मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 3, 2024: लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Maharashtra News Live October 3, 2024: लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Thu, 03 Oct 202403:41 PM IST
Maharashtra News Live: लाभले आम्हास भाग्य.. ! मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
Marathi Classical Language : केंद सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. गेल्या दोन दशकांपासून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी होत होती. ती आता पूर्ण झाली आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Elections : दगडी चाळीत मशाल पेटणार? डॉन अरुण गवळीची मुलगी ठाकरे गटाकडून भायखळ्यातून लढणार!
assembly election : मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा डाव टाकला असून अंडरवर्ल्ड डॉन ते राजकारण असा प्रवास केलेल्या अरुण गवळीची मुलगी माजी नगरसेविका गीता गवळी यांना भायखळ्यातून विधानसभेच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे.
Maharashtra News Live: Sambhaji bhide : 'महामूर्ख जमात म्हणजे हिंदू जात' संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य, महिलांवरही बोलले..
Sambhaji Bhide : मूर्ख लोकांचा समाज म्हणजे हिंदु समाज. गणपती उत्सव, नवरात्र उत्सव हे आता इव्हेंट झाले आहेत. हिंदू समाजाला गांडू बनवत आहेत. असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं आहे.
Maharashtra News Live: पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला आणखी एक धक्का; ‘हा’ दिग्गज फुंकणार तुतारी! सिल्व्हर ओकवर घेतली शरद पवारांची भेट
Harshvardhan patil : इंदापूर मतदारसंघातील भाजप नेते हर्षवर्धन पाटील लवकरच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांनी आज सिल्व्हर ओकवर जाऊन शरद पवारांची भेट घेतली.
Maharashtra News Live: sudhir mungantiwar : गोंडवाना विद्यापीठाकडून सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना मानद डी. लिट उपाधी प्रदान
sudhir mungantiwar : राज्याचे सांस्कृतिक कार्य, वने आणि मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच गोंडवाना विद्यापीठाकडून मानद डी. लिट उपाधी प्रदान करण्यात आली.
Maharashtra News Live: Ajit Pawar : अल्पवयीन आरोपींचं वय आता १८ वरून १४ करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार; अमित शहांशी करणार चर्चा
Ajit Pawar : पुण्यात अजित पवार यांनी आज पत्रकारांची बोलतांना महत्वाचं वक्तव्य केलं. वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर आता अल्पवयीन आरोपींच वय १८ वरून १४ वर आणण्याचा विचार सुरू असल्याचं पवार म्हणाले.
Maharashtra News Live: Rahul Gandhi : दोन दिवसीय कोल्हापूर दौऱ्यात या कॉंग्रेस नेत्याच्या हॉटेलमध्ये राहुल गांधींचा मुक्काम
Rahul Gandhi Kolhapur tour : काँग्रेस नेते व लोकसभेतील विरोधी पक्ष नेते खासदार राहुल गांधी उद्या शुक्रवारी आणि शनिवारी दोन दिवसांच्या कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : नवरात्रीवर पावसाचे सावट! राज्यसह देशातील या भागात IMD चा पावसाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात तसेच देशाच्या काही मोठ्या भागातून नैऋत्य मोसमी पावसाने एक्जिट घेतली आहे. मात्र, असे असले तरी नवरात्रीत राज्यसह देशातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
Maharashtra News Live: Bhiwandi Fire : भिवंडीत तेलगळतीमुळे कापड डाईंग कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे कोट्यवधींच नुकसान
Bhiwandi Fire : भिवंडी येथे असलेल्या कापड डाईंग कंपनीत बोयरलमध्ये तेलगळती होऊन स्फोट झाल्याने भीषण आग लागली. ही घटना बुधवारी रात्री घडली. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झाली नाही.