मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 2, 2024: Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे फरार अध्यक्ष आणि सचिवांना अखेर अटक
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Wed, 02 Oct 202405:16 PM IST
Maharashtra News Live: Badlapur Case : बदलापूर अत्याचार प्रकरणात पोलिसांना मोठं यश; शाळेचे फरार अध्यक्ष आणि सचिवांना अखेर अटक
Badlapur rape case : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाळा चेअरमन उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांना उद्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
maha vikas aghadi : महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस १०० ते १०५ जागा, काँग्रेस ९५ ते १०० जागा तर शरद पवारांची राष्ट्रवादी ८५ ते ८० जागांवर लढण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: मोठी बातमी.. निलेश राणे शिंदे गटात प्रवेश करणार! आगामी निवडणूक धनुष्यबाण चिन्हावर लढणार?
Nilesh rane : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News Live: नागपूर-सिकंदराबाद वंदे भारत एक्सप्रेस २ दिवस रद्द! रेल्वे प्रशासनाने १५ दिवसातच का घेतला निर्णय?
Vande bharat update : नागपूर ते सिकंदराबाद आणि सिकंदराबाद-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस प्रत्येकी दोन दिवस रद्द करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. काझीपेठ –बल्लारशाह दरम्यान इलेक्ट्रॉनिक नॉन इंटरलॉकिंगच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला आहे.
Maharashtra News Live: Devendra Bhuyar : "मुलगी जर दिसायला एक नंबर देखणी असेल..."; अजित पवार गटातील आमदाराचे महिलांबाबत वादग्रस्त विधान
MLA Devendra Bhuyar : मुलगी जर दिसायला खुपच स्मार्ट असेल एक नंबरची देखणी मुलगी असेल तर ती नोकरीवाल्या मुलाला मिळते आणि राहिलेला गाळ शेतकऱ्यांच्या पोरांना मिळतो, असं वादग्रस्त वक्तव्य आमदार देवेंद्र भुयार यांनी केलं आहे.
Maharashtra News Live: Chandrakant Patil: ‘म्हणून आपण अमित शहांना रोज नमस्कार केला पाहिजे’, चंद्रकांत पाटलांचं विधान चर्चेत
Chandrakant Patil On Amit Shah : जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्यामुळे अमित शहा यांना आपण रोज नमस्कार केला पाहिजे, असं विधान भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात बोलताना केलं.
Maharashtra News Live: अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची खुद्द राज्य सरकारच करणार चौकशी! आधी मुख्यमंत्र्यांनी केले होते एन्काउंटरचे जाहीर समर्थन
बदलापूर येथील बालिकांच्या लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या पोलिस एन्काऊंटरवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर या प्रकरणाची चौकशी निवृत्त मुख्य न्यायाधीशांमार्फत करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
Maharashtra News Live: Viral news : पुण्यातील अभियंत्यावर ४० ते ५० जणांच्या टोळक्याकडून हल्ल्याचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल
Viral news : पुण्यात मुळशी तालुक्यात कारमधून जाणाऱ्या अभियंत्यावर ४० ते ५० जणांच्या टोळक्याने हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Mowad Mass suicide : नागपूर हादरले! गळफास घेत शिक्षकाने संपूर्ण कुटुंबासह आयुष्य संपवलं
Nagpur Mowad Mass suicide : नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातील मोवाड येथे खळबळजनक घटना घडली आहे. सेवा निवृत्त शिक्षकांच्या कुटुंबातील चौघांनी गळफास घेऊन आत्मतत्या केली.
Chandrapur Rape News : बदलापूर येथील घटना ताजी असतांना चंद्रपूर येथे देखील एका ११ वर्षीय मुलीवर शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Honey Bee Attack In Nashik : नाशिक जिल्ह्यातील हरिहर येथे ट्रेकिंगसाठी गेलेल्या पर्यटकांच्या ग्रुपवर मध्यमाशांनी हल्ला केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.