हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sun, 13 Oct 202405:17 PM IST
Maharashtra News Live: बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; पुण्यातून तिसरी अटक, कोण आहे शुबू लोणकर?
Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून तिसरी अटक करण्यात आली आहे. पुण्यातून प्रवीण लोणकरला अटक केली आहे.
Maharashtra News Live: ‘मिरचीचा स्प्रे मारून करणार होते गोळीबार’, बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात पोलिसांची खळबळजनक माहिती
Baba Siddique Murder Case : आरोपी आधी मिरचीचा स्प्रे बाबा सिद्धिकी यांच्यावर फवारणार होते आणि ते खाली पडल्यावर त्यांच्यावर गोळीबार करणार होते, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेत दिली.
Maharashtra News Live: मुंबई पुन्हा हादरली…! बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर मालाडमध्ये मनसे कार्यकर्त्याची हत्या
malad Murder : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत आणखी एका राजकीय व्यक्तीची हत्या झाली आहे. मालाड पूर्व येथे दिंडोशी परिसरात मनसे कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.
Maharashtra News Live: Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणातील तिसऱ्या आरोपीची ओळख पटली, पुणे कनेक्शन आलं समोर!
Baba Siddique murder case : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात अली असून तिसऱ्या आरोपीची माहिती पोलिसांच्या हाती लागली असून सिद्दीकी हत्या प्रकरणातील पुणे कनेक्शन उघड झाला आहे.
Maharashtra News Live: "राष्ट्रपतींना विनंती आहे की, मला फक्त एक खून माफ करा...", भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?
Raj thackeray : राज ठाकरे म्हणाले, राष्ट्रपतींकडे माझी एक विनंती आहे. मला फक्त एक खून माफ करा. ज्यांने मोबाईलमध्ये कॅमेरा आणला ना, त्याचा मला खून करायचा आहे.
Maharashtra News Live: 'सलमान खानला जो मदत करेल, त्याला..'; बाबा सिद्दीकींच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली
baba Siddique murder case : या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'सलमान खान, आम्हाला हे युद्ध नको होतं पण तू आमच्या भावाचं नुकसान केलंस. आज ज्या बाबा सिद्दीकीचे कौतुक करत आहेत, एकेकाळी तो दाऊदसोबत मोक्का कायद्यात आरोपी होता
Maharashtra News Live: पुणेकरांनो सावधान! शहरात होतेय बोगस औषधांची विक्री! अन्न व औषध प्रशासनाकडून विक्रेत्यांवर कारवाई
Pune Crime news : पुण्यात बोगस औषधविक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. तब्बल तीन विक्रेत्यांवर या प्रकरणी कारवाई करणीय आली आहे.
Maharashtra News Live: baba siddique : बाबा सिद्दिकींच्या पार्थिवावर मरीन लाइन्स बडा कबरस्तान आज रात्री होणार दफनविधी
baba siddique shot dead : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्धीकी यांची हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या पार्थिवावर आज रात्री ८.३० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
Maharashtra News Live: राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांचं निधन; कुर्ला येथे कार अपघातात झाले होते जखमी
Nawab Malik son in law Sameer Khan Death : नवाब मलिक यांचे जावई समीर खान हे गेल्या महिन्यात कार अपघात जखमी झाले होते. शनिवारी उपचार सुरू असतांना त्यांचा मृत्यू झाला.
Maharashtra News Live: बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी मोठी अपडेट! हत्येमागे बिश्नोई गँगचा हात, हल्लेखोरांचे छायाचित्र आले पुढे; दोघे ताब्यात
Baba Siddique Murder : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणी मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी दोन हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक उत्तर प्रदेशचा आणि दुसरा हरयाणाचा आहे, तर तिसरा आरोपी घटनास्थळावरून पळून गेला आहे.
Ajit Pawar on Baba Siddique Death : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा सिद्दीकी यांचा शनिवारी गोळीबारात मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूवर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या घटनेला त्यांनी वेदनादाई म्हटलं आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : परतीचा पाऊस लांबला! विदर्भ मराठवाड्यासह 'या' राज्यातील 'या' जिल्ह्यात आज पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update : राज्यात परतीचा पाऊस लांबला आहे. माघारीसाठी पूढील दोन दिवस अनुकूल वातावरण असून आज कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे.