हिंदुस्तान टाइम्स- मराठीच्या 'महाराष्ट्र लाइव्ह ब्लॉगमध्ये आपले स्वागत. महाराष्ट्रात आज राजकारण, अर्थकारण, मनोरंजन, कृषी, क्रीडा तसेच हवामान क्षेत्रात घडलेल्या ताज्या घडामोडींचा वृत्तांत.
Sat, 24 Aug 202405:22 PM IST
Maharashtra News Live: Assembly Election 2024: महाविकास आघाडीत ठाकरेच मोठा भाऊ, मुंबईत मिळणार इतक्या जागा!
assembly election 2024 : ठाकरेंची शिवसेना मुंबईत मोठा भाऊ असेल त्यावर आम्हाला आक्षेप घेण्याचं काही कारण नाही. जे सत्य आहे ते आहे. अशी माहिती शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
ladki bahin yojana : यवतमाळमध्ये मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरु असताना काही महिलांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. महिला पोलीस कर्मचारी आणि कार्यक्रमाला आलेल्या काही महिलांमध्ये बाचाबाची झाल्याचंही समोर आलं आहे.
Maharashtra News Live: Ajit Pawar : ‘आरोपीचं सामानच काढून टाकलं पाहिजे' ; बदलापूर प्रकरणावरुन अजित पवारांचा जाहीर सभेत संताप
Ajit Pawar On Badlapur Rape Case : आई-बहिणी व लेकींवर हात टाकणाऱ्यांना कडक शिक्षा दिली पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच, हे केलचं पाहिजे, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
Maharashtra News Live: Weather Update: पुढील ३ तासांत मुसळधार पावसाची शक्यता; पुणे व साताऱ्यासाठी रेड अलर्ट, पुण्यातील धरणांतून विसर्ग वाढवला
Maharashtra weather update : येत्या ३ ते ४ तासात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील बहुतांश ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.णे आणि साताऱ्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या दोन्ही जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Pune Helicopter Crash: पुण्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं; खराब हवामान व पावसामुळं दुर्घटना!
Pune Helicopter Crash : खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे हेलिकॉप्टर कोसळलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. हेलिकॉप्टरमधील ४ जण किरकोळ जखमी झाले असून त्यातील एक जण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
Maharashtra News Live: Jalna MIDC Blast : जालन्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, २० कामगार जखमी; ३ गंभीर
Jalna MIDC Blast : जालना औद्योगिक वसाहतीमधील एका स्टील कंपनीत झालेल्या स्फोटात कामगार जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
Maharashtra News Live: जळगाववर शोककळा! नेपाळमध्ये बस दुर्घटनेत मृत पावलेल्या भाविकांची संख्या पोहोचली २७ वर, काही भाविक बेपत्ता
Nepal Accident : जळगाव येथील काही यात्रेकरून नेपाळ येथे दर्शनासाठी गेले होते. यावेळी प्रवाशांची बस नदीत कोसळली असून यात मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या संख्या वाढली आहे.
Maharashtra News Live: Pune muk Morcha: बदलापूर घटनेच्या निषेधार्थ मविआचे मुक आंदोनल; भर पावसात शरद पवारांसह नेत्यांची निदर्शने
Pune Muk Morcha: महावीकस आघाडीने पुकारलेला बंद बेकायदेशीर ठरवल्यावर बंद मागे घेण्यात आला होता. त्या ऐवजी आज पुण्यात महावीकस आघाडीतर्फे मुक आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.
Maharashtra News Live: Alibaug Crime : अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक
Alibaug Crime : अलिबाग येथे एका रिसॉर्टमध्ये सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे. येथून अमेरिकेतील नागरिकांची फसवणूक केली जात होती.
Maharashtra News Live: Water Cut in Mumbai : मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; पाईपलाईन दुरुस्तीसाठी आज 'या' भागात आज पाणी बंद!
Water Cut in Mumbai : मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी आहे. आज काही भागतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन केलं आहे.
Maharashtra News Live: Maharashtra Weather Update : राज्यात पुढील काही तास धोक्याचे! कोकण, मुंबई, ठाणे, पुण्यासह 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
Maharashtra Weather Update : राज्यात मॉन्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
Maharashtra News Live: Rashi Bhavishya Today 24 August 2024 : आज मारुती पूजन दिवस व वृद्धी योगात कसा जाईल शनिवार ? वाचा राशीभविष्य!
Astrology prediction today 24 August : आज शुक्र कन्या राशीत प्रवेश करणार असून अश्वस्थ मारूती पूजन दिनी चंद्र मेष राशीतुन आणि अश्विनी नक्षत्रातुन भ्रमण करणार आहे! वाचा राशीभविष्य!