Tamhini ghat landslide : रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Tamhini ghat landslide : रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प

Tamhini ghat landslide : रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प

Jul 25, 2024 01:00 PM IST

Pune Tamhini ghat land slide : रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. घाट साधारण ४-५ तास बंद राहिल असा अंदाज आहे.

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प
रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्याने घाट मार्गावरील वाहतूक ठप्प

Pune Tamhini ghat land slide : रायगड मार्गावरील ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे घाटातून वाहतूक बंद करण्यात आली आहे. ताम्हिणी घाटात गेल्या २४ तासांत ५३५ मिलीमीटर पाऊस झाला असून पुढील काही तासांत या घाटात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.

पुणे जिल्ह्यात मुळसाधार पाऊस सुरू आहे. खेड, आंबेगाव, जुन्नर, मावळ, भोर, वेल्हा, मुळशी, मावळ तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. नुसते पुणे नाही तर राज्याच्या विविध भागात पाऊस वाढला आहे. पुण्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरु असून सिंहगड रोड परिसरातील अनेक घरात पाणी शिरले आहे. आज पुण्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे जिल्ह्यामध्ये गेल्या २४ तासात पावसाचा जोर वाढला आहे. मावळ व मुळशी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू आहे. मुळशी आणि मावळ तालुक्यात दरड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. ताम्हिणी घाट परिसरातील आदरवाडी गाव परिसरात दरड कोसळली आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे. डोंगराचा मातीचा काही भाग तुटून रस्त्यावर आला आहे. रस्ता ते डोंगराच्या अंतर अंदाजे ५०० मीटर इतके आहे. त्यावर १० ते १२ फूट उंचीचा मातीचा थर रस्त्यावर आला आहे. या परिसरात पिकनिक नावाचं हॉटेल असून या हॉटेलच्या भागांमध्ये हा कडा कोसळला आहे. यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून एक व्यक्ती जखमी झाला आहे.

रायगड-पुणे मार्गावरील ताम्हिणी घाटात वाहतूक ठप्प

ताम्हिणी घाटात दरड कोसळल्यामुळे या मार्गावरील वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. रायगडमध्ये जाण्यासाठी या मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. मात्र, आज सकाळी येथे दरड कोसळल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे. रस्त्यावरील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मात्र, जोरदार पावसामुळे यात अडथळे येत आहेत.

प्रशासकीय यंत्रणेला पोहोचण्यासाठी या भागात अडथळे निर्माण होत आहे. भोर वेल्हा मुळशी, मावळ या तालुक्यांमध्ये असणाऱ्या दुर्गम भागामध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस बरसत असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर