anuskura ghat land slide : रत्नागिरी व कोल्हापूरला जोडणारा महत्वाचा रस्ता असणारा अनुस्कुरा घाटात मध्यरात्री दरड कोसळली. या मुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घाटात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे ही दरड कोसळली असण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात व रत्नागिरी जिल्ह्यात सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनुस्कुरा घाटात देखील जोरदार पाऊस सुरू आहे. गुरुवारी रात्री या घाटात अचानक मोठी दरड कोसळली. यामुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. या घटनेत जीवित हानी झालीची अद्याप कोणतीही माहिती नाही. या घटनेमुळे या घाटातील वाहतूक ही ठप्प झाली आहे. ही वाहतूक सकाळ पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. ही दरड रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीत कोसळली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातून अनुस्कुरा मार्गे कोल्हापूर जिल्ह्यात येणारी वाहतूक या घटनेमुळे सकाळपर्यंत बंद करण्यात आली आहे. घाटात कोसळलेली दरड हटवण्याचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. या साठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी, तसेच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. मोठे खडक फोडून ही दरड हटवण्यासाठी ब्लास्टींग मशीनदेखील मागवण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली .
`घाटात सध्या युद्ध पातळीवर दरड काढण्याचे काम सुरू असून ही दरड पूर्णपणे काढल्यावर या मार्गावरील वाहतूक ही पुन्हा सुरु केली जाईल. मात्र, हा रस्ता तोपर्यंत वाहतुकीसाठी बंद केला आहे, अशी माहिती राजापूरच्या उपविभागीय अधिकारी वैशाली माने यांनी दिली आहे.
या घाटात सुरक्षित वाहतुक होण्यासाठी धोकादायक स्थळांची देखील पाहणी केली जाणार आहे. त्यानुसार या ठिकाणी उपाय योजना केल्या जाणार आहेत. नागरिकांनी व प्रवाशांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासाने केले आहे.
संबंधित बातम्या