Maharashtra News Live October 12, 2024: Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live October 12, 2024: Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे
Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Maharashtra News Live October 12, 2024: Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

Updated Oct 12, 2024 10:59 PM IST
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Sat, 12 Oct 202405:29 PM IST

Maharashtra News Live: Dasara Melava 2024 : अदानी आमची जान आणि आम्ही शेटजींचे श्वान...; उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे

  • Uddhav Thackeray Speech : प्रत्येक राज्यात मंदिर उभारले पाहिजे. केवळ शिवजयंतीला पुतळे पुसायचे एवढ्या पुरते आम्ही मर्यादित नाही. मोदीजी तुम्हाला आणि मिंध्यांना शिवाजी महाराज मतं मिळवणारं यंत्र वाटत असेल. ते काही ईव्हीएम नाही, असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.

Read the full story here

Sat, 12 Oct 202404:52 PM IST

Maharashtra News Live: Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार, लिलावती रुग्णालयात दाखल, प्रकृती चिंताजनक

  • Baba Siddique : अजित पवार गटाचे नेते व माजी आमदार बाबा  सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. मुंबईतील वांद्र पूर्व परिसरातील खेरनगरमधील राम मंदिर परिसरात ही घटना घडली आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202403:44 PM IST

Maharashtra News Live: Uddhav Thackeray : सत्तेत येताच प्रत्येक जिल्ह्यात शिवरायांचं मंदिर बांधणार; दसरा मेळाव्यातून उद्धव ठाकरेंचे वचन

  • Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले, मोदीजी आणि शिंदे सरकार शिवाजी महाराज म्हणजे मते मिळवण्याचं यंत्र नाही. इव्हीएमसारखा त्याचा वापर करु नका. तुम्हाला माझ्यावर किती टीका करायची ती करा.. महाराजांच्या मंदिराला जो विरोध करेल, त्याला महाराष्ट्र बघून घेईल.

Read the full story here

Sat, 12 Oct 202403:12 PM IST

Maharashtra News Live: Eknath Shinde : होती दाढी म्हणून उद्ध्वस्त केली तुमची महाविकास आघाडी- एकनाथ शिंदे

  • Eknath Shinde : त्यांना माझी दाढी खुपते, पण होती दाढी म्हणून उखडून टाकली तुमची महाविकास आघाडी महाविरोधी आघाडी, अशी टाकी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202402:03 PM IST

Maharashtra News Live: सरसंघचालकजी, जाती-जातीत द्वेष पसरवणाऱ्या फडणवीसांचे कान उपटा; सुषमा अंधारे यांची जहरी टीका

  • Sushma Andhare on Devendra Fadnavis : फडणवीसांनी राज्यात माणसात माणूस ठेवला नाही, जातीत जात ठेवली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी फडवीसांना सल्ला द्यावा, अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

Read the full story here

Sat, 12 Oct 202401:14 PM IST

Maharashtra News Live: राष्ट्रीयत्व अन् हिंदुत्व; आरएसएसच्या शताब्दी वर्षानिमित्त राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “गेली ९९ वर्ष संघाने…”

  • Raj Thackeray on RSS : संघाच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने विविध राजकीय प्रतिक्रियाही उमटू लागल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या शताब्दी वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वंयसेवक संघाबाबत मोठे वक्तव्य केलं आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202412:28 PM IST

Maharashtra News Live: पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका, अखेर चार महिन्यानंतर ‘या’ आमदाराचे कांग्रेसमधून सहा वर्षांसाठी निलंबन

  • MLA Sulbha Khodke : अमरामती विधानसभेच्या आमदार सुलभा खोडके यांच्यावर काँग्रेस पक्षाने मोठी कारवाई केली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत सुलभा खोडके यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबन करण्यात आलं आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202411:41 AM IST

Maharashtra News Live: Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणीं'साठी गुड न्यूज! नवरात्रीतच सरकारने दिली मोठी अपडेट

  • Ladki bahin yojana Update : राज्यभरातील महिलांना दिलासा देत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेसाठी आता लाभार्थी महिलांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202410:42 AM IST

Maharashtra News Live: Pankaja Munde : 'मी फक्त एकाच गोष्टीला घाबरते', भगवान गडावरील मेळाव्यातून पंकजा मुंडेंनी केला खुलासा

  • Pankaja Munde Dasara Melava : पंकजा मुंडे खोटे बोलते का? उजेडात एक आणि अंधारात एक असं वागते का? आणि कुणाला घाबरते का? कुणालाही घाबरत नाही. फक्त घाबरते जर या पुढच्या मैदानात माझे भाषण ऐकण्यासाठी लोक नसतील तेव्हा. मी भगवान बाबांना प्रार्थना करेन की असा दिवस येऊ देऊ नका, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

Read the full story here

Sat, 12 Oct 202409:54 AM IST

Maharashtra News Live: आता १५ नव्या जाती ओबीसीमध्ये घेतल्या तेव्हा तुमच्या आरक्षणाला धक्का लागला नाही का?; मनोज जरांगे यांचा सवाल

  • Manoj Jarange Patil on Maratha Reservation : ओबीसी प्रवर्गात नव्या १५ जातींचा समावेश करण्याच्या निर्णयावरून मनोज जरांगे पाटील यांनी आज देवेंद्र फडणवीस व छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली.

