Maharashtra News Live August 28, 2024: Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन-latest maharashtra today live updates august 28 2024 ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra News Live August 28, 2024: Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन
Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन
Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन(HT_PRINT)

Maharashtra News Live August 28, 2024: Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन

HT Marathi Desk 05:05 PM ISTAug 28, 2024 10:35 PM
  • twitter
  • Share on Facebook

हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.

Wed, 28 Aug 202405:05 PM IST

Maharashtra News Live: Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन

  • Ajit pawar : अजित पवार यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दु:ख व्यक्त करत राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाईल, असे वचन दिले आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202404:36 PM IST

Maharashtra News Live: भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला, ठोंबरेंसह चालक जखमी, रुग्णालयात दाखल

  • sangita thombre : केजच्या माजी आमदार व भाजप नेत्या प्रा. संगीता ठोंबरे यांच्या कारवर हल्ला झाला आहे. केज तालुक्यातील दहिफळ वड मावली येथे त्यांच्यावर हल्ला झाला.

Read the full story here

Wed, 28 Aug 202403:10 PM IST

Maharashtra News Live: मोठी बातमी! तलाठी कार्यालयातच डोळ्यात मिरची पूड टाकून तलाठ्याची हत्या; हिंगोलीतील घटनेनं खळबळ

  • Hingoli Talathi Murder : हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगावामध्ये एका तरुणाने तलाठ्याच्या डोळ्यात मिरची पूड टाकून चाकूने  भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202402:25 PM IST

Maharashtra News Live: बदलापूरची नंदुरबारमध्ये पुनरावृत्ती! सफाई कर्मचाऱ्याकडून अश्लील व्हिडिओ दाखवून १० वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग

  • Nandurbar crime news : आरोपी कंत्राटी पद्धतीने शाळेत कामावर होता. त्याने पाचवीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या मोबाईलमधील अश्लील व्हिडिओ दाखवल्याने खळबळ उडाली आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202412:07 PM IST

Maharashtra News Live: Narayan Rane : घरातून खेचून एकेकाला मारून टाकेन; नारायण राणे यांची पोलिसांसमोर धमकी

  • Narayan rane : घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन, सोडणार नाही, अशी थेट धमकी नारायण राणे यांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांसमोरच दिली आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202411:11 AM IST

Maharashtra News Live: Mhada Homes : खुशखबर! म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किंमती झाल्या कमी, राज्य सरकारची घोषणा

  • Mhada Home prices : म्हाडाच्या घराच्या किंमती प्रंचड असल्यामुळे लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली होती. लोकांना कमी प्रतिसाद पाहून आता सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202410:06 AM IST

Maharashtra News Live: मालवणात राडा! राजकोट किल्ल्यावर निलेश राणे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने; कार्यकर्ते एकमेकांना भिडले

  • Shivaji maharaj statue Malvan: राजकोट किल्ल्यावर पाहणीसाठी आदित्य ठाकरे आले होते. तर त्याचवेळी निलेश राणेही आले होते. दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याने त्यांनी जोरदार घोषणाबाजी व बाचाबाची झाली. त्यानंतर दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली.

Read the full story here

Wed, 28 Aug 202409:21 AM IST

Maharashtra News Live: महाराज आम्हाला माफ करा… शिवरायांचा पुतळा पडल्यानंतर मविआनं शेअर केला व्हिडिओ, सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

  • MVA video after shivaji maharaj statue collapsed : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून राज्य व केंद्रातील सत्ताधाऱ्यांवर जोरदार तोफ डागली आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202407:43 AM IST

Maharashtra News Live: Mumbai Dahihandi 2024 : दहीहंडीच्या उत्सवाला गालबोट! मुंबईत थरावरुन कोसळून २४५ गोविंदा जखमी, रुग्णालयात दाखल

  • Mumbai Dahihandi 2024 : मुंबईत रात्री ९ वाजेपर्यंत १०६ गोविंदा जखमी झाल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे. यापैकी १५ गोविंदावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. १७  जणांवर ओपीडीमध्ये उपचार सुरू आहेत.

Read the full story here

Wed, 28 Aug 202406:48 AM IST

Maharashtra News Live: Pune sinhgad road murder: रेनकोटच्या वादातून डिलिव्हरी बॉयने केली मित्राची चाकूने भोसकून हत्या; नऱ्हे येथील घटना

  • Pune Crime News : पुण्यात किरकोळ कारणावरून एका डिलिव्हरी बॉयने त्याच्या मित्राचा चुकूने भोसकून खून केल्याची घटना सिंहगड रोड येथील नऱ्हे येथे घडली आहे.
Read the full story here

Wed, 28 Aug 202406:09 AM IST

Maharashtra News Live: ‘दुर्घटनेतून चांगलं घडेल’ म्हणणारे मंत्री दीपक केसरकर हे तर अफजलखानची औलाद… संजय राऊत कडाडले

  • sanjay raut ‘मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडण्याच्या दुर्घटनेतून काहीतरी चांगलं घडेल’ असं अजब तर्क देणारे राज्याचे मंत्री दीपक केसरकर यांना मंत्रालयासमोर चपलेनं मारलं पाहिजे असं खळबळजनक विधान शिवसेना (ठाकरे) गटाचे प्रवक्ते, राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे.

Read the full story here

Wed, 28 Aug 202405:34 AM IST

Maharashtra News Live: Badlapur Crime : बदलापुर पुन्हा हादरले! नराधम बापाने केला पोटच्या मुलीवर अत्याचार, गुन्हा दाखल

  • Badlapur Crime News: बदलापूर येथे शाळेतील मुलीवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असतांना आता आणखी एक घटना उघडकीस आली आहे. नराधम बापाने पोटच्या मुलीवर अत्याचार केल्याचं उघड झालं आहे.
Read the full story here

Wed, 28 Aug 202403:47 AM IST

Maharashtra News Live: Sangli Murder : सांगलीत जुन्या वादातून कब्बडीपटूची कोयत्याने वार करून हत्या! पाच अल्पवयीन आरोपींना अटक

  • Sangli Crime News : सांगली येथे एका कबड्डीपटूची भररस्त्यात कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली आहे. या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
Read the full story here

Wed, 28 Aug 202403:13 AM IST

Maharashtra News Live: मालवण येथील छत्रपती शिवरायांचा पुतळा तयार करणारे शिल्पकार जयदीप आपटे फरार! कल्याणमधील घराला कुलूप

  • Sindhudurg Chhatrapati Shivaji Maharaj Statue Collapse : मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कल्याण येथील शिल्पकार जयदीप आपटे यांनी तयार केला असून या घटनेनंतर जयदीप आपटे फरार असल्याची माहिती आहे.
Read the full story here

Wed, 28 Aug 202401:32 AM IST

Maharashtra News Live: Pune Crime : खळबळजनक! पुण्यात महिलेचा निर्घृण खून; डोकं, हात, पाय कापले अन् धड नदीपात्रात फेकले, खराडी येथे सापडले धड

  •  Pune Kharadi Crime News: पुण्यात खराडी येथे नदीपात्रात एका महिलेचे शिर, हातपाय नसलेले धड सापडले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.
Read the full story here

Wed, 28 Aug 202412:19 AM IST

Maharashtra News Live: Maharashtra Weather update: राज्यात 'या' जिल्ह्यात आज बरसणार; IMD ने दिला यलो अलर्ट

  • Maharashtra Weather update : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज मध्य महाराष्ट्र, कोकण, तसेच विदर्भातील काही जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Read the full story here