हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत चतुरंग प्रतिष्ठान या संस्थेचे यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून याचा सांगता सोहळा २८ आणि २९ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजित करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Mumbai: मुलांना शाळेत प्रवेश देताना विचारला 'हा' प्रश्न; पालक संतापले! म्हणाले, ही खाजगी गोष्ट
Mumbai Preschool Application News: स्टँडअप कॉमेडियन श्रीधर व्ही यांनी मुंबईतील एका शाळेत मुलांना प्रवेश देताना काय विचारले जात आहे? त्याचा फोटो शेअर केला आहे.
pm modi apology : मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवभक्तांची फार उशिरा माफी मागितली असून आता माफीने काही होणार नाही असं विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
Nashik Women Beats Road Romeo: नाशिकमध्ये महिलेचा छेड काढली म्हणून एका महिलेने भररस्त्यात रोड रोमियोंना चोर दिला, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
pm modi apologize - कोकणातील मालवण येथे शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेची दखल घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज शिवाजी महाराज यांची माफी मागत असल्याचं सांगितलं.
Maharashtra News Live: शस्त्रक्रिया करताना भूल जास्त दिली गेल्यामुळं मुंबईत पोलीस कॉन्स्टेबल गौरी पाटील यांचा मृत्यू
Mumbai cop death due to anaesthesia overdose : शस्त्रक्रिया करण्याआधी भूल जास्त दिली गेल्यामुळं प्रकृती बिघडून मुंबईतील महिला पोलिसांचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.
Maharashtra News Live: बदलापूर आणि मणिपूरच्या मुली राष्ट्रपतींच्या कोणीच लागत नाहीत का? शिवसेनेचा सवाल
Saamana questions Draupadi Murmu : कोलकाता येथील अत्याचाराच्या घटनेवर बोलणाऱ्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मणिपूर व बदलापूर येथील अत्याचारावर का बोलल्या नाहीत, असा रोकडा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे.
Maharashtra News Live: Vikroli crime : कार चालकाची मुजोरी! पाठलाग करत ओला गाठून केली मारहाण; कार मालकासह पत्नीवर गुन्हा
Vikroli crime : विक्रोळी येथे एका कारचालकाने धडक दिल्यावर भरपाई घेण्यासाठी ओला कॅबचालकाने त्यांचा पाठलाग करून त्यांना अडवल्याने कारचालक पती पत्नीने ओला चालकाला गंभीर मारहाण केली आहे.
अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांसोबत बसणं मला सहन होत नाही. त्यांच्या सोबत बसल्यानंतर मला ओकारी येते, असं विधान मंत्री तानाजी सावंत यांनी केलं आहे.
Maharashtra News Live: राजकोट किल्ला पुतळा प्रकरणी कोल्हापुरात मोठी कारवाई! स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला केली अटक
Sidhudurga Rajkot Fort Case : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला किल्ला कोसळल्या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सल्टन्ट चेतन पाटीलला मध्यरात्री कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे.
Maharashtra News Live: Pimpri Chinchwad Crime : आईच्या प्रियकराने केला विश्वासघात! मुलीला बनवले वासनेचा शिकार, पोलिसांनी केली अटक
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी-चिंचवड येथे एका महिलेच्या प्रियकराने तिच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update: पुण्यासह आज विदर्भ, मराठवाड्यात जोरदार बरसणार! हवामान विभागाचा महत्वाचा इशारा
Maharashtra Weather Update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. असे असले तरी मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.