मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 25, 2024: Mns Candidate List : मनसेकडून पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर; कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ नेत्याला तिकिट
MNS Candidate List : मनसेकडून पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर; कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ नेत्याला तिकिट(HT_PRINT)
Maharashtra News Live October 25, 2024: MNS Candidate List : मनसेकडून पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर; कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ नेत्याला तिकिट
Updated Oct 25, 2024 10:57 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Fri, 25 Oct 202405:27 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: MNS Candidate List : मनसेकडून पाच उमेदवारांची चौथी यादी जाहीर; कसबा पेठ मतदारसंघातून ‘या’ नेत्याला तिकिट
MNS Candidate List: विधानसभा निवडणुकीसाठी मनसेकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत कसबा, कोल्हापूर उत्तर, चिखली, कलिना व केज या मतदारसंघात पक्षाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Viral Video : अगा एकनाथ मामा, सोयाबीन बत्तीश्श्यानं गेली रे, पाह्य रे बापू… सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याची व्यथा व्हायरल
राज्यात यंदा सोयाबीनचे उत्पन्न चांगले आले आहे. परंतु खुल्या बाजारात सोयाबीनला ३२०० रुपये भाव मिळतोय. त्यामुळे शेतकरी संतप्त झाला आहे. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
महाराष्ट्र बातम्या News Live: 'भोपळा भाऊ सज्ज झाले....' राष्ट्रवादीच्या टिझरमध्ये दिसणारा नेता कोण? चर्चाना उधाण, पाहा VIDEO
Maharashtra Election : शरद पवार गटाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून राजकीय वर्तुळात तसेच सोशल मीडियावर या टीझरची व यात दिसणाऱ्या नेत्याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Ruturaj Patil: पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांची वाढ, काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांची एकूण संपत्ती किती? वाचा
Ruturaj Patil Property News: काँग्रेस नेते ऋतुराज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना आपली संपत्ती जाहीर केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: ST Employee: एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; दिवाळीआधीच मिळणार पगार
ST Employee salary : एसटी कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर महिन्याचा पगार ७ नोव्हेंबर रोजी अपेक्षित आहे. मात्र दिवाळी सणानिमित्त खरेदीसाठी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात पगार जमा करण्याबाबत महामंडळ विचार करत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: पुण्यात १३८ कोटींच्या सोन्यानं भरलेला टेम्पो सापडला, तर हिंगोलीतून १ कोटींची रोकड जप्त !
Gold Seized in Pune : पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. तसेच हिंगोली शहरात एका इनोवा कारमधून १ कोटी ४० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: निवडणूक हंगामात राज्यात पैशांचा महापूर! तपास यंत्रणांनी २४ तासात जप्त केली ५२ कोटींची मालमत्ता
Maharashtra Election 2024 : राज्यात सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. अनेक पक्ष आपले उमेदवार जाहीर करत आहेत. तर काहींनी फॉर्म देखील भरले आहे. अशातच तपास यंत्रणांनी २४ तासांत ५२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Navi Mumbai Accident: नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावर भीषण अपघात, एका महिलेसह तिघांचा मृत्यू
car and dumper Accident In Navi Mumbai: नवी मुंबईत कार आणि डंपर यांच्यात आज पहाटे भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेसह तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: samruddhi mahamarg: समृद्धीमार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण धडक, केमिकलमुळे लागली आग, वाहतूक ठप्प!
Two Truck Collision on Samruddhi Mahamarg: समृद्धीमार्गावर दोन ट्रकमध्ये भीषण धडक झाल्याची माहिती समोर आली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जिवीतहान झाली नसल्याचे वृत्त आहे. परंतु, या अपघातामुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला, तरी कोकण, पश्चिम महाराष्ट्र विदर्भात मुसळधार पावसाचा इशारा!
Maharashtra Weather Update: राज्यातून पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी पुढील दोन दिवसांत राज्याच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.