Read the full story here

Sat, 12 Oct 202409:52 AM IST

Maharashtra News Live: Sanjay Raut :"यावेळी रावणाचं अखेरचं दहन"; डुप्लिकेट मेळावा म्हणत संजय राऊतांकडून मुख्यमंत्री शिदेंची खिल्ली

  • Sanjay Raut On Eknath Shinde : रावणाचे दहन यावेळी अखेरचं दहन असेल. त्यानंतर या महाराष्ट्रात नवीन रावण निर्माण होऊ नयेत, याची काळजी आम्ही घेऊ, असे संजय राऊतांनी म्हटलं.

Read the full story here

Sat, 12 Oct 202408:05 AM IST

Maharashtra News Live: narayangad dasara melava Live Updates : मराठा समाजानं काय पाप केलं? आमच्या वाट्याला हा अन्याय का?

  • Manoj Jarange Patil at narayangad dasara melava : बीड जिल्ह्यातील नारायणगडावर मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मराठा समाजाचा दसरा मेळावा होत आहे. या मेळाव्यातील भाषणाचे अपडेट्स

Read the full story here

Sat, 12 Oct 202407:42 AM IST

Maharashtra News Live: CBSE exams : दहावी आणि बारावीच्या परीक्षेला बसायचं असेल तर ७५ टक्के उपस्थिती हवीच! सीबीएसईची शाळांना नोटीस

  • CBSE attendance notice to schools : दहावी, बारावीच्या परीक्षेला बसायचं असल्यास संबंधित विद्यार्थ्यांची शाळेत ७५ टक्के उपस्थिती असायला हवी, असं सीबीएसई बोर्डानं स्पष्ट केलं आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202407:02 AM IST

Maharashtra News Live: ओटीटी प्लॅटफॉर्मवर जे काही दाखवलं जातं, ते जाहीर सांगताही येत नाही! काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत?

  • Mohan Bhagwat : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी मेळाव्याला संबोधित करताना सरसंघचालक मोहन भागवत यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवरील कंटेंटवर नियंत्रणाची मागणी केली.

Read the full story here

Sat, 12 Oct 202406:00 AM IST

Maharashtra News Live: वचपा काढण्याची वेळ आलीय! शमीच्या झाडावरची शस्त्रे खाली उतरवा; राज ठाकरे यांचं मराठीजनांना आवाहन

  • Raj Thackeray Podcast : राज्यातील दसरा मेळाव्यांची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज सत्ताधारी व विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांना लक्ष्य केलं. 

Read the full story here

Sat, 12 Oct 202404:43 AM IST

Maharashtra News Live: राजकीय वातावरण तापणार! दसऱ्याच्या मुहूर्तावर रंगभूमी गाजवणार ‘५० खोके एकदम ओके’

  • राज्यातील सध्याच्या राजकारणावर विडंबनात्मक भाष्य करणारं '५० खोके एकदम ओके' हे नाटक आज रंगभूमीवर येत आहे. या नाटकाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे.

Read the full story here

Sat, 12 Oct 202402:27 AM IST

Maharashtra News Live: चार तासांची नोकरी आणि ११,००० रुपये पगार; बारावी पास मुली व महिलांसाठी चंद्रकांत पाटील यांची घोषणा

  • chandrakant patil : येत्या १ नोव्हेंबरपासून मुली व महिलांना चार तासांची पार्ट टाइम नोकरी दिली जाईल, अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली.

Read the full story here

Sat, 12 Oct 202401:30 AM IST

Maharashtra News Live: दसरा मेळाव्यांवर पावसाचं सावट! मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांत पावसाचा इशारा

  • weather updates : हवामान विभागानं महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 

Read the full story here

Sat, 12 Oct 202401:30 AM IST

Maharashtra News Live: कसे असेल 12 October 2024 या दिवसाचे मुंबईचे हवामान, जाणून घ्या संपूर्ण माहिती

  • Mumbai Weather: मुंबई शहरात आज हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे..
Read the full story here

Sat, 12 Oct 202411:30 PM IST

Maharashtra News Live: ७०० सीसीटीव्ही, ४०० गुन्हेगारांची झडती अन् एआयची मदत; पोलिसांना गुंगारा देणारे बोपदेव प्रकरणातील आरोपी अखेर ताब्यात

  • Bopdev Ghat rape case : पुण्यातील बोपदेव घाट प्रकरणातील आरोपींचा छडा पुणे पोलिसांनी लावला आहे. तब्बल ९ दिवस आरोपींनी पोलिसांना गुंगारा देण्यासाठी विविध क्लूप्त्या वापरल्याचं तपासात पुढं आलं आहे. मात्र, अखेर पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहे.
Read the full story here