पुण्यातील भोसरीमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली! तीन मजूर ठार, काही जखमी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  पुण्यातील भोसरीमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली! तीन मजूर ठार, काही जखमी

पुण्यातील भोसरीमध्ये पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली! तीन मजूर ठार, काही जखमी

Oct 24, 2024 11:20 AM IST

Bhosari Water Tank collapse : पुण्यातील भोसरी येथे आज सकाळी एका पाण्याच्या टाकीची भिंत कोसळून तीन मजूर ठार झाल्याची घटना आज सकाळी घडली.

भोसरीत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली; तीन मजूर ठार, काही जखमी
भोसरीत पाण्याच्या टाकीची भिंत कोसळली; तीन मजूर ठार, काही जखमी

Bhosari Water Tank collapse : पुण्याच्या पिंपरी चिंचवडमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली. भोसरी येथील सद्गुरू नगर येथे एका मोठ्या पाण्याच्या टाकीची भिंत अचानक कोसळली. या दुर्घटनेत तीन मजुरांचा मृत्यू झाला तर सातजण जखमी झाले आहे. अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी पोहचले असून त्यांनी बचावकार्य सुरू केले आहे. अपघात मृत्युमुखी पडलेल्या मजुरांची नावे समजू शकली नाहीत. या घटनेत जखमी मजुरांना उपचारांसाठी रूग्णालयात दाखल केले आहे.

भोसरी येथील सद्गुरूनगर येथे एका बांधकाम सुरू असून या ठिकाणी लेबर कँप आहे. या लेबर कँपमध्ये झारखंड, बिहार म्हणून आलेले मजूर येथील लेबर कॅम्पमध्ये राहतात. या ठिकाणी  १२ फुट उंच पाण्याची टाकी बांधण्यात आली होती. आज सकाळी ८ काही मजूर आंघोळीसाठी टाकीजवळ गेले होते. यावेळी अचानक टाकीची मोठी भिंत कोसळली. या वेळी भिंतीच्या ढीगाऱ्याखाली काही मजूर दबले. त्यामुळे तिघांचा मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले. हे कामगार लेबर कॅम्पमध्ये राहत होते. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक मजुरांनी बचाव कार्य राबवले. तसेच अग्निशामक दल आणि पोलिसांचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी देखील बचाव कार्य राबवले. जखमी मजुरांना तातडीने दवाखान्यात भरती करण्यात आले आहे. कोसळलेली टाकी ही नुकतीच बांधण्यात आली होती.

ही पाण्याच्या टाकी कशी कोसळली याचे कारण समजू शकले नाही. दरम्यान, मजुरांनी या टाकीच्या बांधकामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे. तसेच संबंधित कंत्राटदारावर कारवाई होण्याची देखील शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी पाण्यासाठी येथे राहत असलेल्या मजुरांनी आंदोलन केले होते. त्यानंतर या लेबर कॅम्पमधील टाकीला सुरळीत पाणीपुरवठा सुरु झाला आणि आता हीच पाण्याची टाकी कोसळून तिघे जण ठार झाले आहे. 

 

 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर