मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live October 14, 2024: जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार
जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार
Maharashtra News Live October 14, 2024: जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार
Updated Oct 14, 2024 08:37 PM IST
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mon, 14 Oct 202403:07 PM IST
Maharashtra News Live: जालना हादरलं..! ९ वर्षाच्या चिमुकलीवर ड्रग्ज देऊन बलात्कार, पीडितेला रस्त्याकडेला फेकून आरोपी फरार
जालना शहरात एका नऊ वर्षांच्या मुलीला अंमली पदार्थ देऊन तिच्यावर बलात्कार करून रस्त्यावर फेकून दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतले आहे. मुलीची प्रकृती गंभीर आहे.
Maharashtra News Live: सन्मान नसेल, कामे होत नसतील तर सत्तेचा फायदा काय? आमदाराचा अजितदादांना थेट सवाल, शरद पवार गटात केला प्रवेश
Maharashtra Assembly Election : फलटणचे आमदार दीपक चव्हाण यांच्यासह संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथराजे निंबाळकर यांनी शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
Maharashtra News Live: Mumbai Rain : मुंबईत पुढील ३-४ तास वादळी वाऱ्यावर पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस यलो अलर्ट
Mumbai Rain Alert : मुंबई व उपनगरात पुढील ३-४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Lawrence Bishnoi : मुंबई पोलिसांना लॉरेन्स बिश्नोईची कोठडी का मिळत नाही, कोणत्या आदेशाने बांधलेत हात?
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबई पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. मात्र, गुजरातच्या साबरमती तुरुंगात बंद असलेल्या लॉरेन्स बिश्नोईची कोठडी मिळवणे मुंबई पोलिसांसाठी आव्हानात्मक आहे.
Maharashtra Politics : काँग्रेसकडून महाराष्ट्रासाठी जाहीरनामा बनवण्याचं काम सुरू असून या जाहीरनाम्यात महिला, शेतकरी, तरुणांसोबत सर्वसामान्य जनतेला आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाण्याची शक्यता आहे.
Maharashtra News Live: MSRTC News : दर दिवाळीत होणारी हंगामी भाडेवाढ रद्द, एसटी महामंडळाकडून प्रवाशांना मोठा दिलासा
MSRTC Seasonal Ticket Hike : एसटीचे महसूल वाढवण्यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून दिवाळीच्या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ केली जाते. मात्र यंदा हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Pune water issue : पुणेकरांनो पाणी जपून वापरा! 'या' दिवशी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा राहणार बंद
Pune water issue : पुण्यात येत्या गुरुवारी देखभाल दुरुस्तींच्या कामासाठी संपूर्ण शहराचा पाणी पुरवठा हा बंद राहणार आहे. नागरिकांनी याची दाखल घ्यावी असे आवाहन पालिकेने केले आहे.
Maharashtra News Live: बाबा सिद्दीकी खून प्रकरणाचे विदर्भाशी कनेक्शन! मूळचा अकोला जिल्ह्यातील असलेल्या लोणकरला पुण्यातून अटक
Baba Siddique Murder Case : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे कनेक्शन थेट विदर्भातील अकोला जिल्ह्याशी जुडले गेले आहे. पुण्यातील अटक करण्यात आलेला आरोपई हा अकोला जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे.
Maharashtra News Live: Baba Siddique : गावाचा पोशिंदा हरपला! बाबा सिद्दिकींच्या हत्येमुळे मूळ गावावर शोककळा, एकाही घरात पेटली नाही चूल
Baba Siddique Death: बाबा सिद्दिकी यांच्या हत्येमुळे बिहार येथील त्यांच्या मूळगावी शोककळा पसरली आहे. त्यांनी गावात मोठ्या प्रमाणात विकास कामे केली होती. तसेच अनेक गरिबांना त्यांनी मदत केली होती.
Maharashtra News Live: Maharashtra Cabinet: मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय! मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही नाक्यांवर टोलमाफी
Maharashtra Cabinet Meeting Decision: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर वाहनांना टोल माफी करण्यात आली.
Maharashtra News Live: पुण्यातील राजगड किल्ल्यावर २० पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला! डंखामुळे काहींची प्रकृती गंभीर
honey bee attack on rajgad fort : रविवारी दुपारी राजगड किल्ल्यावर मधमाशांनी काही पर्यंतकांवर हल्ला केला. यात २० ते २५ पर्यटक जखमी झाले. या पर्यटकांना इतर व भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या टीमने वाचवले.
Maharashtra News Live: बाबा सिद्दीकींची हत्या करणारा 'तो' आरोपी अल्पवयीन नसल्याचं ऑसिफिकेशन चाचणीमुळं स्पष्ट; कोर्टाने दिली पोलिस कोठडी
Baba Siddiqui Murder case updat : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपी धर्मराज कश्यपच्या वकिलांनी तो अल्पवयीन असल्याचं म्हटलं होतं. मात्र, न्यायालयाने ऑसिफिकेशन चाचणीचे आदेश दिले होते. यात तो अल्पवयीन नसल्याचं स्पष्ट झालं आहे.
Maharashtra News Live: Baba Siddiqui Murder : बाबा सिद्दीकी यांच्या सोबत झिशानलाही संपवायचं होतं! मारेकऱ्यांच्या कोर्टात मोठा गौप्यस्फोट
Baba Siddiqui Murder : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार व मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी अनेक धक्कादायक बाबींचा उलगडा होत आहे. आरोपींना बाबा सिद्दीकी यांच्या सोबत झिशान सिद्दीकीची देखील हत्या करायची होती.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात आज 'या' जिल्ह्यात पावसाची शक्यता; हवामान विभागाने दिला महत्वाचा अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.