Viral Video : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर द बर्निंग बसचा थरार! ३३ प्रवासी थोडक्यात बचावले; व्हिडिओ झाला व्हायरल
old pune mumbai highway bus fire : जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर एका खाजगी बसला अचानक आग लागली. या घटनेत ३३ प्रवासी सुदैवाने वाचले. ही घटना रविवारी संध्याकाळी ७ च्या सुमारास घडली.
Maharashtra News Live: पुण्यात महिलांवर अत्याचार सुरूच! बानेर येथील बड्या रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक
Pune Baner rape case : पुण्यात बाणेर येथे एका रुग्णालयातील सफाई कर्मचारी महिलेवर एका पर्यवेक्षकाने बलात्कार केल्याचे उघड झाले असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.