मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 21, 2024: अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’, पाहा Video
अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’, पाहा VIDEO
Maharashtra News Live October 21, 2024: अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’, पाहा VIDEO
Updated Oct 21, 2024 10:58 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 21 Oct 202405:28 PM IST
महाराष्ट्र बातम्या News Live: अकोल्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा भरकार्यक्रमात राडा, योगेंद्र यादव म्हणाले ‘हा तर संविधानावर हल्ला’, पाहा VIDEO
अकोल्यात एका कार्यक्रमादरम्यान योगेंद्र यादव यांच्यावर जमावाने हल्ला केला होता. त्यांचे भाषण सुरू असताना ४० ते ५० संतप्त लोकांनी स्टेजवर चढून त्यांना धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्र बातम्या News Live: मविआमधील तिढा अखेर सुटला! ‘या’ तारखेला होणार जागावाटपाची घोषणा, दिल्लीतील काँग्रेस बैठकीनंतर चेन्निथला यांची माहिती
Maha Vikas Aghadi Seat Sharing : आज दिल्लीत काँग्रेस निवडणूक समितीची बैठक पार पडली. या बैठकीनंतर चेन्निथला यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला कधी जाहीर होणार याची माहिती दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर होताच राज्यभरात कुठे कुठे झाली बंडखोरी? वाचा बंडखोरांची संपूर्ण यादी
राज्यात भाजपची पहिली यादी जाहीर होताच तिकीट न मिळालेल्या इच्छुकांमध्ये प्रचंड अस्वस्थता दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी बंडाचे निशाण फडकावल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Assembly Election 2024 : वंचित बहुजन आघाडीची ५ वी यादी जाहीर; अजित पवारांविरोधात दिला उमेदवार
Vanchit Bahujan Aghadi : वंचित बहुजन आघाडीने आज पाचवी उमेदवार यादी जाहीर केली. या यादीत १६ उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख करण्यात आला आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: उद्धव ठाकरे-भाजपा पुन्हा एकत्र येणार?; संजय राऊतांनी एका वाक्यातच विषय संपवला, म्हणाले..
Maharashtra Assembly Election : आमचे सरकार पाडले. आमचे चिन्ह चोरले आणि त्यापेक्षा हा महाराष्ट्र गद्दारांच्या हाती दिला. ही वेदना घेऊन आम्ही संघर्ष केला. जर कुणी अशी शंका घेत असेल तर ते एका बापाच्या औलादी नाहीत, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी केला संजय राऊत अमित शहा भेटीवर दिली आहे.
महाराष्ट्र बातम्या News Live: Assembly Election 2024: तिसऱ्या आघाडीची पहिली उमेदवार यादी जाहीर; बच्चू कडू अचलपूरमधून लढणार, पाहा कुणाला कुठून संधी?
parivartan mahashakti alliance : तिसरी आघाडी राज्यात २८८ जागा लढवणार असून आज पहिली यादी जाहीर केली आहे. अचलपूर, रावेर, ऐरोली, चांदवड, देगलूर, हिंगोली या जागांवर तिसऱ्या आघाडीने आपले उमेदवार जाहीर केले आहेत.
महाराष्ट्र बातम्या News Live: बाबा सिद्दीकींची हत्या लॉरेन्स बिश्नोईच्या गँगकडून नाही? पोलिसांच्या दाव्याने प्रकरणात नवा ट्विस्ट
बाबा सिद्दीकी प्रकरणात लॉरेन्स बिश्नोईचा कोणताही हात नसल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभम लोणकर ऊर्फ शुब्बू याने लॉरेन्स बिश्नोई या नावाने या हत्येची जबाबदारी स्वीकारली होती.
महाराष्ट्र बातम्या News Live: Shri Swami Samarth : स्वामी समर्थ केंद्रावर कारवाईचा बुलडोझर! संतप्त सेवेकऱ्यांचा 'रास्ता रोको'
Swami Samarth Kendra Jalgaon News : जळगाव शहरातील श्री स्वामी समर्थ केंद्रावर कारवाईचा बुलडोझर चालवला गेला. याचे पडसाद रविवारी उमटले. स्वामी सेवेकऱ्यांनी रास्ता रोको करत विविध मागण्या करत आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.
महाराष्ट्र बातम्या News Live: Harihareshwar: हरिहरेश्वरमध्ये रूम न दिल्याच्या रागातून स्कॉर्पिओ घातली अंगावर, महिलेचा मृत्यू
Harihareshwar News: हरिहरेश्वरमध्ये रूम न दिल्याच्या रागातून महिलेला स्कॉर्पिओखाली चिरडल्याची घडना समोर आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून इतर सात जणांचा शोध सुरू आहे.