मराठी बातम्या / महाराष्ट्र / Maharashtra News Live August 29, 2024: मोठी बातमी..! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, एकाला अटक
Maharashtra News Live August 29, 2024: मोठी बातमी..! मुंबई-गोवा महामार्गाच्या ठेकेदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल, एकाला अटक
हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Mumbai goa highway : मुंबई-गोवा महामार्गाच्या कंत्राटदार कंपनीवर पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत या प्रकरणात पहिली अटक करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Maharashtra News Live: Eknath shinde : छत्रपती शिवाजी महाराज पुतळाप्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मागितली माफी, म्हणाले, “१०० वेळा..”
Eknath shinde on Shivaji maharaj statue : एकनाथ शिंदे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज आपले आराध्य दैवत आहेत. ही आपली श्रद्धा, अस्मिता आहे. त्यांचा पुतळा कोसळल्यामुळे लोकभावना तीव्र आहेत. मात्र यावर विरोधकांनी राजकारण करू नये.
Maharashtra News Live: Kokan Railway: कोकणवासीयांना खुशखबर! वांद्रे टर्मिनस ते मडगाव एक्सप्रेस नियमित सुरू, असे आहे वेळापत्रक
kokan railway : पश्चिम आणि कोकण रेल्वेने वांद्रे टर्मिनस ते मडगाव या दरम्यान द्विसाप्ताहिक नियमित एक्स्प्रेस सुरू केली आहे. आज, गुरुवारी बोरिवलीहून उद्घाटनाची एक्स्प्रेस रवाना झाली.
Maharashtra News Live: Alandi news : आळंदीत आणखी एका तरुणीची इंद्रायणी नदीत उडी मारून आत्महत्या
Alandi girl suicide : आळंदी येथे एका महिला पोलिस शिपायाने नदीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एका तरुणीने नदीत उडी मारून जीवन संपवलं आहे.
Maharashtra News Live: “पोलीस यंत्रणेची चाटूगिरी सिद्ध.!', पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुतानाचा VIDEO व्हायरल
Police washing car MLA : एक पोलीस कर्मचारी आमदार संजय गायकवाड यांची गाडी धुत असल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडिओ सपकाळ यांनी पोस्ट करत पोलिसांचं काम जनतेच्या सुरक्षेचं आहे की आमदरांच्या गाड्या धुण्याचं? असा सवालही उपस्थित केला आहे.
Maharashtra News Live: Pune ATS action : कोंढव्यात बनावट टेलिफोन एक्सचेंज सेंटरचा पर्दाफाश; ३७८८ सिमकार्ड जप्त! पुणे एटीएसची मोठी कारवाई
Pune fraud telephon exchange in Kondhwa : पुण्यात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोंढवा परिसरात सुरू असलेल्या बनावट टेलिफोन एक्सचेंजवर छापा टाकण्यात आला असून अनेक संवेदशील साहित्य जप्त करण्यात आलं आहे.
Maharashtra News Live: मालवणमधील पुतळा ३५ फुटांचा असणार हे सांगितलेच नाही; ६ फुटांचीच परवानगी होती, अधिकाऱ्याचा गौप्यस्फोट
Chhatrapati Shivaji maharaj statue collapses : कला संचालक राजीव मिश्रा यांनी सांगितले की, मालवणमध्ये ३५ फुटी पुतळा उभारणार असल्याचे आम्हाला सांगितलेच नव्हते. संचालनालयाने केवळ ६ फुटांच्या पुतळ्यास परवानगी दिली होती.
Maharashtra News Live: Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीसांची जीरवणारच! जरांगे पाटलांचा पुन्हा हल्लाबोल; १ तारखेला राजकोटला भेट देणार
Manoj Jarange Patil : मालवण येथील राजकोट येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसल्याने सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच राजकीय वादही सुरू आहे. या वादात आता मनोज जरांगे पाटील यांनी उडी घेतली आहे.
Maharashtra News Live: समृद्धी महामार्गावर स्वत: प्रवास करून उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी केली अधिकाऱ्यांच्या दाव्याची पोलखोल
Samruddhi Mahamarg : वाहनांची नियमित तपासणी करून समृद्धी महामार्गावर अपघात रोखण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचा एमएसआरडीसीचा दाव्याची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी पोलखोल केली आहे.
Maharashtra News Live: Mumbai Rape: मुंबईत ९ वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आईच्या तक्रारीनंतर नराधम बापाला अटक
Mumbai man rapes daughter: मुंबईतील मालाड येथे पोटच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी नराधम पित्याला पोलिसांच्या बेड्या ठोकल्या. न्यायालयाने आरोपीला ३० ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सुरू आहे.
: अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी शिल्पकार जयदीप आपटे यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवAmol Mitkari on Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapsedण्याची मागणी केली आहे.
Maharashtra News Live: त्या आपटेला आपटावासा वाटतोय; शिवपुतळा प्रकरणावर जितेंद्र आव्हाड यांचा संताप
Jitendra Awhad slams Jaydeep apte : अवघ्या आठ महिन्यात पडलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा साकारणाऱ्या जयदीप आपटे याच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड संतापले आहेत.
Maharashtra News Live: western railway : रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! गुजरातमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नऊ एक्स्प्रेस रद्द
western railway cancelled train list : गुजरात येथे सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे सेवेवर देखील झाला आहे. मुंबईतून सुटणाऱ्या ९ एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
Maharashtra News Live: पुतळा पडला कसा? इंजिनियर आणि नौदल अधिकारी मिळून कारणे शोधणारः मुख्यमंत्र्यांची घोषणा
Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथील राजकोट तटावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी सरकारने नौदल आणि तज्ञ अभियंत्यांची समिती स्थापन करण्याच्या निर्णय घेतला आहे. ही समिती पुतळा कसा कोसळला याची कारणे शोधणार असल्याचे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.
Bhiwandi Crime : राज्यात मुलींवरील अत्याचाराच्या घटना या सुरूच आहेत. अकोला येथील शाळेतील शिक्षकाने सहा मुलींवर अत्याचार करण्याची घटना ताजी असतांना भिवंडी येथे महापालिकेच्या शाळेत मुलींला अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या शिक्षकाला अटक करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: Chandrakant Patil : नीलेश लंके नंतर आता चंद्रकांत पाटलांनी कुख्यात गुंड गजा मारणेकडून सत्कार स्वीकारला; व्हिडिओ व्हायरल
Chandrakant Patil and Gaja Marane : पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्या हस्ते पुण्याचे माजी पालकमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी दहीहंडी उत्सवादरम्यान सत्कार स्वीकारल्याचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता; IMD ने दिला यलो अलर्ट, वाचा
Maharashtra Weather Update : राज्यात आज देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पुण्यात आणि कोकणात व विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.